Honey Facial : काळवंडलेल्या त्वचेला डाग रहित करण्यासाठी आजच करा हनी फेशिअलचा वापर, त्वचा घरच्या घरी उजळून जाईल!!

Honey Facial : मधाचे आयुर्वेदिक शास्त्रामध्ये खूप सारे फायदे सांगण्यात आलेले आहेत. मधाचा वापर केल्याने आपली त्वचा कोमल मुलायम बनते त्याचबरोबर त्वचेचे आरोग्य निरोगी राहते. बहुतेक वेळा मधाचा वापर फेशिअल करण्यासाठी देखील केला जातो.

Honey Facial : काळवंडलेल्या त्वचेला डाग रहित करण्यासाठी आजच करा हनी फेशिअलचा वापर, त्वचा घरच्या घरी उजळून जाईल!!
प्रातिनिधिक फोटोImage Credit source: File Photo
Follow us
| Updated on: Mar 09, 2022 | 9:04 PM

मधाचे (honey) आतापर्यंत अनेकांना फायदे माहिती असतीलच. आयुर्वेदिक शास्त्रामध्ये मधाला खूपच महत्त्व देण्यात आले आहे. मध आपल्या शरीरातील अनेक समस्या मुळापासून नष्ट करण्यासाठी मदत करत असतो.आपल्या शरीराला मधाचे फायदे भरपूर असतात त्याचबरोबर आपली त्वचा उजळविण्यासाठी देखील मधाचे खूप सारे फायदे आयुर्वेदिक शास्त्रामध्ये सांगण्यात आलेले आहे. जर तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग,पिंपल्स,वांग, त्वचा काळी पडली असेल तर अशा वेळी मधा च्या साह्याने आपण आपली त्वचा नैसर्गिकरीत्या चमकवू ( glowing skin) शकतो. आपण दैनंदिन जीवनामध्ये मधातचा देखील वापर करू शकतो. तुमची त्वचा उन्हा मध्ये गेल्यावर काळी पडत असेल तर अशा वेळी मधाचा वापर करून आपली त्वचा अगदी घरगुती पद्धतीने चमकवू शकतो. बाजारामध्ये मधाचे बनलेले फेशियल क्रीम(facial cream) देखील उपलब्ध असतात. आपल्या चेहऱ्याचे आरोग्य चांगले ठेवायचे असल्यास फेशिअल हा एक महत्त्वाचा उपचार आहे. तुम्ही घरच्या घरी देखील हा उपाय करू शकतात आणि नैसर्गिकरीत्या काही पदार्थांच्या सहाय्याने आपला चेहरा चेहऱ्यावरील त्वचा कोमल मुलायम बनवू शकतो. घरच्या घरी फेशियल बनवण्यासाठी तुम्हाला काही पायऱ्यांचा वापर करावा लागेल.

क्लींजर म्हणून करा मधाचा वापर

मधामध्ये अँटी बॅक्टेरियल व अँटी इंफ्लेमेटरी आणि हुमेक्टैंट गुणधर्म असतात त्यामुळे तुमच्या त्वचेवर जर कोणत्याही प्रकारची घाण जमा झाली असेल तर ती घाण निघून जाते. तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग, पिंपल्स झाले असतील तर ते सुद्धा निघून जातात. मधामध्ये मॉइस्चराइजिंग गुणधर्म देखील असतात त्यामुळे तुमचा चेहरा हा नैसर्गिकरित्या टवटवीत बनतो. मध आपल्या चेहऱ्यावर लावल्यानंतर पंधरा ते वीस मिनिटं राहू द्यायचे आहे आणि त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा आपल्याला धुवायचा आहे.

हनी फेशियल टोनरचा करा वापर

या टोनर च्या मदतीने तुमच्या चेहऱ्यावर जर काही छिद्रे खुली असतील तर ती छिद्रे बंद करण्यासाठी करण्यासाठी मदत होते. या टोनर साठी तुम्हाला दोन पदार्थांची आवश्यकता असते. या पदार्थांच्या सहाय्याने तुम्ही घरच्या घरी फेशियल टोनर बनवू शकता. हे टोनर बनवण्यासाठी आपल्याला काकडी आणि मध लागणार आहे. काकडीचा रस बनवून त्यामध्ये आपल्याला मध मिसळायचे आहे. आता हे मिश्रण आपल्याला एका बॉटलमध्ये भरून व्यवस्थित एकजीव करायचे आहे आणि त्यानंतरच कापूस च्या सहाय्याने हे मिश्रण आपल्याला चेहऱ्यावर लावायचे आहे.

हनी फेस स्क्रब ने एक्सफोलिएट करा.

मधामध्ये एंटीऑक्सीडेंट आणि मॉइस्चराइजिंग गुणधर्म असतात, जे आपल्या त्वचेसाठी लाभदायक ठरतात. आपल्या त्वचेवर जे काही छिद्र व त्या छिद्र मध्ये घाण जमा झालेली असते ती बाहेर पडते. तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी हा फेस स्क्रब अत्यंत लाभदायक ठरतो. हा स्क्रब बनवण्यासाठी मध आणि पिठीसाखर दोन्ही पदार्थ एकजीव करायचे आहे व यांची पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावायची आहे. काही काळ पेस्ट ठेवल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवायचा आहे.

हनी फेस पॅकचा करा वापर

हा फेस पॅक बनवण्यासाठी आपल्याला केळी घ्यायची आहेत आणि केळीचे बारीक बारीक तुकडे करायचे आहे,यामध्ये एक टेबल स्पून मध मिसळून हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करायचे आहे त्यानंतर हे मिश्रण व ही पेस्ट आपल्याला चेहऱ्यावर लावायची आहे. चेहऱ्यावर पेस्ट लावल्यानंतर दहा मिनिटं तशीच ठेवायची आहे आणि त्यानंतर आपला चेहरा स्वच्छ पाण्याने धुवायचा आहे.

टीप : यातील सूचना प्रातिनिधिक माहितीवर आधारित आहेत. कोणतिही कृती करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या

इतर बातम्या:

Raj Thackeray : ‘संजय राऊत… कॅमेरा आला की सुरु, कॅमेरा हटला की नॉर्मल’, राऊतांची नक्कल करत राज ठाकरेंची टोलेबाजी

Video : राज्यपालांना शिवराय कळलेत का? राज्यपालांची नक्कल करत राज ठाकरेंनी घेतला समाचार

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.