होळी खेळताना नखांवर रंग लागलाय? जाणून घ्या नखांचा बचाव करण्याचे प्रभावी उपाय!

होळी हा रंगांचा आणि आनंदाचा सण आहे, परंतु तो आपल्या त्वचेच्या आरोग्यावर नक्कीच परिणाम करतो.

होळी खेळताना नखांवर रंग लागलाय? जाणून घ्या नखांचा बचाव करण्याचे प्रभावी उपाय!
Follow us
| Updated on: Mar 29, 2021 | 4:34 PM

मुंबई : होळी हा रंगांचा आणि आनंदाचा सण आहे, परंतु तो आपल्या त्वचेच्या आरोग्यावर नक्कीच परिणाम करतो. रंगांमध्ये उपस्थित रसायने, विषारी घटक आणि कृत्रिम रंगद्रव्य यामुळे त्वचेची जळजळ आणि इतर अनेक समस्या उद्भवतात. ही रसायने कधीकधी त्वचेच्या तीव्र कोरडेपणाच्या समस्येस देखील कारणीभूत ठरू शकतात, ज्या बरे होण्यास बराच कालावधी लागतो. (Use These tips to remove Holi colors from nails)

उपचार करण्यापेक्षा बचाव करणे चांगले!

होळीच्या उत्सवात कोणत्याही रंगाचा वापर टाळणे, किंवा होळी खेलणे टाळणे हा त्या सणांवर पूर्णपणे अन्याय आहे. परंतु, रासायनिक रंगांऐवजी नैसर्गिक आणि हर्बल पर्यायांची निवड करणे, केव्हाही चांगले ठरेल. बाजारात नैसर्गिक रंगांची एक मोठी श्रेणी आहे, जी फुलांच्या पाकळ्या आणि इतर खाद्य सामग्रीपासून बनवली जाते. हे केवळ विषाणूंचा धोका कमी करत नाही, तर पर्यावरणास देखील अनुकूल आहेत.

बाजारात मोठ्या प्रमाणात स्किनकेयर उत्पादने उपलब्ध आहेत. ही उत्पादने केस आणि त्वचेच्या समस्यांचे निराकरण करतात. परंतु, आपल्या शरीराचे काही भाग मात्र दुर्लक्षित राहतात. शरीराच्या त्या अवयवांपैकी एक म्हणजे आपली नखे, ज्यास सर्वात जास्त समस्यांचा सामना करावा लागतो. नेल केअर उत्पादनांच्या वापरामुळे अनेकदा नखे तसेच क्यूटिकलचे जास्त नुकसान होते.

या सर्व समस्या नाहीशा करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी काही सोप्या टिप्स घेऊन आलो आहोत.. ज्या होळीच्या वेळी नखांची काळजी घेण्यासाठी देखील प्रभावी ठरतील…

‘या’ टिप्स नक्की ट्राय करा!

– दररोज झोपायच्या आधी, आपल्या नखांवर एक ते दोन थेंब तूप किंवा काही थेंब तेलाने मसाज करा.

– होळीच्या आधी रात्री नेल पेंटचा जाड थर लावल्यास मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. यामुळे आपल्या नखांमध्ये आणि होळीच्या रंगांमध्ये नेलपेंट कव्हर म्हणून काम करेल.

– लांब नखांवर, नखांच्या अंतर्गत भागावर तेलाने किंवा तुपाने मसाज करणे देखील फायदेशीर ठरेल. यामुळे होळीचे रंग निघून जातील आणि नखे निरोगी होतील.

– आपल्या त्वचेवरील आणि नखांमधील गडद रंग काढून टाकण्यासाठी आपण आपल्या नखांभोवती लिंबाची उरलेली साल देखील घासू शकता. या सालीने त्वचेवर आणि नखांवर स्क्रब करा आणि नंतर ती भाग पाण्याने धुवा.

– नारळाचे तेल कॉटन बॉलवर घेऊन ते आपल्या नखांवर लावून ठेवू शकता, जे सहजपणे नाखांवरील रंग काढून टाकेल.

– नखे गुळगुळीत आणि सुव्यवस्थित ठेवल्यास रंगांमुळे नखे खराब होण्याची शक्यता देखील कमी होते. आपल्या नखांच्या अरील नैसर्गिक थर देखील नखे या रंगांमुळे खराब होऊ नये म्हणून फायदेशीर ठरतो. या सोप्या टिप्सचे अनुसरण केल्याने जबरदस्त परिणाम होईल. तसेच, आपण आपली नखे आणि त्वचेचे नुकसान न होऊ देता, आपल्या नियमित रुटीनमध्ये परत येऊ शकाल

संबंधित बातम्या : 

(Use These tips to remove Holi colors from nails)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.