Garlic Without Peels: लसून सालीसोबत खाल्ल्यावर काय होईल? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
garlic without removing peels: लसणाचे सेवन शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. पण नेहमी लक्षात ठेवा की लसूण कमी प्रमाणात सेवन केले पाहिजे. कारण जास्त सेवन केल्याने पोटात जळजळ किंवा गॅस सारख्या समस्या उद्भवू शकतात. लसूण सोलल्याशिवाय खावा की सालासह खावा ते जाणून घेऊया.

अनेक पदार्थांमध्ये लसणाचा वापर केला जातो. पंरतु तुम्हाला माहिती आहे का? लसणाचा वापर फक्तच पदार्थाची चव वाढवण्यासाठीच नाही तर आरोग्यासाठी देखील फायदे होतात. लसूण खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारकरॅडिकल्सशी लढण्यासशक्ती वाढण्यास मदत होते. रोगप्रतिकारकशक्ती वाढल्यामुळे तुम्हाला संसर्गाचे आजार होत नाही. लसणामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात ज्यामुळे तुमच्या शरीरातील मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात. तज्ञांच्या माहितीनुसार, दररोज सकाळी लसणाची एक पाकळी खाल्ल्यामुळे तुमचं आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. त्यासोबतच रक्तातील साखर वाढते आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते.
माहितीनुसार, सहसा लसणाचे सेवन त्याची साल काढून खाल्ला जातो. अनेकवेळा लोकं लसणाची साल काढायला विसरतात. बऱ्याचवेळा लोकं घाईघाईमध्ये लसनाची साल न काढता त्याचे सेवन सेवन करतात. परंतु लसणाची साल काढल्या शिवाय त्याचे सेवन करणे योग्य आहे का? लसणाचे सेवन साल नाही काढता खाल्ल्यामुळे तुमच्या आरोग्याला कोणत्याही प्रकारचा धोका तर नाही ना चला जाणून घेऊया तज्ञांचे काय मत आहे.
तज्ञांच्या सल्ल्यानुसार, लसणाच्या सालीमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते. फायबर तुमच्या शरीरामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. फायबरमुळे तुमचे वजन नियंत्रित राहाण्यास मदत होते आणि वजन वाढत नाही. परंतु लसणाच्या सालीमध्ये कोणत्याही प्रकारचे पोषण नसते. जर तुम्ही लसणाचे सेवन साल न काढता केले तर तुम्हाला त्याचा अधिक फायदा होऊ शकतो. तुम्ही सालीसोबत लसणाचे सेवन केल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. त्यासोबतच लसणाचा सालीसकट पदार्थांमध्ये वापर केल्यामुळे जेवणाच्या चवीवर आणि त्याच्या गुणवत्तेवर त्याचा परिणाम दिसून येतो. कधी कधी लसणची पाकळी बारीक दळल्यामुळे पदार्थाच्या चवीमध्ये कडूपणा वाढू शकतो. आयुर्वेदानुसार, लसूण व्यवस्थित सोलून खाल्लयामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. यानंतर काही वेळ उघड्या हवेत ठेवा. असे केल्याने लसणात असलेले औषधी घटक अॅलिसिन सक्रिय होते. यामुळे आरोग्याला अधिक फायदेशीर ठरतो.




लसूण खाण्याचे फायदे :
लसणात असलेले अॅलिसिन शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. यामुळे संसर्ग आणि फ्लू सारख्या आजारांना प्रतिबंध करण्यास मदत होते. लसूण खाल्ल्याने पचनसंस्था सुधारू शकते. हे आतड्यांचे आरोग्य राखण्यास मदत करते आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून मुक्त होते. ज्या लोकांना पचनाच्या समस्या आहेत त्यांनी लसूण खावे. लसूण खाल्ल्याने कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होऊ शकते. त्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रित करण्यास मदत करू शकतात, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.