महागडे क्रिम विसराल; चेहऱ्यावर चमचाभर कॉफी करेल अशी जादू, सगळे पाहतच बसतील
कॉफी आपल्या चेहऱ्यावर जादू करते. चमचाभर कॉफीच्या वापराने चेहरा इतका चमकदार होईल की तुम्ही महागड्या क्रिमही विसरून जाल. चला पाहुया या चमचाभर कॉफीच्या वापराने काय फायदे होतात ते.
कॉफीचं नाव काढलं तरी खूप फ्रेश वाटतं खूप थकवा आला असेल किंवा खूप तणाव जाणवत असेल तर एक कॉफीचा मग जाऊ करतो. कॉफीचा एक घोटच सर्व थकवा दूर करतो. पण तुम्हाला हे माहितीये का की कॉफीची चुटकीसरशी पावडर आपलं सौंदर्य वाढवू शकते. कसं ते पाहूया.
कॉफी त्वचेसाठी खूप फायदेशीर मानली जाते.कारण यात अॅंटी-ऑक्सिडेंट्स, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. जे त्वचेसाठी फायदेशीर असतात. चला जाणून घेऊ कॉफीने त्वचेला होणारे फायदे…
चेहऱ्यावर कॉफी लावण्याचे फायदे
1) डेड स्कीन होईल दूर
कॉफीमध्ये नॅचरल एक्सपोलिएंट गुण असतात. याच्या वापराने चेहऱ्यावरील मृत कोशिका दूर होऊन चेहर्यावर एक चमक दिसू लागते.
2) ब्लड सर्कुलेशन
कॉफीमध्ये कॅफीन असतं. जे ब्लड सर्कुलेशन उत्तेजित करतं. जेव्हा तुम्ही चेहऱ्यावर कॉफी लावता तेव्हा ब्लड फ्लो वाढतो. यामुळे चेहऱ्याचं सौंदर्य आणखी खुलतं.
3) लालसरपणा कमी करण्यास मदत
कॉफीमध्ये अॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात, जे लालसरपणा कमी करतात. जर तुमच्या चेहऱ्यावर सूज राहत असेल तर तीही दूर करण्यास कॉफी फायदेशीर ठरते.
4) डार्क सर्कल
आजकाल डार्क सर्कलची समस्या खूप बघायला मिळते. कॉफीमधील कॅफीन डोळ्यांखाली आलेली सूज आणि डार्क सर्कल दूर करतं.
6) ग्लोइंग आणि टाईट होते त्वचा
चेहऱ्यावर कॉफी लावल्याने त्वचेवरील डाग दूर हळू हळू कमी होतात. तसेच चेहर्यावर एक ग्लो येतो आणि स्किन टाईट होण्यासही मदत होते.
7) सन डॅमेज
कॉफीमधील अॅंटी-ऑक्सिडेंट्स सूर्याच्या किरणांमुळे त्वचा टॅन झाली असेल तर ती सुधारण्यासाठी मदत होते
कॉफी आणि दूध कॉफी चेहऱ्यावर लावण्याची एक चांगली पद्धत म्हणजे कॉफी आणि दुधाचा फेसपॅक तयार करा. यासाठी २ चमचे कॉफीमध्ये दूध मिक्स करून फेसपॅक बनवा. हा चेहऱ्यावर १५ मिनिटे लावून ठेवा. त्यानंतर पाण्याने चेहरा धुवून घ्या.
दही आणि कॉफी
चेहरा एक्सफोलिएट करण्यासाठी खासकरून कॉफी लावली जाते. यासाठी एक चमचा कॉफी पावडरमध्ये एक चमचा दही मिक्स करा. त्यात थोडी हळद टाका. ही पेस्ट चेहऱ्यावर २० मिनिटांसाठी लावून ठेवा. नंतर चेहरा धुवून घ्या. याने डेड स्कीन निघून जाईल आणि त्वचा स्वच्छ दिसेल.
मध आणि कॉफी
एक चमचा कॉफी पावडरमध्ये एक चमचा मध मिक्स करा. ही पेस्ट चेहऱ्यावर १५ ते २० मिनिटे लावून ठेवा. नंतर चेहरा धुवून घ्या. याने त्वचा मुलायम होईल आणि त्वचेवर ग्लो सुद्धा येईल. आठड्यातून एकदा हा उपाय करू शकता.