यंदा घरीच करताय ख्रिसमस पार्टी; मग पार्टीसाठी तयार करा हे हेल्दी ड्रिंक्स

दरवर्षी 25 डिसेंबर रोजी ख्रिसमस सण मोठा उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी पार्टीचे आयोजन केले जाते. जर तुम्ही यावर्षी तुमच्या घरी ख्रिसमस पार्टीचे आयोजन करणार असाल तर तुम्ही तुमच्या पाहुण्यांना हेल्दी ड्रिंक्स नक्की देऊ शकता. जाणून घ्या हे ड्रिंक्स बनवण्याची रेसिपी.

यंदा घरीच करताय ख्रिसमस पार्टी; मग पार्टीसाठी तयार करा हे हेल्दी ड्रिंक्स
Follow us
| Updated on: Dec 18, 2024 | 4:36 PM

ख्रिसमस हा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. क्रिसमस सणासाठी बाजारपेठा आणि शॉपिंग मॉल अतिशय सुंदर पद्धतीने सजवण्यात आले आहेत. मुलांना ख्रिसमस सण खूप आवडतो. कारण ते सांताक्लॉजकडून मिळालेल्या गिफ्टची आतुरतेने वाट पाहत असतात. जे त्यांच्या पालकांनी त्यांना गुप्त पद्धतीने दिलेल्या वस्तू असतात. ख्रिसमस अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ख्रिसमसच्या दिवशी चर्च मध्ये जाऊन प्रार्थना करतात. या दिवशी अनेक प्रकारचे कार्यक्रम आणि पार्टीचे आयोजन केले जातात. ख्रिसमसच्या दिवशी अनेकजण मित्र आणि परिवारासोबत बाहेर जाण्याचा विचार करतात. तर काहीजण घरीच ख्रिसमस साजरा करतात. जर तुम्ही तुमच्या घरी ख्रिसमस पार्टीचे आयोजन करत असाल तर तुमच्या पाहुण्यांसाठी ही हेल्दी ड्रिंक्स तुम्ही नक्की ट्राय करा.

हॉट चॉकलेट

ख्रिसमसच्या पार्टीसाठी तुम्ही तुमच्या पाहुण्यांसाठी घरीच हॉट चॉकलेट बनवू शकतात. ही बनवण्यासाठी एका पॅनमध्ये दूध आणि कोको पावडर घालून चांगले मिक्स करा. यानंतर मिश्रणाला एक उकळी येऊ द्या आणि चमच्याने अधून मधून ढवळत रहा. हे मिश्रण चांगले गरम झाल्यावर त्यात साखर आणि व्हॅनिला इसेन्स टाका. आता त्यात चॉकलेट घाला आणि चांगले मिक्स करा. चॉकलेट पूर्णपणे वितळल्यानंतर ते बंद करा. तुमचे हॉट चॉकलेट तयार आहे.

आवळ्याचे सरबत

हिवाळ्यात आवळा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो. तुम्हीही तुमच्या घरीच ख्रिसमस पार्टीचे आयोजन करत असाल तर या पार्टीला आवळा शरबत देखील बनवू शकतात. हे बनवण्यासाठी आवळा नीट धुऊन कापून घ्या. आता त्याला मिक्सरमध्ये टाकून त्याचा रस बनवा. रस बनवताना एक ग्लास पाणी घाला आणि आवळ्याची तयार पेस्ट एका मऊ कापडामधून गाळून घ्या. त्यानंतर एका पातेल्यात आवळा पाणी आणि साखर घालून ते चांगले एकजीव झाल्यावर गॅस बंद करा आणि त्यात थोडी पुदिन्याची पाने आणि लिंबाचा रस घाला. हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्या आणि नंतर ते गाळून घ्या. आवळा सरबत सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.

बाजरी राब

पार्टीसाठी येणाऱ्या पाहुण्यांसाठी तुम्ही बाजरीचे राब देखील तयार करू शकतात. हे बनवण्यासाठी सर्वप्रथम मंद आचेवर तवा ठेवा आणि त्यात तूप गरम करा. आता त्यामध्ये ओवा टाकून भाजून घ्या. आता त्यात बाजरीचे पीठ घालून थोडा वेळ भाजून घ्या. त्यानंतर त्यात गरम पाणी घालून चांगले मिक्स करा. हे मिश्रण सतत ढवळत रहा जेणेकरून त्यात गुठळ्या होणार नाहीत. त्यानंतर त्यात गूळ, दालचिनी पावडर, लवंग पावडर आणि सुंठ पावडर घालून मिक्स करा. सुमारे पाच मिनिटे हे उकळून द्या जेणेकरून पेस्ट थोडी घट्ट होईल. आता त्यात किसलेले कोरडे खोबरे घाला यानंतर बारीक चिरलेले काजू आणि बदाम घाला आणि गरमागरम सर्व्ह करा.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.