सकाळी नाश्ता करा आणि राहा निरोगी, वाचा !
सकाळी नाश्ता करणे निरोगी आयुष्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. सकाळची न्याहारी आपल्याला दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा देते.
मुंबई : सकाळी नाश्ता करणे निरोगी आयुष्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. सकाळची न्याहारी आपल्याला दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा देते. मात्र, अनेकजण वाढलेले वजन नियंत्रणात आणण्यासाठी सकाळचा नाश्ता टाळतात. तुम्ही पण असे करत असाल तर आपण अनेक मोठ्या आजारांना निमंत्रणच देत आहात. कारण सकाळचा नाश्ता आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतो. (Breakfast is a very important)
तज्ज्ञांच्या मते सकाळचा नाश्ता अधिक पौष्टिक असावा. यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यासोबत शरीराला पर्याप्त प्रमाणात ऊर्जा मिळते. याव्यतिरिक्त, सकाळी लवकर न्याहारी केल्याने चयापचय संबंधित फायदे होतात. सकाळचा नाश्ता टाळला तर मायग्रेन, टाईप 2 मधुमेह, हृदयरोग असे आजार आपल्याला होऊ शकतात.
न्याहारीत प्रथिने, कार्बोदके व साखर यांचे प्रमाण संतुलित असावे. फळे, भाज्या यांचा आहारात शक्यतो समावेश करावा. आहारात नैसर्गिक भाजीपाला, फळे, धान्य यांचा वापर करावा. सकाळी एक चमचा गायीचे तूप व एक कप गायीचे दूध घेणे गरजेचे आहे. कफ प्रकृतीच्या व्यक्तीने दूध घेताना त्यात चिमूटभर हळद व सुंठ पावडर टाकावी.
जर तुम्हाला दिवसाची सुरुवात हेल्दी नाश्त्याने करायची असेल तर, पनीर भुर्जी हा एक उत्तम पर्याय आहे. आपण पनीरमध्ये टोमॅटो, कांदा, शिमला मिरची टाकून त्याची भुर्जी बनवू शकता. या पनीर भुर्जीबरोबर मल्टीग्रेन ब्रेड खाऊ शकता. आपल्या सर्वांना माहित आहे की, अंड्यांमध्ये सर्वाधिक प्रथिने असतात. आपण त्यांना उकडून किंवा त्याची पोळी बनवून ब्रेडसह खाऊ शकता. अंड्यांमध्ये योग्य प्रमाणात प्रोटीन असते.
इडली ही दक्षिण भारतातला आवडता पदार्थ आहे. आपल्या दिवसाच्या निरोगी सुरुवात करण्यासाठी तांदूळ किंवा रव्याऐवजी ओट्स वापरुन गरमागरम इडली बनवू शकता. ओट्समध्ये प्रथिने तसेच फायबर भरपूर प्रमाणात असते. ही इडली सांबार आणि नारळ चटणीसह सर्व्ह करू शकता. जर आपण नेहमीच्या न्याहारीला कंटळला असाल, तर उच्च प्रोटीनयुक्त आणि पौष्टिक असे, सोया उत्तपम बनवू शकता.
रवा उपमा हा एक लोकप्रिय दक्षिण भारतीय पदार्थ आहे. नाश्त्यामध्ये हे हलका आणि अतिशय चवदार डिश चांगला पर्याय आहे. जो आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. हे रवा उपमा हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, चिरलेली कांदे किसलेले आले, मोहरी, जिरे आणि चणा डाळ घालून तयार केले जाते. चवीनुसार तूप आणि मीठ घालू शकता.
संबंधित बातम्या :
Beauty Tips | चेहऱ्याचे सौंदर्य वाढवतील ‘ही’ योगासने, तुम्हीदेखील नक्की ट्राय करा!#beautytips | #skincare | #yoga | #beauty https://t.co/zqbiogPSVT
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 25, 2021
(Breakfast is a very important)