Breast cancer | पुरुषांनाही स्तनाचा कर्करोग होतो का? पुरुष वंधत्वाचे प्रमाण जाणून घ्या, काय आहेत लक्षणे
एका नवीन अभ्यासानुसार, पुरुषांमध्ये आक्रमक स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका वाढत आहे. त्यामुळे पुरुषातील वंधत्वाशी संबंधित समस्यामध्येही वाढ होत असल्याचे निरीक्षणाअंती दिसून आले आहे.
‘ब्रेस्ट कॅन्सर रिसर्च’ या ओपन-एक्सेस जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार, पुरुषांमध्ये स्तनाचा कर्करोग (breast cancer in men) आढळून येत आहे. रिपोर्टनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, इंग्लंड आणि वेल्समध्ये स्तनाच्या कर्करोगाचे निदान झालेल्या 1,998 पुरुषांची मुलाखत घेतली असता, त्यामध्ये 112 ( 5.6 टक्के ) स्वत: वंध्यत्वाची तक्रार (hirlwind brawl ) करतात आणि 383 ( 19.2 टक्के ) लोकांना मूल झाले नसल्याची नोंद आहे. इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर रिसर्च ( लंडन, युके) च्या लेखकांनी स्वत: नोंदवलेले वंध्यत्व किंवा मूल नसणे आणि पुरुषांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका यांच्यातील संभाव्य संबंधांची तपासणी केली. स्तनाच्या कर्करोगामुळे काही अंशी लोकांना वंधत्वाची समस्या निर्माण झाली आहे. मायकेल जोन्स आणि सहकाऱ्यांनी 2005 ते 2017 इंग्लंड आणि वेल्समध्ये राहत असलेल्या, स्तनाच्या कर्करोगाचे निदान झालेल्या 1,998 पुरुषांची (80 वर्षाखालील) मुलाखत घेतली होती. या निरीक्षणादरम्यान, पुरुषांतील बेस्ट कॅन्सरचे प्रमाण, कारणे, लक्षणे (causes, symptoms) आणि उपाय यावर चर्चा करण्यात आली आहे.
पुरुषांमध्ये स्तनाच्या कर्करोगाची कारणे
काही कारणांमुळे पुरुषांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. उदाहरणार्थ, जर एखाद्या पुरुषाने त्याच्या छातीजवळ रेडिएशन थेरपी घेतली असेल तर त्याच्यामध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. याशिवाय जर एखाद्याच्या कुटुंबात ब्रेस्ट कॅन्सरचा इतिहास असेल तर त्यातही हा आजार होण्याची शक्यता वाढते. खराब जीवनशैलीमुळे किंवा काही अनुवांशिक विकारांमुळेही पुरुषांमध्येही स्तनाचा कर्करोग होऊ शकतो.
पुरुषांमध्ये स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे
पुरुषांमध्ये स्तनाच्या कर्करोगाची बहुतेक प्रकरणे 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांमध्ये आढळून आली आहेत. लक्षणांच्या कमतरतेमुळे, त्याची गंभीर स्थिती पुरुषांमध्ये दिसून येते.
छातीत गाठ निर्माण होणे
तुमच्या छातीवर गाठ निर्माण होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. ही गाठ स्तनाग्रभोवती स्तनाजवळच उद्भवते. सहसा या गुठळ्या दुखत नाहीत. परंतु स्पर्श केल्यावर त्या कडक लागतात. कर्करोग जसजसा वाढत जातो तसतशी त्याची सूज मानेपर्यंत पसरते. जरी बहुतेक गाठी हे कर्करोगाचे लक्षण नसले तरी तरीही तुम्हाला अशी काही तक्रार असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा. स्तनाच्या कर्करोगात त्वचेतूनच गाठ निघते. अशा स्थितीत कर्करोग वाढत असताना स्तनाग्रांवर उघडे फोड दिसू शकतात. ही जखम मुरुमासारखी दिसते. याशिवाय काखेत गाठ येणे किंवा छातीच्या त्वचेचा रंग बदलणे ही लक्षणेही पुरुषांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकतात. जसजशी गाठ वाढते तसतसे स्तनाचा आतील भाग ताणू लागतो. अशावेळी स्तनाग्र आतल्या बाजूने सरकतात. निप्पलच्या आजूबाजूची त्वचा कोरडी पडू लागते आणि पुरळ उठू लागते.
निपल डिस्चार्ज- जर तुम्हाला तुमच्या शर्टवर अनेकदा कोणत्याही प्रकारचे डाग दिसत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. या निप्पल डिस्चार्जमध्ये रक्त देखील असू शकते. निप्पलच्या सभोवतालची त्वचा सुजते आणि त्वचेला स्पर्श करणे खूप कठीण वाटते.
इतर लक्षणे
या लक्षणांसोबत थकवा, हाडे दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे, आजारी वाटणे आणि त्वचेवर सतत खाज येणे यासारख्या लक्षणांसह असू शकते. तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास, तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा. निदान – पुरुषांमध्ये स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे दिल्यानंतर त्यांची बायोप्सी केली जाते. यामध्ये छातीतील गाठीतून एक तुकडा काढून प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवला जातो. ही गाठ कॅन्सरमुळे आहे की नाही हे चाचणीवरून कळते. याशिवाय कॅन्सरच्या आणखी काही चाचण्या केल्या जातात ज्यामुळे त्याची अवस्था ओळखता येते. काय आहे उपचार – स्तनाच्या कर्करोगावर बहुतेकदा पुरुष आणि स्त्रियांमध्ये समान उपचार केले जातात. स्तनाच्या कर्करोगावर तीन प्रकारे उपचार केले जातात. पहिल्या उपचारात रुग्णावर शस्त्रक्रिया करून छातीतून गाठ काढली जाते. दुसर्या पद्धतीत, रुग्णावर केमोथेरपी केली जाते, ज्यामध्ये औषधांद्वारे कर्करोगाच्या पेशी नष्ट केल्या जातात. तिसरा उपचार रेडिएशन थेरपीद्वारे केला जातो. यामध्ये कॅन्सरचे उपचार उच्च ऊर्जा क्ष-किरण किंवा गॅमा-रे रेडिएशनद्वारे केले जातात.