Skin Care : महागड्या उत्पादनांपेक्षा कोरफडचा अशाप्रकारे वापर करा आणि सुंदर त्वचा मिळवा!

उन्हाळ्याच्या हंगामाला नुकताच सुरूवात झाली आणि त्वचेच्या (Skin) असंख्य समस्या लगेचच सुरू झाल्या आहेत. घामामुळे त्वचा खूप चिकट होते. यामुळे त्वचेवर टॅन आणि पिंपल्सची समस्या निर्माण होते. उन्हामुळे (Summer) त्वचा काळी पडण्यासही सुरूवात होते. या सर्व समस्या दूर करण्यासाठी घरगुती उपाय अत्यंत फायदेशीर आहेत.

Skin Care : महागड्या उत्पादनांपेक्षा कोरफडचा अशाप्रकारे वापर करा आणि सुंदर त्वचा मिळवा!
त्वचेची काळजी घेण्यासाठी कोरफड फायदेशीर Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 13, 2022 | 6:00 AM

मुंबई : उन्हाळ्याच्या हंगामाला नुकताच सुरूवात झाली आणि त्वचेच्या (Skin) असंख्य समस्या लगेचच सुरू झाल्या आहेत. घामामुळे त्वचा खूप चिकट होते. यामुळे त्वचेवर टॅन आणि पिंपल्सची समस्या निर्माण होते. उन्हामुळे (Summer) त्वचा काळी पडण्यासही सुरूवात होते. या सर्व समस्या दूर करण्यासाठी घरगुती उपाय अत्यंत फायदेशीर आहेत. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, कोरफड आपल्या त्वचेसाठी खूप जास्त फायदेशीर (Beneficial) आहे. उन्हाळ्यामध्ये त्वचेची निगा राखण्यासाठी कोरफडची मदत घ्या. फेसपॅक, फेसवाॅश आणि स्क्रब म्हणूनही आपण कोरफडचा वापर करू शकतो.

चिकट त्वचेची समस्या

त्वचेचा चिकटपणा दूर करण्यासाठी महागडे फेसवॉश वापरण्यापेक्षा आपण कोरफडची मदत घ्यायला हवी. कोरफडमुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यासोबतच कोरफड फेसवाॅश त्वचेसाठी फायदेशीर आहे. यासाठी कोरफडमध्ये एक चमचा दूध आणि एक चमचा लिंबाचा रस मिसळून फेसवॉशप्रमाणे चेहऱ्यावर लावा. यामुळे तुमच्या त्वचेचा चिकटपणा दूर होईल.

टॅनिंग दूर होण्यास मदत

उन्हाळ्यात टॅनिंग आणि सनबर्नची समस्या असते. ही समस्या टाळण्यासाठी तुम्ही कोरफड जेलचाही वापर करू शकता. दररोज कोरफड जेल लावल्याने तुमच्या त्वचेचे काळे डाग दूर होतील, त्वचा स्वच्छ आणि चांगली होईल. यासाठी तुम्हाला महागड्या उत्पादनांची गरज आहे.

मुरूमाची समस्या दूर होते

कोरफड जेल वापरून आपण चेहऱ्यावरील मुरूमाची समस्या दूर करू शकतो. कोरफड जेलमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. जे त्वचेवर मुरुम तयार होण्यास प्रतिबंध करतात. जर तुमच्या चेहऱ्यावर मुरुमांची समस्या असेल तर तुम्ही दररोज रात्री झोपताना कोरफड चेहऱ्याला लावा आणि सकाळी चेहरा थंड पाण्याने धुवा.

हे देखील अत्यंत महत्वाचे

कोरफडीमध्ये फॉलिक अॅसिड असते, जे आपल्या त्वचेसाठी खूप जास्त फायदेशीर असते. आरोग्याच्या दृष्टीने कोरफडीची पाने ही नैसर्गिकरित्या प्रभावशाली आयुर्वेदीक वनस्पती आहे. कोरफडीचा गर त्वचेला थंडावा देतो. विशेष म्हणजे आठवड्यातून तीन वेळा जर आपण कोरफडचा रस उपाशी पोटी पिला तर आरोग्यासोबतच केस आणि त्वचेच्या समस्या दूर होण्यास मदत होते.

(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

संबंधित बातम्या : 

Health : उन्हाळ्यात आंब्यापासून बनवलेल्या या 4 स्वादिष्ट आणि आरोग्यदायी पेयांचे सेवन नक्की करा!

Health Care Tips : निरोगी राहण्यासाठी या 3 पदार्थांचा आहारात नक्कीच समावेश करा!

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.