अहो वयाच्या तिशीनंतरही चिरतरुण दिसाल, सुरकुत्यांसाठी ‘या’ टिप्स फॉलो करा
Skin Care Tips: तुम्हाला तिशीनंतरही चिरतरुण दिसायचं आहे का? असं असेल तर ही बातमी नक्की वाचा. वृद्धत्वाची चिन्हे त्वचेवर सर्वात लवकर दिसतात. अर्थातच सुरकुत्यांमुळे. सुरकुत्यासारखी वृद्धत्वाची बहुतेक चिन्हे चेहऱ्यावर दिसतात. परंतु आपली जीवनशैली सुधारणे आणि 30 नंतर योग्य स्किनकेअर रूटीन केल्यास चिरतरुण दिसाल.
Skin Care Tips: चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या आहेत का? अहो मग चिंता का करता. काळजी करू नका. आम्ही तुम्हाला यावरचा उत्तम उपाय सांगणार आहोत. हा उपाय केल्यास तुम्ही अगदी तिशीनंतरही चिरतरुण दिसाल. यासाठी खालील माहिती समजून घ्या.
अलिकडे तरुण मंडळींच्या चेहऱ्यावरही सुरकुत्या दिसू लागतात. पण, सर्वसामान्यपणे 30 ते 40 च्या दरम्यान चेहऱ्यावर सुरकुत्या येण्यासारखी वृद्धत्वाची चिन्हे दिसू लागतात, हे तुम्हाला माहिती आहे. यामुळे त्वचा निस्तेज दिसू लागते. वृद्धत्व रोखणे शक्य नसते, परंतु यामुळे बहुतेक लोक चेहऱ्यावर दिसणारी वृद्धत्वाची चिन्हे, सुरकुत्या, बारीक रेषा कमी करण्याचा प्रयत्न करतात.
सुरकुत्या, बारीक रेषा कमी करण्यासाठी विविध प्रकारची महागडी त्वचेची काळजी घेणारी उत्पादने वापरली जातात. वृद्धत्वाची ही चिन्हे कमी करण्यासाठी अनेक प्रकारे त्वचेचे उपचार घेतले जातात. पण, हे न करता वृद्धत्वाच्या लक्षणांपासून दूर राहण्यासाठी तुम्ही विविध घरगुती उपाय करू शकता.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्वचेच्या प्रकारानुसार स्किन केअर प्रॉडक्ट्सचा वापर करावा. याशिवाय अनेक जण घरगुती उपाय करतात. हे उपाय नैसर्गिक पद्धतीने त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत या टिप्स 30 नंतरही त्वचेवरील वृद्धत्वाच्या चिन्हांपासून दूर राहण्यास उपयुक्त ठरू शकतात.
त्वचेची योग्य काळजी घेण्याची दिनचर्या कशी असावी?
30 वर्षांहून अधिक वयात दिसणाऱ्या लक्षणांपासून दूर राहण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्किनकेअर रूटीन, यासाठी दिवसातून दोनदा, एक सकाळी आणि दुसरा गोष्ट म्हणजे संध्याकाळी घरी पोहोचा आणि फेस वॉशने चेहरा स्वच्छ करा.
मेकअप वापरत असाल तर क्लींजरचाही वापर करू शकता. यानंतर टोनिंगमुळे त्वचा हायड्रेटेड राहण्यास मदत होते. अँटी-एजिंग सीरम लावा आणि चेहऱ्याला व्यवस्थित आणि हलक्या हातांनी 4 ते 5 मिनिटे मसाज करा. वृद्धत्वाची समस्या दूर ठेवण्यासाठी उपयुक्त अशा सीरमचा वापर करा.
तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार मॉइश्चरायझरचा वापर करा. दिवसातून दोनदा मॉइश्चरायझर वापरा, विशेषत: रात्री, जेव्हा त्वचा स्वतःची दुरुस्ती करते. उन्हात बाहेर पडताना सनस्क्रीन लावा. सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी, आपण एसपीएफ सह सनस्क्रीन वापरावे. अतिनील किरणांपासून त्वचेचे रक्षण करण्यासाठी आणि सुरकुत्या दूर ठेवण्यासाठी हे उपयुक्त ठरू शकते.
साप्ताहिक काळजी कशी घ्याल?
आठवड्यातून किमान दोन दिवस स्क्रब करा. यामुळे त्वचेवर असलेल्या मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास मदत होते, ज्यामुळे त्वचा ताजेतवाने वाटते. कारण यामुळे त्वचा खोलवर स्वच्छ होते, तसेच त्वचेतील घाण आणि तेल स्वच्छ होण्यास मदत होते. चेहऱ्यावर चमक येते. आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार हलक्या वजनाचे स्क्रब वापरा.
हायड्रेटिंग मास्कमुळे चेहऱ्याच्या त्वचेला खोल ओलावा मिळतो. आठवड्यातून एकदा हायड्रेटिंग मास्क वापरा. आपण घरी ऑलिव्ह ऑईल, मध किंवा कोरफड यासारख्या नैसर्गिक घटकांचा हायड्रेटिंग मास्क म्हणून वापर करू शकता. तसेच डोळ्यांची काळजी घ्या.
निरोगी जीवनशैली
आपल्या जीवनशैलीचा परिणाम आपल्या आरोग्यावर आणि चेहऱ्यावर दिसून येतो. यासाठी सकस आणि संतुलित आहार घ्या, रोज 8 तास झोप घ्या, व्यायाम करा. यासोबतच तुम्ही फेशियल योगा किंवा व्यायामही करू शकता. त्वचा घट्ट ठेवण्यासाठी हे उपयुक्त ठरू शकते.
(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)