वजन कमी करण्यासाठी गुणकारी ‘कोबी’, वाचा याचे अनेक फायदे…
प्रत्येक भाजी खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामध्येही कोबी खाणे आपल्या आरोग्याबरोबरच वजन कमी करण्यासाठी देखील फायदेशीर आहे.
मुंबई : प्रत्येक भाजी खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामध्येही कोबी खाणे आपल्या आरोग्याबरोबरच वजन कमी करण्यासाठी देखील फायदेशीर आहे. कोबीमध्ये असलेले घटक कर्करोगासारख्या आजारांपासून आपले संरक्षण करतात. दररोज कोबीचे सेवन केल्यास आपले वजन कमी होईल. त्यात कमी कॅलरी घटक आणि उच्च फायबर घटक आहे. तसेच यात अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील आहेत. (Cabbage beneficial for weight loss)
-कोबीमध्ये व्हिटामिन सी, के आणि ए जास्त प्रमाणात असतात. तसेच ॉपॅन्टोथेनिक अॅसिड (बी 5), पायरीडोक्सिन (बी 6), थायमिन (बी 1), राइबोफ्लेविन (बी 2) नियासिन (बी 3) सारखी आवश्यक जीवनसत्त्वे देखील मुबलक प्रमाणात आढळतात.
-कोबी खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात बरेच पौष्टिक पदार्थ आहेत. हे सॅलडमध्ये खाल्ल्याने शरीरातील चांगले बॅक्टेरिया वाढतात. तसेच पचनशक्ती मजबूत होते. याशिवाय दररोज कोबी खाण्याने आतड्यातील सूज कमी होण्यास मदत होते.
-बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी कोबी किसून त्यावर थोडे मीठ, काळी मिरी व लिंबू पिळून खाल्ल्यास पचन व्यवस्थित होऊन पोट साफ होते. तसेच कच्ची कोबी खाण्याचे देखील अनेक फायदे आपल्या शरीराला होतात.
-कोबी हा स्त्रियांच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. गर्भाशय सुदृढ राहण्यासाठी नियमितपणे कोबीचे सेवन करावे. तर कोबीची भाजी आवडत नसेल तर भोजनानंतर कोबीचा अर्धा ग्लासभर रस थोडेसे लिंबू पिळून घ्यावा.
-रक्त किंवा आमवाताने सांध्यांना सूज आली असेल तर त्या ठिकाणी कोबीची पाने गरम करून बांधावीत. यामुळे दुखणाऱ्या सांध्याला आराम मिळतो.
-कोबी खाल्ल्यामुळे आपल्या डोळ्यांच्या अनेक तक्रारी दूर होतात. यामुळे ज्या लोकांना डोळ्याच्या तक्रारी आहेत त्यांनी कोबी खाल्ली पाहिजे.
-त्वचेवर जखमा, पुरळ, इसब, अॅलर्जी झाली असेल तर कोबी बारीक वाटून लावल्यास हे आजार लवकर आटोक्यात येतात.
( टीप- डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या )
संबंधित बातम्या :
Papaya | केवळ पपईच नव्हे तर, पपईच्या बियादेखील आरोग्यवर्धक, जाणून घ्या याचे फायदे…https://t.co/45NyovSpYE#Papaya #PapayaSeeds #health
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 24, 2020
(Cabbage beneficial for weight loss)