अल्जायमर ते कॅन्सर, गंभीर रोगांवर रामबाण उपाय, काळा लसूण खा, आजाराला गुड बाय म्हणा
लसूणामध्ये अनेक गुणकारी गुणधर्म असतात. पण सफेद लसूणच्या वासाने अनेकांना खूप त्रास होतो. या लोकांसाठी काळा लसूण हा उत्तम पर्याय आहे. लसूण आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते.
मुंबई : लसूणामध्ये अनेक गुणकारी गुणधर्म असतात. पण सफेद लसूणच्या वासाने अनेकांना खूप त्रास होतो. या लोकांसाठी काळा लसूण हा उत्तम पर्याय आहे. लसूण आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. लसूण अन्नाची चव वाढवण्यास मदत करते. पण काही लोकांना लसणाचा वास आवडत नाही, म्हणून ते त्याचे सेवन करत नाहीत आणि त्याच्या असंख्य फायद्यांपासून दूर राहतात. अशा लोकांसाठी काळा लसूण हा उत्तम पर्यय असू शकतो.
काळा लसूण हा पांढऱ्या लसूणावर प्रक्रियाकरुन तयार केला जातो. या प्रक्रियेमध्ये लसूणाचा उग्रवास निघून जातो. लसूणावर केलेल्या प्रक्रियेमुळे या लसणात अँटीऑक्सिडंट्स निर्माण होतात. त्यामुळे या लसणाचे फायदे मोठ्या प्रमाणात वाढतात. या लसूनाचे नियमित सेवन केल्याने व्यक्ती अल्झायमरपासून कर्करोगापर्यंत सर्व धोकादायक आजारांपासून स्वतःचे रक्षण करू शकते.
काळ्या लसणाचे फायदे
कर्करोगापासून संरक्षण करते
एका संशोधनात असे निश्पन्न झाले आहे की जर काळे लसूण रोज रिकाम्या पोटी खाल्ले तर रक्त कर्करोगाचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो. एवढेच नाही तर जर या समस्यांनी ग्रस्त असलेले लोक नियमितपणे काळे लसूण खातात, तर ते त्यांच्या उपचारात सकारात्मक परीणाम होतो.
यकृतासाठी उपयुक्त
यकृताच्या समस्यांमुळे शरीराला अनेक गंभीर परिणामही भोगावे लागतात. त्यामुळे आपले यकृत निरोगी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. काळा लसूण यासाठी खूप चांगला मानला जातो. त्याच्या नियमित सेवनाने यकृत डिटॉक्सिफाय होत राहते आणि यकृताला कोणतेही नुकसान होत नाही.
हृदय ठेवणे
जर तुम्हाला हृदयाचे आजार टाळायचे असतील तर रोज सकाळी रिकाम्या पोटी काळे लसूण खाण्यास सुरुवात करा. हे शरीरातून खराब कोलेस्टेरॉल काढून टाकते आणि बीपी सामान्य ठेवण्यात मदत करते. यामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहते.
रोगप्रतिकार शक्ती वाढवते
काळा लसूण शरीराच्या पेशींवर नियंत्रण ठेवून रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतो. यामुळे रोगांशी लढण्याची शक्ती व्यक्तीच्या आत वाढते आणि तो लवकर आजारी पडत नाही.
अल्झायमर प्रतिबंध
काळा लसूण एक सुपरफूड मानला जातो, कारण त्यात शरीरातून मनापर्यंत समस्या दूर करण्याची शक्ती असते. याचे सेवन केल्याने अल्झायमर आणि डिमेंशियासारख्या समस्या टाळल्या जावू शकतात.
इतर बातम्या :
6 देशांत रहा, व्यवसाय करा आणि 20 लाख मिळवा, तुमच्यासाठी भन्नाट ऑफर
Mental Fitness : तीक्ष्ण आणि निरोगी मेंदूसाठी ‘हे’ पदार्थ आहारात समाविष्ट करा!
Olive Oil Benefits : ऑलिव्ह ऑईल केसांसाठी अत्यंत फायदेशीर, वाचा सविस्तर!
Chanakya Niti | आचार्य चाणाक्यांनी सांगितलेल्या 4 गोष्टी कराच नाहीतर पश्चातापाचे भोग भोगावे लागतील!https://t.co/Qk5CnC2R86#chanakyaniti | #4things | #Hindu
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 20, 2021