हिवाळ्यातही तुमची त्वचा राहील मुलायम, फक्त ‘या’ तेलाचा करा वापर
जर तुमची त्वचा कोरडी होत असेल आणि ओठ फाटत असतील तर त्यापासून मुक्तता मिळवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये या तेलाचा वापर नक्की करु शकता. यामुळे तुम्हाला फरक जाणवेल
Winter Skincare Tips : दिवाळी संपली की आपल्याला हिवाळ्याची चाहूल लागते. हिवाळा ऋतू अनेकांना आवडतो. हिवाळा ऋतू अल्हायदायक असल्याने अनेक लोक आतुरतेने वाट पाहत असतात. पण हिवाळा येताना आपल्या सोबत त्वचेशी संबंधित अनेक समस्या घेऊन येतो. त्यापैकीच एक आणि सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे कोरडी त्वचा आणि दुसरी समस्या म्हणजे ओठ फुटणे.
हिवाळ्याला नुकतीच सुरुवात झाली असून अनेकांची त्वचा निर्जीव आणि कोरडी होऊ लागली आहे. तसेच लोकांचे ओठही फुटू लागलेत. वास्तविक कमी तापमानाचा आपल्या त्वचेवर सर्वाधिक परिणाम होतो. अशा परिस्थितीत हिवाळ्यात आपण आपल्या त्वचेची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. हिवाळ्यात रात्री स्किन केअर रुटीन फॉलो करणे खूप गरजेचे आहे. रात्री स्किन केअर रुटीन करून तुम्ही कोरडी निर्जीव त्वचा आणि फाटलेल्या ओठांपासून मुक्त होऊ शकतात.
खोबरेल तेल खूप फायदेशीर
खोबरेल तेल फॅटी ऍसिडने समृद्ध आहे. यामुळे त्वचा मॉइश्चराइज होण्यासोबतच आणि कोरडेपणा कमी होतो. विशेषतः हिवाळ्यात खोबरेल तेल हे नैसर्गिक मॉइश्चरायझरचे काम करते. जे त्वचेमध्ये सहजपणे शोषले जाते. त्यामुळे तुमची त्वचा दीर्घकाळ हायड्रेट राहते. खोबरेल तेलामध्ये नैसर्गिक अँटिऑक्सिडंट येतात. त्यामुळे त्वचेची जळजळ ,जखमा आणि पुरळ तसेच त्वचेशी संबंधित इतर समस्यांपासून आराम मिळण्यास मदत होते.
झोपण्यापूर्वी कसे लावाल खोबरेल तेल
चेहऱ्यावर खोबरेल तेल लावल्याने त्वचा मुलायम होते. रात्री चेहरा स्वच्छ धुऊन कोरडा केल्यावर हलक्या हाताने खोबरेल तेल लावून मसाज करा. हिवाळ्यात ओठ मऊ आणि हायड्रेट ठेवण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर करा. खोबरेल तेल कोरड्या त्वचेवर लावल्याने अँटी एजिंगसाठी उपचार म्हणून काम करते. तसेच यामुळे सुरकुत्याही कमी होतात. त्यासोबतच स्ट्रेच मार्क्सचे प्रमाणही कमी होते.