लिंबाच्या मदतीने करा कोंड्याची समस्या दूर, जाणून घ्या वापर करण्याची पद्धत
लिंबाच्या रसात असलेले ॲंटी-बॅक्टेरिअल आणि ॲंटी- इन्फेक्शन गुणधर्म हे कोंडा कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. त्याशिवाय केसांमध्ये येणारी खाज कमी करण्यासाठीही लिंबाच्या रसामुळे मदत होते.
नवी दिल्ली: केसांमध्ये (hair) कोंडा (dandruff) होणं ही आजकाल सामान्य समस्या झाली आहे. मात्र आजकाल लोकं कोंड्याची समस्या खूप हलक्यात घेतात आणि त्याकडे जास्त लक्ष देत नाहीत. केसांमध्ये खूप दिवस कोंडा राहिल्यास तो त्रासदायक ठरू शकतो. काही घरगुती उपायांनी कोंड्याची समस्या दूर होऊ शकते. तुम्हालाही कोंड्याची समस्या असेल तर लिंबाचा (lemon)वापर करणे उपयुक्त ठरू शकेल.
लिंबाच्या रसात असलेले ॲंटी-बॅक्टेरिअल आणि ॲंटी- इन्फेक्शन गुणधर्म हे कोंडा कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. त्याशिवाय केसांमध्ये येणारी खाज कमी करण्यासाठीही लिंबाच्या रसामुळे मदत होते.
त्याशिवाय कोंडयाची समस्या दूर करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल आणि लिंबाच्या रसाचा वापर करावा. त्यासाठी 1 चमचा ऑलिव्ह ऑईलमध्ये 1 चमचा लिंबाचा रस घालून नीट मिक्स करावे. हे मिश्रण तुमचे केस आणि स्काल्पवर लावून हलक्या हाताने मसाज करावा. याचा नियमितपणे वापर केल्यास अपेक्षित फरक दिसून येईल.
केसांतील कोंडा कमी करण्यासाठी कोरफडीचा रस आणि लिंबाचा वापर केल्यास फायदा होऊ शकतो. त्यासाठी एका बाऊलमध्ये 3 चमचे कोरफडीचा रस घ्यावा. त्यामध्ये थोडा लिंबाचा रस मिसळावा. हे मिश्रण केस आणि स्काल्पवर लावून 15 मिनिटे ठेवावे. याचा नियमितपणे वापर केल्यास कोंड्याची समस्या दूर होऊ शकते .
नारळाचे तेल हे केसांसाठी फार लाभदायक असते. केसात कोंडा झाला असेल तर नारळ तेल व लिंबाच्या रसाचा वापर करणे प्रभावी ठरू शकेल. त्यासाठी एका भांड्यात 2 चमचे नारळाचे तेल घ्यावे.
त्यामध्ये लिंबाचा रस घालून मिश्रण नीट एकत्र करावे. कापसाच्या बोळ्याच्या मदतीने हे मिश्रण स्काल्पला नीट लावावे. अंदाजे 1 तास हे मिश्रण केसांवर तसेच राहू द्यावे. त्यानंतर पाण्याने केस स्वच्छ धुवावेत.