Skin | घामामुळे त्वचेची चमक नाहीशी झाली आहे? मग हे खास फेसपॅक त्वचेला लावा आणि रिझल्ट पाहा!

उन्हाळ्यामध्ये (Summer) त्वचेच्या अनेक समस्यांना सामोरे जाण्याची वेळ येते. या ऋतूत त्वचेवर टॅनिंग होऊन निस्तेज आणि खराब त्वचा होते. उन्हाळ्यात त्वचेची डबल काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्यात त्वचेची (Skin) काळजी घेण्यासाठी तुम्हाला समर केअर प्रोडक्ट्स बाजारात मिळतील, पण तुम्ही घरगुती उपायांनीही चमकदार आणि निरोगी त्वचा मिळवू शकता.

Skin | घामामुळे त्वचेची चमक नाहीशी झाली आहे? मग हे खास फेसपॅक त्वचेला लावा आणि रिझल्ट पाहा!
उन्हाळ्यात हे फेसपॅक वापरले फायदेशीर Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 20, 2022 | 12:13 PM

मुंबई : उन्हाळ्यामध्ये (Summer) त्वचेच्या अनेक समस्यांना सामोरे जाण्याची वेळ येते. या ऋतूत त्वचेवर टॅनिंग होऊन निस्तेज आणि खराब त्वचा होते. उन्हाळ्यात त्वचेची डबल काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्यात त्वचेची (Skin) काळजी घेण्यासाठी तुम्हाला समर केअर प्रोडक्ट्स बाजारात मिळतील, पण तुम्ही घरगुती उपायांनीही चमकदार आणि निरोगी त्वचा मिळवू शकता. पुदीना आपल्या आरोग्यासोबतच आपल्या त्वचेसाठी देखील खूप जास्त फायदेशीर (Beneficial) आहे. पुदिन्यात असलेले औषधी गुणधर्म त्वचेला आतून दुरुस्त करतात. विशेष म्हणजे आपण घरचे-घरी पुदिन्यापासून काही फेसपॅक तयार करून चेहऱ्यावर लावू शकता.

काकडी आणि पुदीना

उन्हाळ्यात त्वचेला हायड्रेट ठेवणे खूप गरजेचे आहे. यासाठी तुम्ही काकडीची मदत घेऊ शकता. काकडी चेहऱ्यावर लावल्याने काही वेळाने तुमची त्वचा चमकू लागते. पुदीना त्वचेला थंड ठेवू शकतो आणि दीर्घकाळ ताजे ठेवू शकतो. किसलेल्या काकडीचा रस एका भांड्यात ठेवा आणि त्यात पुदिन्याच्या पानांची पेस्ट किंवा रस घाला. हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा आणि कोरडा राहू द्या. त्यानंतर वीस मिनिटांनी आपला चेहरा थंड पाण्याने धुवा.

तुळस आणि पुदीना

पुदिन्याप्रमाणे तुळशीमध्येही औषधी गुणधर्म आहेत. आरोग्याप्रमाणे ते त्वचेसाठीही फायदेशीर मानले जाते. ब्लेंडरमध्ये तुळस आणि पुदिन्याची पाने घालून मिक्स करा. तुम्हाला हवे असल्यास त्यात कडुलिंबाची पानेही टाकू शकता. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि कोरडी राहू द्या. काही वेळाने पाण्याने धुवा. या पद्धतीमुळे त्वचा तजेलदार होईलच, त्याचबरोबर चेहऱ्यावरील पिंपल्सचीही समस्या दूर होण्यास मदत होईल.

पुदीना आणि दही

उन्हाळ्याच्या हंगामामध्ये दह्याचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. तसेच दही आपल्या त्वचेसाठीही फायदेशीर ठरचे. पुदिन्याची सात ते आठ पाने आणि चार चमचे दही मिक्स करून त्याची बारीक पेस्ट तयार करा. त्यानंतर ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. वीस मिनिटे ही पेस्ट चेहऱ्यावर ठेवा आणि नंतर थंड पाण्याने आपला चेहरा स्वच्छ धुवा.

(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

संबंधित बातम्या : 

Health | उन्हाळ्यात ही 4 खास पेय प्या, फक्त थंडावाच नाही तर अनेक आजारही दूर राहण्यास मदत होईल!

Hair | घामामुळे केस कोरडे आणि निर्जीव होऊ शकतात, हे टाळण्यासाठी या टिप्स फॉलो करा

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.