Beetroot Benefits : रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते बीट, जाणून घ्या त्याचे फायदे
Beetroot Benefits : आपल्या शरीर तेव्हाच नीट काम करते जेव्हा त्याला सगळे पोषक घटक मिळतात. चुकीचे आहार आणि सवयी यामुळे अनेक समस्यांचा आपल्याला सामना करावा लागू शकतो. आहारात बीटचा समावेश करणे फायद्याचे ठरु शकते. आरोग्यासाठी बीट कसे उपयुक्त ठरू शकते. जाणून घेऊया.
Benefits of Beetroot : बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्याला विविध समस्यांचा सामना करावा लागतो. तुम्ही देखील जर चुकीच्या जीवनशैलीमुळे आरोग्याकडे नीट लक्ष देऊ शकत नसाल तर तुम्हाला वेळीच सावध होणे खूप गरजेचे आहे. बैठी जीवन पद्धतीमुळे अनेकांना रक्तदाबाच्या समस्याचा सामना करावा लागतो. व्यायाम होत नसल्याने स्ट्रेस लेव्हल वाढत आहे. आहार देखील आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. पण ते देखील आता व्यवस्थित घेतला जात नाही. अशा परिस्थितीत बीट तुम्हाला मदत करु शकते. बीट खाण्याचे अनेक फायदे आहेत. जे आज आपण जाणून घेणार आहोत.
हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर
बीटमध्ये नायट्रेट्स आढळतात, जे रक्तदाब नियंत्रित ठेवतात. यामुळे रक्तवाहिन्यांना आराम मिळतो. रक्तवाहिन्यांवरील दबाव कमी होतो आणि रक्त प्रवाह सुरळीत राहतो. हिवाळ्यात विशेष काळजी घेण्याची गरज असते. कारण थंडीमुळे नसा आंकुशन पावतात. उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका असतो, त्यामुळे बीटरूट हृदयासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.
विरोधी दाहक गुणधर्म
बीटमध्ये बीटालेन्स असतात, जे जळजळ रोखण्याचे काम करते. ज्यामुळे संधिवात, मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादींना प्रतिबंध करण्यास मदत करतात.
पचनासाठी फायदेशीर
बीटरूटमध्ये आढळणारे फायबर पचनासाठी खूप फायदेशीर आहे. अन्न आतड्यात हलवण्यासाठी फायबरची गरज असते. फायबरच्या कमतरतेमुळे बद्धकोष्ठतेसारख्या समस्या उद्भवता. ज्यामुळे पचनावर परिणाम होतो. हिवाळ्यात हा त्रास वाढतो. त्यामुळे बीटरूट खाणे अधिक फायदेशीर ठरू शकते.
मेदूंच्या आरोग्यासाठी चांगले
आपला मेंदू अधिक चांगले कार्य करण्यासाठी जेव्हा रक्त प्रवाह योग्य असतो तेव्हाच मेंदुचे काम सुरळीत चालते. रक्तप्रवाहात अडथळे आल्याने आपल्या मेंदूच्या पेशी कमकुवत होऊ लागतात, त्यामुळे स्मृतिभ्रंशाची समस्या उद्भवू शकते. बीटरूटमध्ये असलेले नायट्रेट्स रक्तवाहिन्यांना आराम देतात, ज्यामुळे रक्त प्रवाह सुधारतो.
कर्करोग प्रतिबंध
बीटमध्ये असलेले बीटा-सायनाइन कर्करोगापासून बचाव करण्यास मदत करते. त्यात अँटी-ऑक्सिडंट्स देखील आढळतात, जे फ्री रॅडिकल्सच्या नुकसानापासून संरक्षण करण्यास मदत करतात. त्यामुळे बीट खाल्ल्याने कॅन्सरपासून बचाव होतो.