मुलांना घरात एकटे सोडताय…मग अशी घ्या काळजी! पालकांनो ‘या’ 5 गोष्टी सोबत असतील तरच, मुलांना घरात एकटे सोडा!
पालकांवर अनेकदा मुलांना घरात एकटे सोडण्याची वेळ येते. कधी कामासाठी तर कधी आपत्कालीन परिस्थितीत पालक मुलांना घरी एकटे सोडून जातात. पालकांनी आपल्या मुलांना अशा परिस्थितीसाठी तयार केले पाहिजे. परंतु, मुलांना घरात एकटे सोडण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणेही गरजेचे असते.
अचानक तुम्हाला कधीतरी घर सोडावे लागते आणि तुमचे मूल घरात एकटेच राहणार असते, अशी परिस्थिती कधी आपल्यावर येईल अशी कल्पनाही (Imagination too) तुम्ही केली नसेल. पण, तुम्ही तुमच्या मुलाला ही परिस्थिती हाताळायला शिकवले तर बरे होईल. अशा छोट-छेाट्या गेाष्टींच्या मदतीने तुमचे मूल स्वावलंबी (Child self-reliance) बनू शकेल आणि कोणतीही अडचण आली तर, तो चांगल्या प्रकारे हाताळू शकेल आणि तुम्हीही आत्मविश्वासाने निर्धास्त राहू शकाल. मुलांना घरी एकटे असताना काय लक्षात ठेवावे हे माहिती असले पाहिजे. तुम्ही जवळच बाजारपेठेत जात असाल तरीही तुम्हाला पोहोचायला 15 ते 20 मिनिटे लागतील, अशा परिस्थितीतही तुम्ही तुमच्या मुलांना घरात एकटे राहण्यासाठी काही गोष्टी जाणीवपूर्वक शिकवल्या पाहिजेत. मानसशास्त्रज्ञाच्या मते, मुलांना घरी एकटे राहण्यास शिकवले तर ते अधिक स्वावलंबी, जबाबदार आणि आत्मविश्वासू (confident) बनतात. मुलांना घरी एकटे सोडत असाल तर, जाणून घ्या, काही टिप्स. या टिप्सच्या मदतीने तुम्ही तुमच्या मुलाला घरी एकटे राहण्यासाठी तयार करू शकता.
आपतकालीन क्रमांक
घरातील फोन जवळच कुटुंबातील महत्त्वाचे मोबाईल क्रमांक असायला हवे. मोबाईल मध्ये सर्वांचेच नंबर असतात तरीही तुम्ही त्याला 2 ते 3 आपत्कालीन नंबरची आठवण करू द्यायला हवी. ते, नंबर कोणत्या नावाने सेव आहेत. याबाबत देखील मुलांना माहिती हवी. उदा. मुलाच्या वडिलांचा नंबर त्यांच्या नावाने सेव असेल तर..त्याला पप्पा नावाने सेव करून घ्या. त्यात पप्पा-मम्मी दोघांचे मोबाईल नंबर, जवळचे नातेवाईक आणि विश्वासू शेजाऱ्यांचे नंबर असावेत. तुम्ही संपर्क क्रमांकांची डायरीही घरी ठेवू शकता. घरातून बाहेर पडल्यानंतर मुलाच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी सतत फोन करत राहा.
स्क्रीन वेळ
तुमच्या अनुपस्थितीत, मूल सर्व वेळ टीव्ही पाहण्यात, व्हिडिओ गेम खेळण्यात किंवा इंटरनेट वापरण्यात घालवू शकतात. तुम्ही स्क्रीन टाइमबद्दल थोडे कठोर असले पाहिजे आणि मुलाला असे नियम त्याच्यासाठी का आवश्यक आहेत हे समजावून सांगावेत. जेणे करून तो, तुमच्या अनुपस्थितीतही जबाबदारीने वागेल
सुरक्षितता
सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून, घरी एकटे राहणे कठीण होऊ शकते. तुम्ही मुलाला गॅस सुरू करायला आणि बंद करायला शिकवले पाहिजे. त्याला सांगा की, तुम्ही घरी नसताना चाकू वगैरे वापरू नका. इलेक्ट्रीक बोर्ड चा वापर केवळ बटण दाबण्या पुरते करावे, कुठलेही विद्युत उपकरण जसे, इस्त्री, हिटर,गिझर, फ्लोअर क्लीनर मशिन अशा तत्सम उपकरणे वापरु नका अशी ताकीद मुलांना द्यावीत.
अन्न पदार्थ
घरात मुलं एकटे असल्यास मुलासाठी स्नॅक्स किंवा काहीतरी खायला हवे. तुम्ही घरी नसताना, मुलाला काही शिजवण्याची गरज नसावी आणि त्याने तयार अन्न खाऊन आपली भूक भागवावी. कारण, एकटे असताना गॅस सुरू करणे धोकादायक ठरू शकते. जर तुम्हाला माहीत असेल की, आज तुम्हाला मुलाला घरी एकटे सोडायचे आहे, तर त्याच्यासाठी आगाऊ जेवण तयार करा. आणि, ते काढूनही ठेवा.
दरवाजा कधी उघडायचा
कोणी दार ठोठावलं की, गेट उघडायचं की, नाही हा सर्वात महत्त्वाचा नियम आहे. बाहेर कोण आहे हे कळेपर्यंत दार उघडू नये असे मुलाला शिकवा. अनोळखी व्यक्तींना अजिबात प्रवेश देऊ नका. काही ओळखी असतील तर आधी पालकांना फोन करून विचारा.