रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तोंडली अत्यंत फायदेशीर, वाचा…

आपल्यापैकी अनेकजण तोंडलीची भाजी खाणे शक्यतो टाळतात. मात्र, सध्याच्या कोरोनाच्या काळात तोंडली खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तोंडली अत्यंत फायदेशीर, वाचा…
तोंडली
Follow us
| Updated on: May 02, 2021 | 9:15 AM

मुंबई : आपल्यापैकी अनेकजण तोंडलीची भाजी खाणे शक्यतो टाळतात. मात्र, सध्याच्या कोरोनाच्या काळात तोंडली खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. तोंडली खाण्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. 100 ग्रॅम तोंडलीमध्ये सुमारे 1.4 मिलीग्राम लोह, 0/08 मिलीग्राम व्हिटॅमिन बी -2 , 0.07 मिलीग्राम व्हिटॅमिन-बी 1, 1.6 ग्रॅम फायबर आणि 40 मिलीग्राम कॅल्शियम असते. (Beneficial in the Tondli to boost the immune system)

-तोंडल्यामध्ये कॅलरी कमी असतात. खूप वेळ पर्यंत पोट भरल्यासारखे वाटते. ताप, घशाच्या समस्यांवरील इलाजावर औषधाचे काम देखील तोंडली करते. नियमित तोंडली खाल्ल्याने सर्दी आणि ताप वारंवार येण्यावर नियंत्रण आणले जाऊ शकते.

-तोंडलीमध्ये व्हिटॅमिन सी चा देखील चांगला स्रोत आहे. याशिवाय यामध्ये फायबर, लोह, कॅल्शियम आणि अनेक प्रकारचे अँटी-ऑक्सिडंट्स देखील असतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यात मदत होते.

-उच्च रक्तदाब ग्रस्त असलेल्यांनी त्यांच्या आहारात तोंडली नियमित समावेश केला पाहिजे. यामध्ये चरबी अजिबात नसते आणि सोडियमचे प्रमाणही कमी असते. तोंडली नियमितपणे खाल्ल्याने उच्च रक्तदाब नियंत्रित होतो.

-मधुमेह असलेल्या लोकांसाठी तोंडली फायदेशीर आहेत. दररोज तोंडलीचे सेवन केल्याने रक्तातील साखर नियंत्रित केली जाते. यात प्रतिरोधक स्टार्च असतो, जो सहजपणे शरीरात शोषला जात नाही.

-तोंडलीमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात मिळते. त्यामुळे पचनशक्ती सुधारण्यासाठी तोंडली फायदेशीर आहेत. तोंडली लिव्हरच्या समस्यांवर देखील हे गुणकारी आहे.

संबंधित बातम्या : 

Skin Care | नितळ-निरोगी त्वचेसाठी दररोज वापरा ‘ब्युटी ऑईल’, जाणून घ्या याचे फायदे…

कांद्याच्या सालीला कचरा समजताय? थांबा, आधी याचे फायदे जाणून घ्या…

(Beneficial in the Tondli to boost the immune system)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.