Blackheads Home Remedies: नाकावरील ब्लॅकहेड्स घालवण्यासाठी वापरा ‘या’ सोप्या आणि प्रभावी टिप्स!

Blackheads Home Remedies: ब्लॅकहेड्स ही एक सामान्य समस्या आहे. अनेकजण ब्लॅकहेड्सच्या समस्येने त्रस्त असतात. ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी तुम्ही अनेक घरगुती उपाय देखील करून पाहू शकता. जाणून घ्या, चेहऱयावरील हट्टी ब्लॅकहेड्स काढण्यासाठी काही घरगुती उपाय.

Blackheads Home Remedies: नाकावरील ब्लॅकहेड्स घालवण्यासाठी वापरा ‘या’ सोप्या आणि प्रभावी टिप्स!
नाकावरील ब्लॅकहेड्स घालवण्यासाठी वापरा ‘या’ सोप्या आणि प्रभावी टिप्स! Image Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Jul 27, 2022 | 12:30 PM

चेहऱ्यावरील मृत पेशींखाली तेल साचल्यामुळे (Due to oil accumulation) त्वचेवर लहान कणके येऊ लागतात आणि हवेच्या संपर्कात आल्याने ऑक्सिडायझेशन होऊन काळी पडते. नाकाजवळ आढळणारे यातील बहुतांश ब्लॅकहेड्स (Blackheads) मुळापासून त्वचेला चिकटलेले असल्याने ते काढणे फार कठीण असते आणि सहज निघण्याचे नाव घेत नाही. चेहऱ्यावरील मेकअप, घाण आणि बॅक्टेरिया छिद्रांमध्ये अडकल्यावर ब्लॅकहेड्स होतात. हवेच्या संपर्कात आल्यावर ते काळे होतात. ब्लॅकहेड्स चेहऱ्याचे सौंदर्य कमी करतात. हे बहुतेक नाक आणि हनुवटीवर असतात. अनेक लोक ब्लॅकहेड्स काढण्यासाठी केमिकलयुक्त सौंदर्य उत्पादनांचा (Chemical beauty products) वापर करतात. ते दीर्घकाळात आपल्या चेहऱ्याचे खूप नुकसान करतात. अशा परिस्थितीत, ब्लॅकहेड्सपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही अनेक घरगुती उपाय करून पाहू शकता. त्यामुळे ब्लॅकहेड्स दूर होण्यास मदत होते. तसेच त्यांचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.

ओट्स

ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी तुम्ही ओट्स वापरू शकता. यासाठी एका भांड्यात १ टेबलस्पून ओट्स घ्या. त्यात लिंबाचा रस घाला. त्यात थोडं दही घाला. या सर्व गोष्टी नीट मिसळा. याने चेहरा स्क्रब करा. 15 मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. ते तुमची त्वचा उजळ करण्याचेही काम करते. हा स्क्रब तुम्ही आठवड्यातून 1 ते 2 वेळा वापरू शकता.

खोबरेल तेल

ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी तुम्ही खोबरेल तेल वापरू शकता. यासाठी खोबरेल तेल आणि साखर मिसळून स्क्रब तयार करा. याने त्वचा एक्सफोलिएट करा. तुम्ही नारळाच्या तेलाव्यतिरिक्त जोजोबा तेल वापरू शकता. या स्क्रबमुळे ब्लॅकहेड्स दूर होण्यास मदत होईल.

हे सुद्धा वाचा

बेकिंग सोडा आणि लिंबू

एका भांड्यात एक चमचा बेकिंग सोडा घ्या. त्यात अर्धा चमचा लिंबाचा रस घाला. काही वेळ बाधित भागावर मसाज करा. 10 मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर चेहरा धुवा. यामुळे ब्लॅकहेड्सची समस्या दूर होण्यास मदत होते.

टूथपेस्टने घासणे

ब्लॅकहेड्स काढण्यासाठी तुम्ही टूथपेस्ट वापरू शकता. यासाठी टूथपेस्ट घ्या. ते प्रभावित भागावर लावा. याने काही वेळ त्वचेला मसाज करा. थोडा वेळ तसाच राहू द्या. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. त्यामुळे ब्लॅकहेड्स दूर होण्यास मदत होते. ही रेसिपी तुम्ही आठवड्यातून एकदा ट्राय करू शकता.

अंडी

एका भांड्यात अंड्याचा पांढरा भाग घ्या आणि त्यात एक चमचा मध मिसळा. आता हे मिश्रण ब्लॅकहेड्सच्या ठिकाणी लावा आणि 15-20 मिनिटे कोरडे होऊ द्या. शेवटी कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. तुम्ही हे आठवड्यातून दोनदा वापरू शकता.

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.