त्वचा आणि केसांसाठी जबरदस्त फायदेशीर ‘बेसन पीठ’, वाचा याबद्दल अधिक !

त्वचा आणि केसांना बेसन पीठ लावणे अतिशय फायदेशीर आहे. बेसन पीठाचा हेअर मास्क 2 ते 3 वेळा लावल्यास तुम्हाला केसांमध्ये बराच फरक जाणवेल.

त्वचा आणि केसांसाठी जबरदस्त फायदेशीर 'बेसन पीठ', वाचा याबद्दल अधिक !
फेसपॅक
Follow us
| Updated on: May 17, 2021 | 9:15 AM

मुंबई : त्वचा आणि केसांना बेसन पीठ लावणे अतिशय फायदेशीर आहे. बेसन पीठाचा हेअर मास्क 2 ते 3 वेळा लावल्यास तुम्हाला केसांमध्ये बराच फरक जाणवेल. बेसन पीठाचा हेअर मास्क लावल्याने केस गळती कमी होते आणि आपले केस मजबूत, मुलायम आणि चमकदार होतात. बेसन पीठ आपल्या चेहऱ्यासाठी फायदेशीर आहे. बेसन पीठात गुलाब पाणी घालावे आणि ही पेस्ट संपूर्ण चेहऱ्याला लावा. यामुळे आपला चेहरा कोमल होईल. बेसन पीठाचा स्क्रब म्हणून देखील आपण उपयोग करू शकतो. (Beneficial gram flour for skin and hair)

हळद आणि बेसन पीठाचे उठणे तयार करण्यासाठी, एक चमचा हळद आणि दोन चमचे बेसन पीठ घ्या. त्यात एक चमचा मलई आणि थोडे दूध मिसळून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. हा फेस पॅक कोरडा झाल्यावर कोमट पाण्याने चेहरा धुवा. बेसन पिठात दहीदेखील मिसळू शकता. या मास्कसाठी दोन चमचे दही, एक चमचा बेसन पीठ, एक चिमूटभर हळद आणि एक चमचा टोमॅटोचा रस एकत्र घाला आणि 15 मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावा आणि चेहरा थंड पाण्याने धुवा. यानंतर, चेहऱ्यावर कोणतीही क्रिम लावा आणि हलका मेकअप करा.

हरभरा डाळ भाजून घ्या. यानंतर, डाळ दुधात भिजवून घ्या आणि ही डाळ चांगली भिजल्यानंतर त्याची बारीक पेस्ट करून घ्या. ही पेस्ट किमान एक ते दीड तास चेहर्‍यावर लावा. चेहऱ्यावर फेस पॅक लावलेला असताना, कुणाशीही बोलू नका किंवा हावभाव करू नका. अन्यथा, त्वचा सैल होईल. सुकल्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा. आपण दररोज हा फेस पॅक वापरू शकत नसाल, तर दोन ते तीन दिवसांनी पुन्हा चेहऱ्यावर प्रयोग करा. हा फेस पॅक रेफ्रिजरेटरमध्ये ठेवून पुन्हा वापरू शकता.

घाई घाईत आपण ड्रायरची हिट वापरून केस कोरडे करता, ज्यामुळे केस कमकुवत होतात. ओल्या केसांना कोरड्या टॉवेलने किंवा मोकळ्या हवेत वाळवा. ओले केस कधीच कंगवा वापरून विंचरू नका. केस चांगले कोरडे झाल्यावर त्यावर तेल लावा आणि मसाज करा. केसांना तेल लावल्यानंतर आपण ते कोमट पाण्याने स्वच्छ धुतले पाहिजे. हे लक्षात ठेवावे की जास्त गरम पाणी वापरल्याने आपल्या केसांमध्ये कोरडेपणा उद्भवू शकतो. नेहमी कोमट पाण्याने कुरळे केस धुवावे.

संबंधित बातम्या : 

(Beneficial gram flour for skin and hair)

शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे.
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य.
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.