रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी दालचिनी, वेलची आणि लवंग फायदेशीर !

देशामध्ये पुन्हा एकदा कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी दालचिनी, वेलची आणि लवंग फायदेशीर !
Follow us
| Updated on: Apr 18, 2021 | 8:08 AM

मुंबई : देशामध्ये पुन्हा एकदा कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. यासर्व परिस्थितीमध्ये आपल्या आरोग्याची काळजी घेत कोरोनापासून दूर राहण्यासाठी आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवावी लागणार आहे. यासाठी आपल्याला चांगला आहार घ्यावा लागणार आहे. तसेच काही आयुर्वेदिक उपचार देखील घरचे घरी घ्यावे लागणार आहेत. ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहण्यास मदत होईल. (Cinnamon, cardamom and cloves are beneficial for boosting the immune system)

-दालचिनी

-वेलची

-लवंग

-हळद

-आले हे सर्व एक ग्लास पाण्यात घाला आणि पाणी चांगले उकळून घ्या मग गाळून घ्या आणि प्या. आपण हे पाणी दररोज संध्याकाळी पिले पाहिजे. यामुळे आपले रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. मात्र, हे पाणी शक्यतो संध्याकाळीच पिले पाहिजे. सकाळी हे पाणी चुकूनही पिऊ नका. दालचिनी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. तसेच दालचिनीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. ज्यामुळे आपल्या चेहर्‍यावरील मुरुम कमी होण्यास मदत होते.

वेलचीमुळे आपल्या फुफ्फुसात जलद रक्त संचार होतो. यामुळे दमा, तीव्र सर्दी आणि खोकला यासारख्या श्वासोच्छवासाच्या समस्यांपासून आराम मिळतो. आयुर्वेदात वेलची उष्ण पदार्थ मानली जाते, जी शरीराला उबदारपणा देते. वेलची कमी प्रमाणात सेवन केल्याने आपला रक्तदाब नियंत्रणात राहतो. आपल्या शरीरातील बहुतेक रोग उच्च रक्तदाबमुळे उद्भवतात. जर आपण दररोज कमीतकमी 3 वेलची खाल्ली, तर आपला संपूर्ण रक्तदाब नियंत्रणात राहील

लहानशी दिसणारी लवंग रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. लवंगमध्ये पोटॅशियम, प्रथिने, लोह, सोडियम, कर्बोदके, कॅल्शियम आणि हायड्रोक्लोरिक आम्लाचे प्रमाण देखील असते. लवंगामध्ये व्हिटामिन ए आणि सी देखील आढळतात. तसेच त्यात मॅग्नेशियम आणि फायबर देखील भरपूर प्रमाणत आढळतात. लवंगामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असतात. अँटीऑक्सिडंट ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करतात.

हळद सर्दी, पडसे, खोकला आणि ताप प्रतिबंधित करते. तसेच, हळदीत भरपूर प्रमाणात आढळणारे अँटीसेप्टिक आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म शरीरातील बुरशीजन्य संक्रमण काढून टाकते. हळदीचे नियमित सेवन केल्याने खराब कोलेस्ट्रॉल कमी होते आणि त्यामुळे हृदयाशी संबंधित सर्व समस्यांचा धोका कमी होतो. हळद शरीरातील इन्सुलिन संतुलित करते. तसेच, ग्लूकोज नियंत्रित करते. त्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांसाठीही हळद खूप फायदेशीर ठरते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

(Cinnamon, cardamom and cloves are beneficial for boosting the immune system)

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.