Hair care: केसांचेही करता येईल डिटॉक्स, तज्ज्ञांचे ‘हे’ उपाय लाखमोलाचे!
केसांच्या डिटॉक्ससाठी बाजारात अनेक उत्पादने उपलब्ध आहेत. मात्र तुम्ही घरच्या घरी नैसर्गिक उपायांनीही केसांचे डिटॉक्स करता येऊ शकते. तज्ज्ञांकडून त्यासाठी काही उपाय जाणून घेऊया.
नवी दिल्ली: केसांचे डिटॉक्सही (hair detox) करता येते, हे तुम्ही कधी ऐकले आहे का? शरीर आणि पाय डिटॉक्स कसे करावे हे आपल्याला माहित असेलच. पण केसांची काळजी घेण्याच्या काही उपायांचा अवलंब करून केसही डिटॉक्स केले जाऊ शकतात. आता डिटॉक्स म्हणजे काय, तर ही एक अशी प्रकारची प्रक्रिया आहे, ज्यामध्ये केसांच्या आतील घाण किंवा विषारी पदार्थ काढून टाकले जातात. केसांची नियमितपणे (hair care) काळजी घेतली नाही तर ते कोरडे आणि निर्जीव होतात आणि गळायलाही (hair fall) वेगाने सुरुवात होते. त्यामुळे केसांना पोषण देण्यासोबतच त्यांना डिटॉक्स करणं हेही खूप गरजेचं आहे. केसांच्या डिटॉक्ससाठी बाजारात अनेक उत्पादने उपलब्ध आहेत. मात्र तुम्ही घरच्या घरी नैसर्गिक (home remedies with natural ingredients) उपायांनीही केसांचे डिटॉक्स करता येऊ शकते. तज्ज्ञांकडून त्यासाठी काही उपाय जाणून घेऊया.
कोको पावडरचा उपाय
हेअर एक्सपर्ट हेली व्यास यांच्या सांगण्यानुसार, केसांची नीट काळजी घेतली गेली नाही तर त्यामुळे ते निर्जीव होतात किंवा गळू लागतात. त्यांनी केसांच्या डिटॉक्ससाठी काही उपाय सांगितले आहेत, ज्यामध्ये त्यांनी कोको पावडर आणि नारळाच्या दुधाचा हेअर मास्क बनवण्याची पद्धत सांगितली आहे. त्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात दोन चमचे कोको पावडर घ्यावी व त्यामध्ये थोडेसे नारळाचे दूध घालावे. हे मिश्रण नीट एकजीव करून केसांना लावावे. सुमारे 20 मिनिटे ते तसेच राहू द्यावे. त्यानंतर केस शांपूने स्वच्छ धुवावेत.
हर्बल रिन्स
तुम्ही शिकेकाईचा वापर करून हर्बल रिन्स तयार करू शकता. कोको पावडरचा हेअर मास्क लावल्यानंतर हे रिन्स केसांवर स्प्रे करायचे आहे. त्यासाठी एका भाड्यांचा पाणी घेऊन त्यामध्ये शिकेकाईची पाने घालून ते रात्रभर तसेच ठेवावे. तयार झालेल्या पाण्यात दोन चमचे ग्लिसरीन मिसळावे, हे केसांना मॉयश्चराइज ठेवण्याचे काम करेल. हे हेअर रिन्स आधीच तयार करून ठेवावे. हेअर मास्क केसांमधून काढल्यानंतर 20 मिनिटांनी हे हर्बल रिन्स केसांवर स्प्रे करावे.
नैसर्गिक रिन्स
तुम्ही कढीपत्त्यापासून तयार केलेल्या नैसर्गिक रिन्स वापरूनही केसांना डिटॉक्स करू शकता. एका भांड्यात पाणी घेऊन त्यात कढीपत्त्याची पाने घालून त्या पाण्याला उकळी आणा. थंड झाल्यावर ते पाणी स्प्रे बॉटलमध्ये ठेवा आणि नंतर दिवसातून एकदा ते केसांना लावा. रात्री झोपताना हे केसांवर स्प्रे केल्यास ते अधिक फायदेशीर ठरू शकते.
( टीप- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)