बटाट्याचा वापर करून मिळवा चमकदार त्वचा, डाग सर्कलपासूनही कायमची सुटका, कशी वाचा…

एक साधा बटाटा तुमच्या त्वचेवर जादूसारखा प्रभाव दाखवू शकतो, डागांपासून ते काळ्या वर्तुळांपर्यंतच्या सर्व समस्या दूर करू शकतो बटाटा. कच्चा बटाटयाचा वापर करून, अनेर स्किनकेअर टिप्स फॉलो करून, त्वचा चमकदार बनविता येते.

बटाट्याचा वापर करून मिळवा चमकदार त्वचा, डाग सर्कलपासूनही कायमची सुटका, कशी वाचा...
Follow us
| Updated on: May 28, 2022 | 6:56 PM

मुंबई : प्रत्येक घराच्या स्वयंपाकघरात मिळणारा बटाटा (Potato) फक्त खायलाच रुचकर नसतो, तर त्यात असे अनेक गुणधर्म असतात. ज्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात. कच्चा बटाटा त्वचेवर विशीष्ट पद्धतीने वापरल्यास, घरच्या घरीच त्वचेला चमकदार बनविता येते. जर तुमची त्वचा उन्हामुळे काळी पडली असेल आणि रंग खराब झालेला दिसत असेल, तर तुम्ही बटाटे वापरून त्वचा पुन्हा पहिल्यासारखी चांगली बनवू शकता. होय, साध्या बटाट्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन बी1, बी3, प्रोटीन, फॉस्फरस आणि पोटॅशियम सारखे घटक असतात, जे त्वचेच्या पेशी दुरुस्त करण्याचे काम करतात. बटाटा त्वचेसाठी खूप चांगला मानला जातो. हे तुमच्या डोळ्यांखालील काळी वर्तुळे (Dark circles) दूर करू शकते, तसेच तुमची त्वचा डागहीन करू शकते. उन्हाळ्यात बटाटा त्वचेला थंड ठेवण्याचे काम करतो, तसेच त्वचेवर जळजळ होण्याची समस्याही दूर (The problem is gone) करतो.

टॅनिंग काढण्यासाठी

जर तुम्हाला त्वचेचे टॅनिंग काढायचे असेल तर तुम्ही उकडलेल्या बटाट्याचा फेस पॅक बनवू शकता. यासाठी एक उकडलेला बटाटा घ्या, त्यात एक चमचा मध आणि एक चमचा क्रीम मिसळा आणि हा फेस पॅक मानेपासून चेहऱ्यापर्यंत लावा. 15 मिनिटे तसेच राहू द्या, त्यानंतर सामान्य पाण्याने चेहरा धुवा. आठवड्यातून किमान दोन दिवस हे करा.

डाग घालवण्यासाठी

जर तुमच्या चेहऱ्यावर मुरुमांचे किंवा इतर कोणत्याही प्रकारचे डाग असतील तर कच्चे बटाटे धुवून सोलून घ्या. ते किसून घेऊन चेहऱ्याला मसाज करा. १० मिनिटे मसाज केल्यानंतर चेहरा असाच राहू द्या. साधारण 10 मिनिटांनी चेहरा सामान्य पाण्याने धुवा. असे दोन ते तीन दिवस केल्याने त्वचेवर चांगले परिणाम दिसायला लागतील.

कोरडया त्वचेसाठी

तुमची त्वचा खूप कोरडी असेल, तर बटाटा तुमची त्वचा मऊ बनवण्याचे आणि तिला जीवन देण्याचे काम करेल. ते वापरण्यासाठी बटाटे धुवून सोलून किसून घ्या. त्यात दोन थेंब ग्लिसरीन, दोन थेंब गुलाबजल, अर्धा चमचा मध आणि अर्धा चमचा तांदळाचे पीठ टाका. ते मिक्स करून चेहऱ्यावर लावा. सुकल्यानंतर चेहरा धुवा. असे दोन ते तीन वेळा केल्याने त्वचेला खूप आराम मिळेल.

काळी वर्तुळे दूर करण्यासाठी

जर तुमच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे असतील तर बटाटा धुऊन चोळल्यानंतर त्याचा रस काढा आणि कापसाच्या मदतीने हा रस त्या भागात लावा. हे रोज रात्री झोपताना करा. काही काळानंतर तुम्हाला काळी वर्तुळे हलकी होऊ लागतील. तुम्हाला हवे असल्यास बटाट्याचे तुकडेही डोळ्यांवर ठेवू शकता.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.