Benefits of Amla : मधुमेहाच्या रुग्णांची आवळ्याचा असा करावा आहारात समावेश

gooseberry Benefits : आवळ्यात अनेक महत्त्वाचे पोषक घटक आढळतात. याच्या सेवनाने आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. तुमच्या आहारात तुम्ही याचा नक्की समावेश केला पाहिजे. आवळा तुम्हाला अनेक गोष्टींपासून वाचवू शकतो. मधुमेहाच्या रुग्णांनी देखील आपल्या आहारात आवळ्याचा समावेश कसा करावा जाणून घ्या.

Benefits of Amla : मधुमेहाच्या रुग्णांची आवळ्याचा असा करावा आहारात समावेश
amla
Follow us
| Updated on: Jan 02, 2024 | 7:18 PM

Benefits of Amla : हिवाळ्यात आवळा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतो. आवळ्याला पोषक तत्वांचे पॉवरहाऊस देखील म्हटले जाते. आयुर्वेदात आवळ्याचे अनेक फायदे सांगितले आहेत. मधुमेह जर नियंत्रणात आणायचा असेल तर आवळा तुम्हाला मदक करु शकेल. मधुमेहासाठी आवळा कसा वापरावा याबद्दल जाणून घ्या.

1. आवळा रस

ताज्या आवळ्याचा रस काढून तुम्ही पिऊ शकता. आवळ्याचा रस थोड्या प्रमाणात पाण्यात मिसळून सकाळी रिकाम्या पोटी सेवन करावे. आवळ्यातील उच्च फायबर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करू शकते.

2. आवळा पावडर

आवळा चूर्ण स्वरूपात देखील बाजारात मिळतो. विविध प्रकारे तुम्ही आपल्या आहारात आवळ्याचा समावेश करु शकता. आवळा पावडर पाण्यात मिसळा किंवा सॅलड, दही किंवा इतर पदार्थांवर देखील टाकून खाऊ शकता. आवळा पावडरचे नियमित सेवन केल्यास रक्तातील साखरेचे नियंत्रण चांगले राहते.

हे सुद्धा वाचा

3. आवळा सप्लिमेंट्स

“आवळा सप्लिमेंट्स देखील बाजारात उपलब्ध आहेत. तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊन योग्य डोस निश्चित करु शकता.

4. आवळा चहा

आवळ्याचे सुके तुकडे पाण्यात उकळून घ्या. आपल्या दैनंदिन दिनचर्येत आवळा समाविष्ट करण्याचा हा एक चांगला पर्याय आहे. यामध्ये तुम्ही दालचिनी देखील टाकू शकता.

5. आवळा आणि मेथीचे मिश्रण

मेथीचे दाणे रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतात. आवळा पावडर आणि मेथीची पावडर यांचे मिश्रण तयार करा आणि ते पाण्यासोबत सेवन करा. मधुमेहाच्या रुग्णांना फायदा होईल.

6. आवळा लोणचे

आवळ्याचे लोणचे देखील तुम्ही घरी बनवू शकता. आवळा आणि मसाल्यांचे मिश्रण एकत्र करुन तुम्ही लोणचे बनवू शकता.

आवळ्यात उच्च अँटिऑक्सिडेंट, व्हिटॅमिन सी, अँटी-डायबेटिक गोष्टी आढळतात. तुम्हाला तुमची जीवनशैली बदलण्याची देखील आवश्यकता आहे. संतुलित आहार खाणे, नियमित व्यायाम करणे तसेच वेळोवेळी तज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.