Pradosh Vrat | आनंद, सौभाग्य आणि समृद्धी देणारा बुध प्रदोष, जाणून घ्या ‘या’ व्रताची कथा…

कादशी प्रमाणे दर महिन्याला प्रदोषा व्रतही दोनदा केले जाते. प्रदोष व्रत त्रयोदशी तिथीवर केले जाते. आठवड्याच्या दिवसानुसार त्याचे महत्त्व बदलते.

Pradosh Vrat | आनंद, सौभाग्य आणि समृद्धी देणारा बुध प्रदोष, जाणून घ्या ‘या’ व्रताची कथा...
प्रदोष व्रत
Follow us
| Updated on: Feb 24, 2021 | 8:53 AM

मुंबई : एकादशी प्रमाणे दर महिन्याला प्रदोषा व्रतही दोनदा केले जाते. प्रदोष व्रत त्रयोदशी तिथीवर केले जाते. आठवड्याच्या दिवसानुसार त्याचे महत्त्व बदलते. फेब्रुवारीचा दुसरे प्रदोष व्रत, बुधवारी 24 फेब्रुवारीला येणार आहे. बुधवारी प्रदोष तिथी येत असल्यामुळे, त्याला ‘बुध प्रदोष’ म्हटले जाईल (Budh Pradosh Vrat 2021 Date muhurat and pooja vidhi).

असे मानले जाते की, बुध प्रदोष व्रत ठेवल्यास घरात आनंद, शुभेच्छा आणि समृद्धी येते. तसेच त्या कुटुंबाला भगवान शिव आणि माता पार्वती यांचे आशीर्वाद लाभतात. या व्यतिरिक्त, कुंडलीमध्ये बुध आणि चंद्राची स्थिती देखील चांगली होते.

व्रताची पद्धत

प्रदोष व्रत करण्यासाठी त्रयोदशीला सकाळी लवकर उठून स्नान वगैरेकरून तयार व्हावे व पूजास्थानावर आसन घेऊन बसावे. यावेळी भगवान शंकराचे ध्यान करा आणि मनातल्या मनात व्रताचा संकल्प करा. दिवसभर कडक उपवास ठेवा. कोणाच्याही बाबतीत वाईट गोष्टी बोलू नका, कोणाची फसवणूक करु नका, कोणाला अपमानास्पद बोलू नका. दिवसभर परमेश्वराचे ध्यान करा आणि जप करा. संध्याकाळी पूजा केल्यावर गरजूंना अन्न दिल्यानंतर दक्षिणा द्या व व्रत सोडा.

पूजेची पद्धत

सूर्योदय होण्याच्या 45 मिनिटांपूर्वी ते सूर्यास्तानंतर 45 मिनिटे प्रदोषाची पूजा केली जाते. त्याला ‘प्रदोष काळ’ असे म्हणतात. या वेळी स्नान करून पूजेसाठी बसावे. महादेव व माता पार्वती यांना चंदन, फूल, अक्षत, धूप, दीप, दक्षिणा आणि नैवेद्य अर्पण करावा. महिलांनी माता पार्वतीला लाल चुनरी व सौभाग्याच्या वस्तू अर्पण केल्यास ते शुभ मानले जाते. यानंतर मंत्राचा जप करा आणि व्रताची कथा वाचा आणि शेवटी आरती करा.

शुभ काळ :

24 फेब्रुवारी 2021, बुधवार

माघ शुक्ल त्रयोदशी तिथी प्रारंभ : 24 फेब्रुवारी रोजी, 06: 05 मिनिटे

तिथी समाप्ती : 25 फेब्रुवारी रोजी, 05: 18 मिनिटे

(Budh Pradosh Vrat 2021 Date muhurat and pooja vidhi)

व्रताची कथा

एक पुरुषाचा नुकताच विवाह झाला होता. लग्नानंतर दोन दिवसांनी त्याची पत्नी माहेरी गेली. काही दिवसांनी तो माणूस बायकोला घेण्यासाठी तिच्या माहेरी पोहोचला. बुधवारी जेव्हा तो आपल्या पत्नीसमवेत घरी परत येऊ लागला, तेव्हा बुधवारी निरोप घेण्यासाठी शुभ नाही, असे सांगत सासरच्यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. पण तो सहमत झाला नाही आणि आपल्या पत्नीसमवेत निघून गेला. शहराबाहेर पोचल्यावर त्याच्या पत्नीला तहान लागली. त्या माणसाने एक लोटा घेतला आणि पाण्यासाठी शोधाशोध सुरु केली. वाट बघत त्याची बायको झाडाखाली बसली. थोड्या वेळाने तो माणूस पाणी घेऊन परतला, तेव्हा त्याने पाहिले की त्याची बायको एका व्यक्तीशी हसत हसत बोलत होती आणि त्याच्या लोट्यातून पाणी पीत होती. हे पाहून त्याला राग आला.

जेव्हा, तो जवळ पोहोचला, तेव्हा समोरील दृश्य पाहून तो चकित झाला. कारण तो मनुष्य हुबेहूब त्याच्यासारखाच दिसत होता. दोघांची भांडणे सुरू केली. गर्दी जमली होती. सैनिक आले. त्या पुरुषांकडे पाहून पत्नीही गोंधळून गेली होती. लोकांनी त्या बाईला विचारले, तिचा नवरा कोण आहे, मात्र तिने त्यांना ओळखण्यास असमर्थता दर्शविली. मग तिचा नवरा भगवान शंकराला प्रार्थना करु लागला, ‘हे प्रभू! आमचे रक्षण करा. मी एक मोठी चूक केली की, माझ्या सासूचे म्हणणे ऐकले नाही आणि बुधवारी पत्नीला घेऊन निघालो. भविष्यात मी हे कधीच करणार नाही.’

त्याची प्रार्थना पूर्ण होताच, दुसरा मनुष्य अदृश्य झाला. यानंतर ते पती-पत्नी सुखरूप त्यांच्या घरी पोहोचले. त्या दिवसापासून त्या पती-पत्नीने बुध त्रयोदशीला ‘प्रदोष व्रत’ सुरू केले आणि पुढील आयुष्य आनंदाने व्यतीत केले.

(विशेष टीप:  ‘टीव्ही 9 मराठी’ कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेचं समर्थन करत नाही, प्रस्तुत लेखात ज्योतिषशास्त्राच्या उपायांचा उल्लेख करण्यात आला आहे.)

(Budh Pradosh Vrat 2021 Date muhurat and pooja vidhi)

हेही वाचा :

बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्..
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्...