Benefits of clove : कोरड्या खोकल्यासह अनेक समस्यांवर रामबाण उपाय आहे लवंग
Benefits of clove : लवंग ही अनेक गोष्टींवर रामबाण उपाय आहे. लवंग ही भारतीय मसाल्यांमध्ये वापरली जाते. लवंगमध्ये अनेक प्रकारचे पोषकतत्व असतात. जे आपल्या शरीराचे संरक्षण करतात. लवंगचा वापर तुम्ही तुमच्या आहारात केला पाहिजे. अनेक समस्या दूर करण्यासाठी लवंग मदत करते.
Benefits of Lavang : हिवाळा सुरु झाला की लोकांना सर्दी आणि खोकल्याचा सर्वाधिक त्रास होतो. सर्दी, कफ आणि खोकल्यामुळे लोकं त्रस्त होतात. अनेक वेळा यातून लवकर बरे होत नाहीत. अशा वेळी काही घरगुती उपाय केले पाहिजेत. खोकला बरा होत नसेल तर अनेक प्रभावी उपाय आहेत. कोरड्या खोकल्यापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही लवंगचा वापर करु शकता. लवंग मधात मिसळून खाल्ल्यास कोरड्या आणि ओल्या खोकल्यापासून त्वरित आराम मिळतो.
मध आणि लवंग
खोकला असेल तर मध आणि लवंग हे उत्तम उपाय आहेत. साधारण ७-८ लवंगा घ्या आणि गरम तव्यावर हलक्या हाताने भाजून घ्या. लवंगा थंड झाल्यावर बारीक पावडर करुन घ्या. आता यामध्ये 3-4 चमचे मध घाला. थोडे गरम करुन घ्या आणि आता सकाळी, संध्याकाळी आणि दुपारी प्रत्येकी एक चमचा खा. यामुळे खोकल्यापासून त्वरित आराम मिळेल. फक्त 2-3 दिवस खाल्ल्याने तुम्हाला फरक दिसू लागेल. यानंतर अर्धा तास पाणी पिऊ नका.
लवंग खाण्याचे फायदे
लवंगात दाहक-विरोधी गुणधर्म असतात ज्यामुळे सूज कमी होते. सांधेदुखीमध्ये लवंग खूप फायदेशीर आहे.
लवंगात युजेनॉल नावाचे अँटीऑक्सिडंट असते जे फ्री रॅडिकल्स, हृदय, मधुमेह आणि कर्करोगाचा धोका कमी करते.
लवंग पोटातील अल्सर कमी करते आणि पोटाच्या आवरणाचे रक्षण करते.
हिवाळ्यात लवंग खाल्ल्याने श्लेष्मा घट्ट होतो आणि श्लेष्मा काढून टाकण्यास मदत होते.
लवंग पोटफुगी, गॅस आणि पचनाच्या समस्या दूर करण्यास मदत करते.
लवंगात अनेक एंजाइम असतात जे पचन सुधारण्यास मदत करतात.
तोंडाच्या आरोग्यासाठी लवंग खूप फायदेशीर आहे. लवंगाचा वापर हिरड्यांना रोग, प्लेक किंवा बायोफिल्मपासून संरक्षण करण्यासाठी केला जातो.
लवंगमध्ये व्हिटॅमिन सी असते जे शरीरातील पांढऱ्या रक्त पेशी वाढवण्यास मदत करते.
यकृताच्या कार्यास लवंग प्रोत्साहन देते. दातदुखीपासून देखील यामुळे आराम मिळतो.
लवंग हाडांसाठी देखील चांगले असते. तोंडात असलेले बॅक्टेरिया देखील लवंग काढून टाकते. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास देखील लवंग मदत करते.