Valentine’s Day 2023 | पार्टनरला हे खास गिफ्ट देत साजरा करा व्हॅलेंटाईन डे

| Updated on: Feb 06, 2023 | 8:59 PM

आपल्या जोडीदाराला आपण ब्रेसलेट गिफ्ट देऊ शकतो. विशेष म्हणजे आजकाल ब्रेसलेटमध्ये अनेक पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत.

Valentines Day 2023 | पार्टनरला हे खास गिफ्ट देत साजरा करा व्हॅलेंटाईन डे
Follow us on

मुंबई : फेब्रुवारीचा महिना सुरू होताच अनेकांना आठवण होते ती म्हणजे व्हॅलेंटाइन डेची (Valentine’s Day)…व्हॅलेंटाइन डे हा दिवस अनेकांच्या आयुष्यामध्ये अत्यंत खास असतो. या दिवशी अनेकजण आपले प्रेम व्यक्त करतात. असे म्हणतात की, प्रेमासाठी कोणत्याही एक खास दिवस नाहीये…परंतू तरूण पिढीमध्ये व्हॅलेंटाइन डे बद्दल एक खास आकर्षण नक्कीच बघायला मिळते. विशेष म्हणजे अनेकांना या दिवशी स्वत: चे आयुष्यभराचे प्रेम मिळते. अनेक वेळा आपण एखाद्या व्यक्तीवर प्रचंड प्रेम करतो…परंतू ते प्रेम व्यक्त करू शकत नाहीत. मनातील प्रेम एखाद्या व्यक्तीसमोर सांगून प्रपोज करणे अनेकांना अवघड वाटते. १४ फेब्रुवारी प्रेम व्यक्त करण्याचाच एक दिवस आहे. एक आठवड्यापूर्वीच व्हॅलेंटाइन डे सुरू होतो. वेगवेगळे डे साजरे केले जातात. यामध्ये प्रपोज डे, चॉकलेट डे, प्रॉमिस डे, टेडी डे, किस डे, हग डे असे बरेच दिवस येतात आणि शेवटी व्हॅलेंटाइन डे साजरा केला जातोय. अनेक मुलींना कायमच प्रश्न पडतो की, आपल्या जोडीराला नेमके काय गिफ्ट व्हॅलेंटाइन डेला द्यावे…

आपल्या जोडीदाराला आपण ब्रेसलेट गिफ्ट देऊ शकतो. विशेष म्हणजे आजकाल ब्रेसलेटमध्ये अनेक पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत. जर तुमचे बजेट चांगले असेल तर तुम्ही सोन्याचे किंवा चांदीचे ब्रेसलेट देखील देऊ शकता. जास्त महागाडे ब्रेसलेट देणे शक्य नसेल तर तुम्ही लेदर ब्रेसलेट आपल्या प्रियकराला गिफ्ट करू शकता.

आजकाल स्मार्ट वॉचची मोठी क्रेझ बघायला मिळते. काॅलेज, आॅफिस किंवा जिममध्ये अनेक जणांच्या हातावर स्मार्ट वॉच दिसते. जर तुमच्या जोडीदाराकडे स्मार्ट वॉच नसेल तर तुम्ही त्याला स्मार्ट वॉच या खास व्हॅलेंटाइन डे गिफ्ट म्हणून नक्कीच देऊ शकतात. हे गिफ्ट तुमच्या जोडीदाराला देखील प्रचंड आवडेल.

जोडीदाराला गिफ्ट देण्यासाठी परफ्यूम हा देखील मोठा पर्याय आहे. विशेष म्हणजे बाजारामध्ये तुम्हाला अनेक प्रकारचे परफ्यूम अगदी सहज मिळू शकतात. तुमच्या बजेटमधील परफ्यूम मिळू शकतो. तुमच्या जोडीदाराला जो परफ्यूम आवडतो तो तुम्ही देऊ शकता. जर तुमच्याकडे खरेदीसाठी वेळ फार कमी असेल तर तुमच्यासाठी परफ्यूम हा सर्वात चांगला पर्याय ठरले.

जर तुमच्या जोडीदाराकडे लॅपटाॅप असेल तर तुम्ही त्याला चांगल्या कंपनीची एक बॅग देखील गिफ्ट करू शकता. कारण बाहेर जाताना नेहमीच्याच लॅपटाॅप बॅग घेऊन जाताना अनेकांना कंटाळा येतो. विशेष म्हणजे जर तुम्ही तुमच्या प्रियकराला होल्ड ऑल बॅग गिफ्ट केली तर लॅपटाॅपसोबत इतरही साहित्य त्याचे या बॅगमध्ये बसू शकते.