Skin Care : तजेलदार आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी ‘हा’ फेसपॅक चेहऱ्याला लावा!
तजेलदार त्वचा मिळवण्यासाठी आपल्या चेहऱ्याची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. कारण जोपर्यंत आपण त्वचेची विशेष काळजी घेणार नाहीत. तोपर्यंत आपली त्वचा सुंदर होत नाही.
मुंबई : तजेलदार त्वचा मिळवण्यासाठी आपल्या चेहऱ्याची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. कारण जोपर्यंत आपण त्वचेची विशेष काळजी घेणार नाहीत. तोपर्यंत आपली त्वचा सुंदर होत नाही. सुंदर त्वचा मिळवण्यासाठी दरवेळी बाजारातून महागड्या क्रिम आणण्याची काही गरज नाहीतर आपण घरगुती उपाय करूनही सुंदर त्वचा मिळू शकतो. यासाठी आपल्याला काही घरगुती फेसपॅक वापरावे लागतील. (Use this face pack to get radiant and glowing skin)
सुंदर त्वचा मिळवण्यासाठी आपण दररोज सकाळी बेसन पीठ, गुलाब पाणी, चंदन पावडर आणि लिंबाचा फेसपॅक आपल्या चेहऱ्याला लावला पाहिजे. ज्यामुळे आपली त्वचा सुंदर आणि चमकदार दिसण्यास मदत होते. हा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी आपल्याला एक चमचा बेसन पीठ, दोन चमचे गुलाब पाणी, चार चमचे लिंबाचा रस आणि दोन चमचे चंदन पावडर लागणार आहे.
हा फेसपॅक तयार करण्यासाठी वरील सर्व साहित्य एकत्र मिक्स करा. त्यानंतर त्याची चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. त्यानंतर ही पेस्ट तीस मिनिटे आपल्या चेहऱ्यावर राहूद्या. त्यानंतर चेहऱ्याचा मसाज करा आणि कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा. हा फेसपॅक आपण दर आठ दिवसातून दोन वेळ लावायला हवा. यामुळे चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.
दूधामध्ये मसूर डाळ, चंदन पावडर आणि संत्र्याचं साल रात्रभर भिजवा. दुसऱ्या दिवशी सकाळी हे सर्व घटक वाटून घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि सुकू द्या. 20 मिनिटानंतर सर्क्युलर मोशनमध्ये हळूवार ते स्वच्छ करा. नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. यामुळे तुमची त्वचा उजळेल आणि सोबतच चेहऱ्यावरील अनावश्यक केसही दूर करेल.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Hair Care | थंडीच्या दिवसांत रुक्ष केसांच्या समस्येमुळे हैराण? मग ‘हे’ हेअर मास्क नक्की ट्राय करा!https://t.co/R06JFAcxU4#HairMask #HairCare #beautytips
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 29, 2020
(Use this face pack to get radiant and glowing skin)