दालचिनीचा चहा घ्या आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवा, पाहा रेसिपी !

दालचिनी प्रत्येक स्वयंपाक घरामध्ये आढळते. आपल्या अन्नाची चव दालचिनीमुळे वाढते.

दालचिनीचा चहा घ्या आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवा, पाहा रेसिपी !
Follow us
| Updated on: May 03, 2021 | 8:22 AM

मुंबई : दालचिनी प्रत्येक स्वयंपाक घरामध्ये आढळते. आपल्या अन्नाची चव दालचिनीमुळे वाढते. दालचिनी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. तसेच दालचिनीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. ज्यामुळे आपल्या चेहर्‍यावरील मुरुम कमी होण्यास मदत होते. सध्याच्या कोरोना काळात आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे आवश्यक आहे. (Cinnamon tea is beneficial for boosting the immune system)

अन्नाची चव वाढवण्यासाठी मसाला म्हणून वापरली जाणारी दालचिनी खूप फायदेशीर आहे. दालचिनी चहा रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास उपयुक्त आहे. जाणकारांच्या मते, दालचिनीमध्ये अनेक औषधी घटक असतात. यात अँटी-ऑक्सीडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मदेखील आहेत. टाईप- 2 मधुमेह आणि इन्सुलिन रेसिस्टंटमध्ये दालचिनी चहा रामबाण उपाय आहे. प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी दालचिनी चहा फायदेशीर आहे. यासाठी दररोज सकाळी आणि संध्याकाळी दोन कप दालचिनी चहा प्या.

दालचिनीमध्ये अँटी-एजिंग गुणधर्म आहेत. जे वाढत्या वयात आपल्या चेहऱ्यावरील बारीक रेषा आणि सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात. दालचिनी त्वचेचे वृद्धत्व कमी करण्यात फायदेशीर ठरू शकते. यासाठी एक चमचा दालचिनीची पावडरमध्ये 2 चमचे नारळ तेल किंवा ऑलिव्ह ऑइलमध्ये मिसळा. या पेस्ट सुमारे 15 मिनिटे चेहऱ्याला मालिश करा आणि नंतर पाण्याने चेहरा धुवून टाका. हे क्रिया आपल्या त्वचेला मॉइश्चराइज करेल आणि त्वचा नितळ ठेवण्यास मदत करेल.

माझंदरण वैद्यकीय विज्ञान विद्यापीठाच्या संशोधनात दालचिनीचे वर्णन मधुमेहावरील औषध म्हणून करण्यात आले आहे. मधुमेहाचा प्रभाव कमी करण्यासाठी दालचिनी प्रभावी ठरू शकते, हे या संशोधनातून समोर आले आहे. यासाठीच मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या सोयीनुसार दालचिनीचा जेवण, चहामध्ये वापर करावा. दालचिनीचे सेवन रक्तातील साखर नियंत्रित करण्यास खूप मोठी मदत करते. त्यामुळे मधुमेह वा रक्तदाब असेल तर चिंता करण्याची गरज नाही.

संबंधित बातम्या : 

Milk Testing : सावधान! घट्ट दिसण्यासाठी दुधात मिसळले जातायत ‘हे’ घटक, अशी तपासा दुधाची शुद्धता

(Cinnamon tea is beneficial for boosting the immune system)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.