झुरळाच्या लाळेनेही होऊ शकते विषबाधा, हे माहीत आहे का?; घरातून झुरळ पळवण्यासाठी ‘या’ घरगुती टिप्स फाॅलो करा !

जवळपास सर्वांचाच घरात झुरळ फिरताना दिसतात. मात्र, या झुरळ्यांकडे आपण सर्वचजण दुर्लक्ष करतो.

झुरळाच्या लाळेनेही होऊ शकते विषबाधा, हे माहीत आहे का?; घरातून झुरळ पळवण्यासाठी 'या' घरगुती टिप्स फाॅलो करा !
झुरळ
Follow us
| Updated on: May 21, 2021 | 3:39 PM

मुंबई : जवळपास सर्वांचाच घरात झुरळ फिरताना दिसतात. मात्र, या झुरळ्यांकडे आपण सर्वजण दुर्लक्ष करतो. विशेष करून झुरळे स्वयंपाक घरात जास्त आढळतात. कधी पातेल्यावर, ताटात, गॅसच्या टाकीवर, फ्रीजवर, ग्रॅस वोट्यावर तर कधी-कधी ही झुरळे भाज्यावर आणि शिजवलेल्या अन्नावर देखील दिसतात. मात्र, आपण त्यांना पळवून लावतो आणि त्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र, असे करणे धोकादायक आहे. कारण झुरळाची लाळ अन्नात मिसळल्यास विषबाधा होऊ शकते. झुरळ्याचा शरीरावर अनेक बॅक्टेरिया असतात. त्यामुळे विषबाधा होण्याची अधिक शक्यता असते. (Cockroach saliva can also cause poisoning)

कडुलिंबाची ताजी पाने

कडुलिंबामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. घरातील झुरळ पळून लावण्यासाठी कडुलिंबाची पाने अत्यंत फायदेशीर आहेत. यासाठी आपल्याला घरातील कोपऱ्यांमध्ये कडुलिंबाची ताजी पाने ठेवावी लागतील. कडुलिंबाच्या वासामुळे झुरळे घरात येणार नाहीत.

कांदा आणि लसणाचे पाणी

कांदा आणि लसूण आपल्या आहारातील महत्वपूर्ण घटक आहेत. घरामध्ये असलेले झुरळ बाहेर पळवण्यासाठी कांदा आणि लसणाचे पाणी फायदेशीर आहे. यासाठी आपल्याला कांदा आणि लसणाची पेस्ट करावी लागेल. त्या पेस्टमध्ये थोडे पाणी घाला आणि एका बाटलीमध्ये ठेवा. झुरळ दिसले की, त्याच्यावर हे पाणी टाका.

लवंग फायदेशीर

आपल्यापैकी बहुतेक लोकांना लवंगबद्दल नक्कीच माहिती असेल. बर्‍याच प्रसंगी लवंगांचे सेवन केले जाते. लवंग आरोग्याच्या दृष्टीनेही बरेच फायदे आहेत. ज्याठिकाणी झुरळ जास्त प्रमाणात येतात. अशा ठिकाणी आपण चार ते पाच लवंग ठेवल्या पाहिजेत. यामुळे परत त्या जागेवर झुरळ कधी येणार नाहीत.

बोरिक पावडर फायदेशीर

घरामध्ये झुरळ असणे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. यामुळे घरातून झुरळ काढण्यासाठी आपण बोरिक वापडर वापरली पाहिजे. झुरळ ज्याठिकाणी जास्त फिरतात तिथे बोरिक वापडर टाका. बोरिक पावडरचे पाणी करून देखील आपण झुरळ्यावर टाकू शकतो.

कॉफी आणि तंबाखूच्या गोळ्या

कॉफी आणि तंबाखूचे मिश्रण तयार करा, लहान गोळ्या तयार करा आणि जिथे सर्वाधिक झुरळ येतात. तिथे या गोळ्या ठेवा. कॉफी आणि तंबाखूच्या गोळ्यामुळे झुरळ परत तिथे येत नाहीत.

(टीप : ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे तज्ज्ञांचा सल्ला घ्या)

संबंधित बातम्या : 

Weight Loss | जपानमधील लोक ‘या’ युक्तीने करतात वजन कमी, पुन्हा कधीही येत नाही लठ्ठपणा!

Hair Treatment | केस सरळ करण्याचा विचार करताय? जाणून घ्या वेगवेगळ्या ‘हेअर ट्रीटमेंट’मधले फरक…

(Cockroach saliva can also cause poisoning)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.