हिवाळ्यात का वाढते कोंड्याची समस्या? जाणून घ्या कारणे
डोक्यातील कोंड्याचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे टाळू आणि केसांमध्ये लहान पांढरा कोंडा दिसणे हे बऱ्याचदा कपड्यांवरही पडतात. त्यामुळे डोक्यात खाज सुटणे, जळजळ होणे अशा अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात.
हिवाळ्यात केसांमधील कोंडा ही एक सामान्य परंतु त्रासदायक समस्या आहे. त्यामुळे डोक्याला खाज येण्याची आणि केस गळण्याची समस्या उद्भवू शकते. कोंड्याच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी लोक अनेक प्रकारचे सौंदर्य उत्पादने वापरतात किंवा घरगुती उपायांचा अवलंब करतात. मात्र यातून अनेकदा कोणताही परिणाम होत नाही जेव्हा टाळूमध्ये आद्रतेची कमतरता असते तेव्हा ती कोरडे होऊ लागते आणि यामुळे कोंड्याची समस्या देखील होते.जेव्हा व्यक्ती वारंवार डोके खाजवते तेव्हा ही स्थिती बिघडते पण डोक्यात कोंडा होण्याचे कारण काय आहे आणि ते कसे नियंत्रित केले जाऊ शकते हे जाणून घेऊ.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार हिवाळ्यात टाळू कोरडा झाल्यामुळे कोंड्याची समस्या वाढते कारण या ऋतूमध्ये लोक गरम पाण्याने अंघोळ करतात आणि त्यामुळे टाळू खराब होऊन त्यात कोंडा होऊ लागतो.
जे लोक डोक्याला जास्त तेल लावतात त्यांनाही कोंड्याची समस्या असू शकते कारण तेल लावल्याने बाहेरची घाण डोक्यावर जमा होते. त्यामुळे त्याचे रूपांतर कोंड्यात होते. याशिवाय खाण्यापिण्याच्या सवयींकडे नीट लक्षण देणे हे देखील याचे एक कारण असू शकतं जे लोक आपल्या आहाराकडे लक्ष देत नाहीत आणि पचनसंस्था नीट नसते. त्यांनाही कोंड्याची समस्या होऊ शकते.
कशी घ्यावी काळजी
जर तुम्हाला कोंड्याची समस्या असेल तर बाजारात अनेक प्रकारचे अँटी डॅन्ड्रफ शाम्पू उपलब्ध आहेत. जे कोंडा दूर करण्यास मदत करतात याशिवाय जर ही समस्या गंभीर झाली असेल तर तुम्ही एखाद्या तज्ञाशी बोला जे तुम्हाला योग्य शाम्पू सांगण्यास सक्षम असतील.
आरोग्यासोबतच मानसिक तणावाचा त्वचेवर आणि केसांवरही परिणाम होतो. त्यामुळे तुम्ही योग, ध्यान आणि शारीरिक व्यायामाद्वारे तणाव कमी करण्याचा प्रयत्न करू शकतात. हे केवळ तुमच्या त्वचेसाठी आणि केसांसाठीच नाही तर संपूर्ण शरीरासाठी ही फायदेशीर ठरेल.
तेल लावल्याने टाळूला आद्रता मिळते ज्यामुळे टाळू कोरडी होत नाही आणि कोंडाची समस्या टाळता येते. तसेच केसांना पोषणही मिळू शकते पण जास्त वेळ तेल लावू नका. तर आठवड्यातून दोनदा तेल लावा. केस धुण्याच्या तीन ते चार तास आधी तेल लावण्याचा प्रयत्न करा.