Jewellery Market | मुंबई येथील सर्वात स्वस्त आणि मस्त ज्वेलरी मार्केट, मिळतील आकर्षक दागिने
Jewellery Market | कोणत्याही आऊटफिटवर ज्वेलरी घ्यायची असल्यास मुंबईतील 'हे' मार्केट आहे बेस्ट, कमी दरात मिळतील आकर्षक दागिने... मुंबईत राहात असाल तर, तुम्हाला या मार्केटबद्दल नक्की माहिती असेल.. पण मुंबई बाहेरून येणारे नागरिक होतील अवाक्
कोणतेही कपडे घातले तर त्यावर दागिने कोणते घालायचे असा प्रश्न कायम महिलांना पडलेला असतो. अशात प्रत्येक ड्रेसवर, साडीवर एकच ज्वेलरी कशी घालणार? असे प्रश्न देखील महिलांना पडलेले असतात. एवढंच नाहीतर, दागिने एकदाच घालायचे नंतर असेच पडून राहतील… असा विचार देखील अनेक महिला करतात. पण मुंबईत असे काही मार्केट आहेत, जेथे तुम्हाला कमी किंमतीत पण चांगले दागिने मिळू शकतील. ज्यामुळे प्रत्येक ड्रेसवर तुम्ही वेगळे दागिने घालू शकता.
एवढंच नाही तर, सध्याच्या दिवसांमध्ये सोन्याचे दागिने घालणं देखील धोक्याचं आहे. त्यामुळे महिला आर्टिफिशियल दागिन्यांना अधिक महत्त्व देतात. आर्टिफिशियल दागिने सोने-चांदीचे नसले तरी दिसायला प्रचंड आकर्षक दिसतात. तर मुंबईत असे काही मर्केट आहेत, जेथे तुम्हाला स्वस्त आणि आकर्षक दागिने मिळतीत.
कोलाबा कॉजवे – या मार्केटमध्ये तुम्हाला पॉकेटफ्रेंडली दागिने मिळतील. जर तुम्हाला आकर्षक दागिने खरेदी करायचे असतील तर तुम्ही एकदा तरी कोलाबा कॉजवे मार्केटमध्ये अनेक प्रकारचे दागिने आहेत. तुम्ही सुंदर ऑक्सिडाइज्ड कानातले ते नेकलेस, नोज पिन इत्यादींपर्यंत बरेच काही खरेदी करू शकता. चर्चगेट स्टेशनपासून कोलाबा मार्केट फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर आहे.
हिल रोड – हिल रोड देखील शॉपिंगसाठी उत्तम ठिकाण आहे. हिल रोड कपड्यांसाठी प्रसिद्ध आहे. पण मार्केटमध्ये दागिने देखील मिळतात. तुम्ही येथे ऑक्सिडाइज्डचे दागिने खरेदी करू शकता. रस्त्यावरील स्टॉल्सपासून ते दुकानांपर्यंत अनेक प्रकारचे दागिने मिळतील. वांद्रे स्थानकापासून बाजारपेठ जवळ आहे. स्टेशनपासून सुमारे 20 मिनिटांच्या अंतरावर आहे.
लिंकिंग रोड – वांद्रे येथे लिंकिंग रोड देखील शॉपिंगसाठी बेस्ट ठिकाण आहे. येथे वेस्टर्न कपडे मिळतात. शिवाय ज्वेलरीसाठी देखीव मार्केट प्रसिद्ध आहे. मार्केटमध्ये तुम्ही नेकपीसपासून इयररिंग्स, ब्रेसलेट, आंगठी मिळतात. वांद्रे स्टेशनबाहेरून लिंकिंग रोडला जाण्यासाठी रिक्षा मिळतात.
भुलेश्वर – सणांच्याद दिवशी भुलेश्वर मार्केटमध्ये फार गर्दी असते. शिवाय लग्नासाठी दागिने खरेदी करायचे असल्यास देखील अनेक जण भुलेश्वर मार्केटमध्ये येतात. भुलेश्वर मार्केट हे मुंबईतील फार जुनं मार्केट आहे. पारंपरिक दागिने खरेदी करण्यासाठी भुलेश्वर मार्केट उत्तम पर्याय आहे. येथे तुम्हाला सर्व प्रकारचे दागिने सहज मिळतील, त्यामुळे तुम्ही येथे एकदा अवश्य भेट द्या.