सावधान… गोरे दिसण्यासाठी तुम्ही वापरत आहात स्किन व्हाइटिंग क्रीम; या क्रीमने होऊ शकतं त्वचेचं नुकसान

चेहरा निखळ, तेजस्वी आणि गोरा दिसावा. चारचौघात आपण सुंदर दिसावं अशी प्रत्येक तरूणीनी स्वप्न असतात. आणि याचाच फायदा ब्युटी क्रीम तयार करणारी कंपनी घेत असते. अशाच हजारो क्रीम ने मार्केट मध्ये उपलब्ध आहेत. तरुणी अशा क्रीमचा मोहात पडतात आणि त्वचेच नुकसान करून घेतात.

सावधान... गोरे दिसण्यासाठी तुम्ही वापरत आहात स्किन व्हाइटिंग क्रीम; या क्रीमने होऊ शकतं त्वचेचं नुकसान
Whitening creams
Follow us
| Updated on: Dec 14, 2021 | 6:35 PM

मुंबई: राधा क्यों गोरी में क्यों काला… आजही किती प्रचार केला तरी रंगभेद अनेक ठिकाणी जाणवतो. काळा, सावळा रंगामुळे तरुणींना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. कधी घरात तर कधी ऑफिस मध्ये. आपण गोर दिसावं असं या मुलीचं अगदी मुलांचं पण स्वप्न असतं. गो-या रंगाकडे लोकं सहज आकर्षित होतात. मग आपण गोरे कसे दिसणार यासाठी यांची धावपळ सुरू होते. आणि त्यातून याचे हात वळतात या स्किन व्हाइटिंग क्रीमकडे. मार्केट मध्ये असंख्य आणि वेगवेगळ्या कंपनीच्या क्रीम उपलब्ध आहेत. मग यातील कुठली क्रीम आपल्या त्वचेला सूट होईल हे न जाणून घेता आपण इन्फिरिऑरिटी कॉम्प्लेक्समध्ये या क्रीमची खरेदी करतो. मात्र अशा प्रकारे न माहिती घेता क्रीम घेतल्यास याचे वाईट परिणाम होऊ शकतात. आज आपण जाणून घेणार आहोत योग्य क्रीम न वापरल्यास होणारे परिणाम

नेमकी व्हाईटनिंग क्रीम म्हणजे काय

मार्केट मध्ये वेगवेगळ्या क्रीम उपलब्ध आहेत. आणि या क्रीम लावणे यात काही वाईट नाही. मात्र कुठली क्रीम आपल्या त्वचेसाठी योग्य आहे, ती कधी वापरायची, नेमकी कुठे लावायची, किती लावायची हे महत्त्वाचे आहे. दुकानात डे क्रीम, नाईट क्रीम, सनस्क्रीन किंवा मॉइश्चरायझर उपलब्ध आहे. या क्रीम आपण आपलं सौंदर्य वाढविण्यासाठी घेतो. अगदी आपण गोरे दिसण्यासाठी पण क्रीम आहेत. मात्र सावधान या क्रीममध्ये पॅराबेन्स नावाचे धोकादायक पदार्थ असतात, जे तुमच्या त्वचेचे नुकसान पोहोचवू शकतं. आपल्या स्किन चा रंग हा मेलेनिनच्या स्तरावर अवलंबून असतो.

म्हणून या क्रीम मध्ये मेलेनिनचा स्तर कमी करण्याची क्षमता आवश्यक आहे. मेलेनिनचा स्तर कमी झाल्याने तुमचा चेहरा उजळतो. महत्त्वाचं म्हणजे या क्रीममध्ये दोन प्रकारचे ब्लीचिंग एजंट असतात. एक हायड्रोक्विनोन आणि दुसरं कॉर्टिकोस्टिरॉईड्स. या क्रीममध्ये हायड्रोक्विनोनचे प्रमाण नेहमीच 4% पेक्षा कमी असावे, असा सल्ला त्वचा तज्ज्ञ देतात. पण हे डॉक्टर हेही सांगतात की त्वचा गोरी करणारी क्रीम जास्त काळ वापरू नये.

आता जाणून घेऊयात अशा क्रीमने होणारे परिणाम

नॅशनल हेल्थ सर्व्हिसने केलेल्या रिसर्च नुसार अशा स्किन लाईटनिंग क्रीमचे अनेक वाईट परिणाम होतात.

साईड इफेक्ट

– त्वचेची जळजळ आणि सूज – लालसरपणा – त्वचेला खाज सुटणे – त्वचा लवचिक होणे – त्वचेचा रंग गडद होतो – त्वचेवर अनावश्यक चट्टे आणि डाग पडतात.

त्यामुळे स्वतः वर प्रेम करा. खूष आणि आनंदी राहा. म्हणजे हा आनंद तुमच्या चेहऱ्यावर दिसेल. आणि तुम्ही सुंदर दिसाल. म्हणतात ना मन सुंदर असेल तर रंग मायने ठेवत नाही. आयुष्य हे चांगल्या विचाराने चांगल्या मनाने सुंदर बनतं. त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या, व्यायाम करा आणि योग्य आहार घ्या. आणि आपल्या त्वचेची काळजी घ्या. अगदी सुंदर देण्यासाठी या क्रीम पेक्षा जुन्या लोकांनी सांगितलेले घरगुती उपाय करा. ते उपाय कधी पण चांगले.

संबंधित बातम्या:

राजकारणातील परस्पर विरोधी चित्र; आधी फेटा बांधला, आता राम शिंदे, रोहित पवारांनी एकमेकांकडे पाहिलंही नाही!

St worker strike : कामावर हजर न राहिलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या बडतर्फ प्रक्रियेला सुरुवात-सूत्र

कोरेगाव भीमाच्या विकासासाठी 100 कोटी, शौर्य दिनाचा कार्यक्रम राज्य सरकार पार पाडणार; धनंजय मुंडेंची मोठी घोषणा

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.