वजनावर नियंत्रण, पोटाच्या त्रासांवरही उपयुक्त, गाजर खाण्याचे जबरदस्त फायदे

गाजर खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. गाजरात व्हिटॅमिन ए, बी, सी, डी, ई, जी असतात.

वजनावर नियंत्रण, पोटाच्या त्रासांवरही उपयुक्त, गाजर खाण्याचे जबरदस्त फायदे
गाजर
Follow us
| Updated on: Mar 31, 2021 | 9:16 AM

मुंबई : गाजर खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. गाजरात व्हिटॅमिन ए, बी, सी, डी, ई, जी असतात. त्यामुळे गाजर खाणे शरीरासाठी फायद्याचे आहे. यामुळे अनेक आजारांवर मात करता येते. गाजर खाल्ल्याने हाडे निरोगी राहण्यापासून ते डोळ्यांचा कमकुवतपणा देखील दूर होतो. गाजरात 95 टक्के पाण्याचे प्रमाण असते. ज्यामुळे गाजर खाण्यामुळे तुम्ही हायड्रेट राहता. चला तर मग जाणून घेऊयात गाजर खाण्याचे इतर कोणते फायदे आपल्या शरीराला होतात. (Carrots are extremely beneficial for your health)

-निरोगी राहण्यासाठी आहाराबाबत काळजी घेऊन आणि वजन नियंत्रित ठेवून टाईप 2 मधुमेह कमी करता येऊ शकतो. काही संशोधनानुसार आहारात व्हिटॅमिन ए चा समावेश करून तुम्ही टाईप 2 मधुमेहावर उपचार करू शकता. गाजरात व्हिटॅमिन ए मुबलक असल्यामुळे मधुमेहींसाठी गाजर खाणं नेहमीच फायद्याचं ठरू शकतं.

-एका गाजरामध्ये अंदाजे 95 % पाणी असतं. शिवाय एका मध्यम आकाराच्या गाजरात जवळजवळ 25 कॅलरिज असतात. ज्यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी तुमच्या आहारात गाजर असणं अतिशय गरजेचं आहे. गाजरातील फायबर्समुळे तुमचं पोट बराच काळ भरल्यासारखं वाटतं.

-गाजरात फायबर्स, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी असे अनेक पोषक घटक असतात. ज्यामुळे तुमच्या रक्तदाब चांगला राहतो. आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी दररोज गाजराचा रस पिणे चांगले असते.

-पोटाच्या आणि आतड्याच्या तक्रारीवर गाजर उपयुक्त ठरतं. पोटात जंत झाले असतील, तर रोज सकाळी एक कप गाजराचा रस घेतल्यास जंत निघून जातील.

-गाजरात कॅल्शियम, फायबर, व्हिटॅमिन सी, बी इत्यादी शरीराला आवश्यक असणारे घटक असतात. त्यामुळे हृदयरोग असणाऱ्यांच्या आहारात गाजर असायलाच हवे. तसेच ज्यांना नाही त्यांनीही नियमित गाजर खाल्ल्यास हृदयरोग होण्याची शक्यता कमी असते.

-गाजरमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. यामुळे गाजर चावून चावून खाल्ल्याने आतड्यांची स्वच्छता होते. यामुळे बध्दकोष्ठ आणि गॅस सारख्या समस्यापासुन आराम मिळतो. पोटाच्या आणि आतड्याच्या तक्रारीवर गाजर उपयुक्त ठरतं.

-गाजर दात आणि हिरड्यांच्या आरोग्यासाठीही परिणामकारक ठरतं. जेवणानंतर गाजर खाल्ल्याने दात स्वच्छ होतात.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

(Carrots are extremely beneficial for your health)

दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.