Skin Care : चेहऱ्यावरील पिपल्सची समस्या दूर करण्यासाठी ‘हा’ फेसपॅक अत्यंत फायदेशीर!
कडुलिंबाची पाने अनेक अर्थाने गुणकारी आहेत. त्वचेपासून अनेक समस्या दूर करण्यासाठी लिंबाची पाने अत्यंत फायदेशीर आहेत. जर आपण दररोज चेहऱ्यासाठी लिंबाची पाने वापरली तर आपल्या त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.
मुंबई : कडुलिंबाची पाने अनेक अर्थाने गुणकारी आहेत. त्वचेपासून अनेक समस्या दूर करण्यासाठी लिंबाची पाने अत्यंत फायदेशीर आहेत. जर आपण दररोज चेहऱ्यासाठी लिंबाची पाने वापरली तर आपल्या त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. या पानांमध्ये अँटीबॅक्टीरियल आणि अँटीफंगल गुणधर्म भरलेले आहेत. याचा उपयोग त्वचेसंबंधी विविध व्याधी दूर करण्यास होतो. त्याचबरोबर इतर विविध स्वरुपांच्या व्याधींवरही कडुलिंबांची पाने गुणकारी आहेत. (Use this special face pack to get rid of the problem of pimples on the face)
चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या दूर करण्यासाठी आपण लिंबाच्या पानांचा खास फेसपॅक तयार करू शकतो. ज्यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या दूर होण्यास मदत मिळेल. यासाठी आपल्याला ताज्या कडुलिंबाच्या पानांची पेस्ट, हळद आणि बेसन पीठ लागणार आहे. वरील सर्व साहित्य एकत्र मिक्स करून त्याची चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्याला लावा. ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील सर्व समस्या दूर होण्यास मदत होते.
जर तुमच्या शरीराला वारंवार खाज येत असेल तर त्यापासून सुटका मिळवण्यासाठी कडुलिंबाची पाने उपयुक्त ठरतील. ज्या ठिकाणी खाज उठते, त्या ठिकाणी दररोज कडुलिंबांच्या पानांचे तेल लावा आणि शक्य झाल्यास पाने खाण्याचाही प्रयत्न करा. जर तुम्हाला थेट पाने खाता येत नसतील तर त्या पानांचे वाटप करून त्यापासून छोट्या छोट्या गोळ्या बनवा. नंतर तुम्ही त्या गोळ्या सुकवून पाण्यासोबत सकाळी आणि रात्री दोन दोन गोळ्या खाऊ शकता.
कडुनिंबामध्ये भरपूर कॅल्शियम आणि लोह असते, जे शरीराची कमजोरी दूर करते आणि हाडे मजबूत बनवते. त्याबद्दल चांगली गोष्ट अशी आहे की, यामुळे आपल्या शरीरावर कोणत्याही प्रकारे दुष्परिणाम होत नाहीत. कडूलिंब आपल्या शरीराला डिटॉक्स करण्याचे काम करते. याशिवाय हे आपल्या शरीरातील साखरेच्या पातळीवर नियंत्रण ठेवण्यास देखील प्रभावी आहे.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Use this special face pack to get rid of the problem of pimples on the face)