चेहऱ्यावरील टॅन काढण्यासाठी हळद आणि बेसन पीठाचा फेसपॅक अत्यंत फायदेशीर, वाचा !
सध्या कोणत्याही हंगामात चेहऱ्यावर टॅन होण्याची समस्या सामान्य झाली आहे. टॅनमुळे आपल्या त्वचेचा रंग जास्त गडद होतो. ही समस्या दूर करण्यासाठी अनेकजण विविध उपचार घेतात.
मुंबई : सध्या कोणत्याही हंगामात चेहऱ्यावर टॅन होण्याची समस्या सामान्य झाली आहे. टॅनमुळे आपल्या त्वचेचा रंग जास्त गडद होतो. ही समस्या दूर करण्यासाठी अनेकजण विविध उपचार घेतात. मात्र, उपचार घेऊन देखील चेहऱ्यावरील काळे डाग आणि टॅन जात नाही. चेहऱ्यावरील काळे डाग आणि टॅन जाण्यासाठी आपण काही घरगुती उपाय केले पाहिजेत. विशेष म्हणजे या घरगुती उपायांमुळे आपल्या चेहऱ्यावरील काळे डाग जाण्यास मदत होते. (Turmeric face pack is beneficial for removing tan on the face)
टॅन काढण्यासाठी तुम्ही हळद आणि बेसन पीठाचा फेसपॅक वापरू शकता. यासाठी तुम्हाला बेसन पीठ, दही, मध आणि हळद आवश्यक असेल. हे सर्व साहित्य एकत्र मिक्स करून चांगली पेस्ट तयार करा आणि ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. कोरडे झाल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. बेसन एक्सफोलियंट म्हणून काम करते. मध पोषण आणि हायड्रेट करण्याचे कार्य करते. हळद डी-टॅन आणि अँटी-बॅक्टेरियल एजंट म्हणून कार्य करते. दहीमध्ये उपस्थित लैक्टिक अॅसिड त्वचा स्वच्छ करण्यासाठी कार्य करते.
जर आपला चेहरा उन्हामुळे टॅन झाला आहे असे वाटत असेल, तर आपण सतत थंड पाण्याने तोंड धुतले पाहिजे. ते आपल्या त्वचेसाठी ढाल अर्थात शील्ड म्हणून काम करेल. थंड पाणी आपल्या चेहऱ्याला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून देखील वाचवते. वास्तविक, थंड पाणी हळूहळू आपल्या उन्हाने बाधित त्वचेला मृत पेशींमध्ये रुपांतरित करते. जी स्क्रब करताना आपल्या चेहऱ्यापासून विभक्त होते आणि आपली त्वचा पुन्हा चमकू लागते.
फेस पॅक बनवण्यासाठी एका भांड्यात 2 चमचे हळद, 1 चमचा मध आणि लिंबाचा रस घ्या. हे मिश्रण व्यवस्थित मिसळून त्याची पेस्ट तयार करा. 5 ते 20 मिनिटांसाठी हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा. नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. जर आपली त्वचा संवेदनशील असेल तर, लिंबाचा रस मिसळू नका. लिंबाचा रस आणि मध फेसपॅक 1 चमचे मध आणि 1 चमचे लिंबाचा रस मिसळून पेस्ट बनवा. ते चेहऱ्यावर लावा आणि 1 तास ही पेस्ट चेहऱ्यावर ठेवा. यानंतर ते थंड पाण्याने धुवा. हा लिंबाचा रस नैसर्गिक ब्लीचप्रमाणे कार्य करतो आणि मध त्वचेमध्ये ओलावा राखतो.
संबंधित बातम्या :
Food | ‘या’ पदार्थांना दूर ठेवा आणि हिवाळ्याच्या काळात सर्दी-खोकल्यापासून सुरक्षित राहा!
दररोज रात्री झोपण्याच्या अगोदर चेहऱ्याला गुलाब पाणी लावण्याचे आश्चर्यकारक फायदे, वाचा अधिक !
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Turmeric face pack is beneficial for removing tan on the face)