थंडीत त्वचेवर पिंपल्स वाढतायेत का? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
हिवाळा लागला की थंडीचा परिणाम हळूहळू जाणवू लागतो. हा परिणाम अगदी त्वचेवरही होतो. हिवाळा आपल्या त्वचेसाठी अनेक बदल घडवून आणतो. यामुळे काही लोकांना पिंपल्सची समस्या उद्भवू लागते. जर तुम्हीही हिवाळ्यात पिंपल्सच्या समस्येने त्रस्त असाल तर तुम्ही काही टिप्स फॉलो करू शकता. चला तुम्हाला या टिप्सबद्दल.
हिवाळ्यात असे अनेक आजार असतात, ज्याचे परिणाम थंडी वाढली की दिसू लागतात. अगदी छोट्या मोठ्या समस्याही तुम्ही त्याला म्हणू शकता. हिवाळ्यात त्वचेची काळजी घेणे खूप गरजेचे असते. थंड हवामानात त्वचेतून ओलावा गायब होऊ लागतो. यामुळे त्वचा कोरडी पडल्यावर छिद्रे बंद होऊ लागतात. त्यामुळे त्वचा नीट स्वच्छ होत नाही. चेहऱ्यावरील धूळ आणि घाण स्वच्छ केली नाही तर पिंपल्स बाहेर पडू लागतात, असं त्वचा तज्ज्ञांचं म्हणतात.
थंडीचा हंगाम सुरू आहे, पण या ऋतूत काही लोकांना पिंपल्स आणि मुरुम होऊ लागतात. पिंपल्स दूर होण्यामागचं कारण खाणं-पिणंही आहे. कारण थंडीत आपण भरपूर तेलकट आणि मसालेदार खाऊ लागतो, ज्याचा परिणाम त्वचेवर दिसून येतो. जाणून घेऊया हिवाळ्यात येणारे पिंपल्स कसे टाळावेत.
मॉइश्चरायझ करा
हिवाळ्यात त्वचा अधिक कोरडी पडते. यामुळे त्वचेतील तेलाचे संतुलन बिघडू शकते, ज्यामुळे पिंपल्स होतात. त्यामुळे चेहऱ्याला मॉइश्चरायझ करणं खूप गरजेचं आहे. सौम्य नॉन-कॉमेडोजेनिक (जे छिद्र बंद करत नाही) मॉइश्चरायझर वापरा.
चेहरा स्वच्छ ठेवा
हिवाळ्यात त्वचा कोरडी असूनही चेहऱ्यावर पिंपल्सची समस्या कायम राहू शकते. कारण त्वचेच्या छिद्रांमध्ये साचलेली धूळ, तेल आणि घाण यामुळे मुरुम होऊ शकतात. दिवसातून दोनदा हलक्या फेस वॉशने चेहरा धुणे महत्वाचे आहे. यामुळे त्वचेला ताजेपणा मिळतो आणि घाण काढून त्वचा स्वच्छ राहते.
त्वचेला वारंवार स्पर्श करू नका
त्वचेला वारंवार स्पर्श केल्यानं हातातील घाण आणि बॅक्टेरिया त्वचेवर जमा होऊ शकतात, ज्यामुळे पिंपल्स वाढू शकतात. स्वच्छ हातानेच चेहऱ्याला स्पर्श करा आणि पिंपल्स फोडण्याचा प्रयत्न करू नका कारण यामुळे इन्फेक्शन वाढू शकते.
कडुनिंबाचे पाणी
कडुनिंबाचे पाणी पिंपल्स दूर करण्यास देखील मदत करू शकते. यासाठी सर्वप्रथम कडुनिंबाची काही पाने घेऊन पाण्यात उकळून घ्यावीत. पाणी उकळल्यानंतर ते फिल्टर करून स्प्रे बाटलीत भरून घ्यावे. दिवसातून तीन वेळा या कडुनिंबाच्या पाण्याचा उपयोग केल्यास उपयुक्त ठरू शकते.
एक लक्षात घ्या, काही छोटे आणि सोपे उपाय करायचे आहेत. यामध्ये दिवसातून दोनदा हलक्या फेस वॉशने चेहरा धुणे, स्वच्छ हातानेच चेहऱ्याला स्पर्श करा आणि पिंपल्स फोडण्याचा प्रयत्न करू नका, चेहऱ्याला मॉइश्चरायझ करणं खूप गरजेचं आहे. या गोष्टी केल्यास तुम्हाला फायदा होऊ शकेल.
(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)