Skin Care : त्वचेच्या टोननुसार कोणते वॅक्सिंग चांगले आहे ते जाणून घ्या, वाचा अधिक!
त्वचेवरील नको असलेले केस काढण्यासाठी आपण वॅक्सिंगचा वापर करतो. नको असलेले केस काढण्यासाठी वॅक्सिंग सर्वात सुरक्षित पद्धत मानली जाते. सतत वॅक्समुळे केसांची वाढ कमी होते आणि त्वचेवरील मृत पेशी काढून टाकण्यास मदत होते. बाजारामध्ये फ्रूटपासून ते चॉकलेट वॅक्सपर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
मुंबई : त्वचेवरील नको असलेले केस काढण्यासाठी आपण वॅक्सिंगचा वापर करतो. नको असलेले केस काढण्यासाठी वॅक्सिंग सर्वात सुरक्षित पद्धत मानली जाते. सतत वॅक्समुळे केसांची वाढ कमी होते आणि त्वचेवरील मृत पेशी काढून टाकण्यास मदत होते. बाजारामध्ये फ्रूटपासून ते चॉकलेट वॅक्सपर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पण तुम्हाला माहित आहे का तुमच्या त्वचेसाठी सर्वोत्तम वॅक्स नेमके कोणते आहे?
1. हॉट वॅक्स
बहुतेक लोक घरी किंवा पार्लरमध्ये हॉट वॅक्स वापरतात. ते तयार करण्यासाठी साखर, लिंबू, मध वापरले जाते. ते उच्च तापमानात वितळले जाते. जेव्हा ते थंड होते, तेव्हा ते त्वचेवर लावले जाते आणि पट्ट्या ठेवून दाबल्या जातात. नंतर पट्टी वाढलेल्या केसांच्या दिशेने ओढली जाते. ही सर्वात जुनी आणि प्रभावी पद्धत आहे.
1. कोल्ड वॅक्स
कोल्ड वॅक्स बाजारात सहज उपलब्ध होते. हे पॅराफिन वॅक्स आणि रेसिन घटकांपासून बनवले जाते. आपण ते रेडीमेड मार्केटमधून खरेदी करू शकता. अधिक प्रमाणात जर आपल्याला वॅक्सिंग करायचे असेल तर कोल्ड वॅक्स हा खूप चांगला पर्याय आहे.
वॅक्सचे प्रकार
1. साखर लिंबू वॅक्स
लिंबू आणि साखर मिसळून तयार करण्यात येणारे वॅक्स हे नैसर्गिक असते. हे वॅक्स बनवताना लक्षात ठेवा की वॅक्स खूप गरम असते. कारण यामुळे त्वचेला जळजळ होऊ शकते. वास्तविक या दोन्ही नैसर्गिक गोष्टी आहेत. ज्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत आणि त्वचेला हानी पोहचवत नाहीत. हे तुमच्या टॅनिंगची समस्या दूर करण्यात मदत करते.
2. चॉकलेट वॅक्स
ते बनवण्यासाठी तुम्ही कोको किंवा डार्क चॉकलेट वापरू शकता. हे त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. यात अँटी ऑक्सिडंट आणि अँटी एजिंग गुणधर्म आहेत. जे त्वचा मऊ ठेवण्यास मदत करतात. ज्या लोकांना जास्त वेदना होतात ते चॉकलेट वॅक्स बनवू शकतात. हे वेदना कमी करण्यास मदत करते आणि त्वचा सुंदर ठेवते. हे केल्यानंतर, चॉकलेटचा थोडासा वास येतो.
3. कोरफड जेल
कोरफड असलेली उत्पादने त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात. यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. जे वॅक्सिंगमुळे लालसरपणा आणि अॅलर्जीपासून मुक्त होण्यास मदत करते.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Waxing according to skin tone is beneficial)