AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ब्लॅक कॉफी की ग्रीन टी आरोग्यासाठी काय फायदेशीर? जाणून घ्या

ब्लॅक कॉफी आणि ग्रीन टी दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर आहेत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि शरीराच्या गरजेनुसार ते तुमच्या आहारात समाविष्ट करू शकता.

ब्लॅक कॉफी की ग्रीन टी आरोग्यासाठी काय फायदेशीर? जाणून घ्या
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 29, 2025 | 8:13 PM

आजकाल लोकं त्यांच्या आरोग्याबद्दल आणि तंदुरुस्तीबद्दल खूप काळजी घेताना दिसत आहेत. यासाठी प्रत्येकजण शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहण्यासाठी निरोगी अन्नाचे सेवन करत आहेत. तसेच तंदुरुस्त राहण्यासाठी लोक दूध आणि कॉफीऐवजी ग्रीन टी किंवा ब्लॅक कॉफी पिणे पसंत करतात. हे दोन्हीही आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहेत. वजन कमी करण्यासाठी बहुतेक लोक ग्रीन टी पितात.

वजन कमी करण्यासाठी ब्लॅक कॉफी आणि ग्रीन टी दोन्ही फायदेशीर मानले जातात. जर आपण ब्लॅक कॉफीबद्दल बोललो तर त्याचे अनेक प्रकार आहेत. ब्लॅक कॉफीमध्ये कॅलरीज कमी असतात आणि त्यात कॅफिन आणि क्लोरोजेनिक अॅसिड सारखी वनस्पती-आधारित संयुगे तसेच विविध जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. त्याचप्रमाणे, ग्रीन टी वजन कमी करण्यासाठी आणि आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. तसेच, त्यात असलेले अँटीऑक्सिडंट्स त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात.

ब्लॅक कॉफी आणि ग्रीन टी दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर आहेत, जे प्रत्येकाला त्यांच्या आवडीनुसार प्यायला आवडते. पण या दोघांपैकी कोणते आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे आणि तुमच्यासाठी काय योग्य आहे, हे आपण तज्ञांकडून जाणून घेऊयात…

ब्लॅक कॉफी की ग्रीन टी आरोग्यासाठी काय फायदेशीर?

दिल्लीतील अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलमधील मधुमेहतज्ज्ञ डॉ. नवनीत कौर म्हणाल्या की, ब्लॅक कॉफी आणि ग्रीन टी दोन्हीचे स्वतःचे फायदे आहेत, परंतु कोणते चांगले आहे हे तुमच्या आरोग्यावर, गरजांवर आणि जीवनशैलीवर अवलंबून असते. ब्लॅक कॉफीमध्ये कॅफिनचे प्रमाण जास्त असते, जे शरीराला त्वरित ऊर्जा देते आणि ते सतर्क ठेवण्यास मदत करते. यासोबतच, ते चयापचय वाढवण्यास मदत करते. जर तूम्ही व्यायाम करण्यापूर्वी सेवन केले तर ते चांगले परिणाम शरीराला मिळतील आणि टाइप 2 मधुमेहाचा धोका कमी करण्यास मदत करू शकते. पण जास्त कॅफिन सेवन केल्याने निद्रानाश, आम्लता आणि रक्तदाब वाढणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

दुसरीकडे ग्रीन टीबद्दल बोलायचे झाले तर कॅफिन कमी असते आणि ते अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असते, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास, वजन कमी करण्यास आणि हृदय हेल्दी ठेवण्यास मदत करते. शरीरातील जळजळ कमी करण्यासाठी आणि मेंदूचे कार्य सुधारण्यासाठी देखील हे फायदेशीर मानले जाते. जर तुम्हाला ताण कमी करायचा असेल आणि दिवसभर हलके वाटायचे असेल तर ग्रीन टी हा एक चांगला पर्याय असू शकतो. पण ज्यांना जास्त सतर्कता आणि उर्जेची आवश्यकता आहे, त्यांच्यासाठी ब्लॅक कॉफी योग्य असू शकते. कोणत्याही गोष्टीचे जास्त सेवन आरोग्यासाठी हानिकारक असू शकते, म्हणून ते संतुलित प्रमाणात सेवन करा आणि तुमच्या आरोग्यानुसार योग्य पर्याय निवडा.

म्हणून, तुम्ही तुमच्या जीवनशैली, वैद्यकीय स्थिती तसेच शरीराचे आरोग्य आणि गरजेनुसार तुमच्या आहारात काहीही समाविष्ट करताना त्या मर्यादित प्रमाणात करा. अन्यथा ते तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त.
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?.
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा.
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर.
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस.
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?.
बलुचिस्तानकडून पाक आणि चीनला उघड धमकी, VIDEO शेअर करत वाढवलं टेन्शन
बलुचिस्तानकडून पाक आणि चीनला उघड धमकी, VIDEO शेअर करत वाढवलं टेन्शन.
पाकड्यांना पाडलं उघडं, भारतीय लष्करानं सांगितलं काय खरं काय खोटं
पाकड्यांना पाडलं उघडं, भारतीय लष्करानं सांगितलं काय खरं काय खोटं.
अमृतसरमध्ये पाकचं ड्रोन घरावर, काचा फुटल्या तर कुठ आग लागली, बघा VIDEO
अमृतसरमध्ये पाकचं ड्रोन घरावर, काचा फुटल्या तर कुठ आग लागली, बघा VIDEO.
पाकच पितळ उघडं, गेले हल्ला करायला अन् मिसाईल फुटलंच नाही; फुसका बार...
पाकच पितळ उघडं, गेले हल्ला करायला अन् मिसाईल फुटलंच नाही; फुसका बार....