ख्रिसमस गिफ्ट ठरू शकते कॅन्सरचं कारण, ‘या’ टिप्स फॉलो करा
Christmas Popular Gift: ख्रिसमस आणि नववर्ष येत आहे. या पार्श्वभूमीवर बाजारपेठा सजल्या आहेत. विविध प्रकारचे गिफ्ट्स विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. हे घेण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. ख्रिसमसला लोक आपल्या पार्टनरला, मित्र-मैत्रिणींना भेटवस्तू देतात, जे विकत घेण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. पण, तुम्हाला काही गोष्टी जाणून घ्यायला हव्या.
Christmas Popular Gift: ख्रिसमस आणि नववर्ष येत आहे. ज्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. ख्रिसमसला लोक आपल्या पार्टनरला, मित्र-मैत्रिणींना भेटवस्तू देतात, जे विकत घेण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. या काळात स्मार्ट घड्याळांसारख्या हायटेक भेट वस्तूंची मागणी सर्वाधिक असते.
ख्रिसमसमध्ये तुम्ही तुमच्या प्रियजनांना स्मार्ट वॉच देण्याचा विचार करत असाल तर एकदा नक्की विचार करा. स्मार्ट वॉचच्या पट्ट्यात कॅन्सर, वंध्यत्व आणि इतर गंभीर आजारांना कारणीभूत ठरू शकणारी धोकादायक रसायने असू शकतात, असे नुकत्याच झालेल्या एका अभ्यासातून समोर आले आहे.
पॉलीफ्लोरोअल्किल पदार्थ नावाची घातक रसायने
अमेरिकेतील नोट्रे डेम विद्यापीठातील संशोधकांनी 22 स्मार्ट वॉच ब्रँडचा अभ्यास केला. यापैकी 15 ब्रँडमध्ये परफ्लुरोअल्किल आणि पॉलीफ्लोरोअल्किल पदार्थ (PFAS) नावाची घातक रसायने आढळली. या रसायनांना ‘फॉरएव्हर केमिकल्स’ म्हणतात कारण ते ना शरीरात तुटतात ना वातावरणात. PFAS चा वापर बऱ्याचदा घड्याळांचा पट्टा मजबूत आणि टिकाऊ बनविण्यासाठी केला जातो.
कोणत्या आजारांचा धोका वाढतो?
PFAS च्या संपर्कात आल्यास कर्करोग, थायरॉईड, हार्मोनल असंतुलन, वंध्यत्व आणि शरीरात न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर सारख्या समस्यांचा धोका वाढू शकतो. ही रसायने त्वचेच्या संपर्कात येऊन शरीरात प्रवेश करू शकतात. विशेष म्हणजे महागड्या ब्रँडमध्ये या रसायनांचे प्रमाण स्वस्त ब्रँडपेक्षा जास्त असल्याचे आढळून आले.
काय धोका?
संशोधकांनी सांगितले की, ही रसायने त्वचेच्या माध्यमातून स्मार्ट घड्याळे घातलेल्या लोकांच्या शरीरात बराच काळ प्रवेश करू शकतात. एका अभ्यासानुसार असे आढळले आहे की ज्या लोकांनी 115 दिवस पीएफएएस युक्त सनस्क्रीन वापरले त्यांच्या त्वचेने सुमारे 1.6 टक्के रसायने शोषून घेतली.
स्मार्टवॉच खरेदी करताना ‘या’ गोष्टी लक्षात
‘ही’ उत्पादने टाळा: तुम्ही स्मार्टवॉच खरेदी करण्याचा विचार करत असाल तर फ्लोरोइलास्टोमर्सचा उल्लेख असलेली उत्पादने टाळा. पट्टा बदलणे: शक्य असल्यास घड्याळाच्या सिलिकॉन किंवा प्लॅस्टिकच्या पट्ट्याऐवजी चामड्याचा किंवा कापडाचा पट्टा वापरावा. वेळ मर्यादित करा: स्मार्टवॉचचा वापर मर्यादित कालावधीसाठी करा आणि झोपेच्या वेळी ते काढून टाकण्यास विसरू नका.
लक्ष्यात ठेवा की, स्मार्ट वॉचच्या पट्ट्यात कॅन्सर, वंध्यत्व आणि इतर गंभीर आजारांना कारणीभूत ठरू शकणारी धोकादायक रसायने असू शकतात, असे नुकत्याच झालेल्या एका अभ्यासातून समोर आले आहे. यामुळे कोणतीही गोष्ट घेताना वरील गोष्टींचा विचार करून गोष्टी विकत घ्या.