त्वचा ते केसांसाठी ‘नारळाचे तेल’ जबदरस्त फायदेशीर; वाचा अधिक फायदे!

नारळाचे तेल त्वचा आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहे. नारळाच्या तेलात अनेक प्रकारचे अँटी-ऑक्सिडेंट आणि फॅटी अॅसिड असतात.

त्वचा ते केसांसाठी ‘नारळाचे तेल’ जबदरस्त फायदेशीर; वाचा अधिक फायदे!
नारळाचे तेल
Follow us
| Updated on: May 31, 2021 | 11:07 AM

मुंबई : नारळाचे तेल त्वचा आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहे. नारळाच्या तेलात अनेक प्रकारचे अँटी-ऑक्सिडेंट आणि फॅटी अॅसिड असतात, जे त्वचा आणि केसांशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी रामबाण कार्य करतात. जर तुम्हीही केसांच्या आणि त्वचेच्या काही समस्यांमुळे त्रस्त असाल तर नारळाचे तेल वापरू शकतात. चला तर मग जाणून घेऊयात नारळाच्या तेलाचा उपयोग नेमका कसा करायचा (Coconut oil is extremely beneficial for skin and hair)

नारळाचे तेल त्वचेसाठी फायदेशीर

नारळाच्या तेलात अँटी-ऑक्सिडेंट असतात, हे आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत. नारळाचे तेल त्वचेला लावले तर आपली त्वचा सुंदर होण्यास मदत होते. हे त्वचेतील कोलेजेनचे प्रमाण वाढविण्यात मदत करते. सुरकुत्या आणि बारीक पुरळ देखील कमी होण्यास मदत होते. नारळाच्या तेलामध्ये न्टी-ऑक्सिडेंटसह व्हिटॅमिन ई आणि के समृद्ध असते जे त्वचा घट्ट करण्यास मदत करते.

केसांच्या आरोग्याचे आतून संरक्षण

केसांची निगा राखण्यासाठी बाजारामध्ये प्रकारची हेअर केअर उत्पादने उपलब्ध आहेत, ज्यांचा दीर्घकालीन उपयोग केल्यामुळे केसांचे बरेच नुकसान होते. नारळाच्या तेलात केसांच्या तळाशी जपण्याची क्षमता असल्याने हे केसांच्या जीवाश्मांना पुन्हा सजीव करते आणि केसांचे आरोग्य आतून निरोगी करते. त्यामध्ये उपस्थित फॅटी अॅसिडस् आणि जीवनसत्त्वे केसांमध्ये ओलावा टिकवून ठेवतात, जो कोरडेपणा दूर करण्यात प्रभावी आहेत

मेकअप काढून टाकण्यास फायदेशीर

आपण मेकअप काढण्यासाठी नारळ तेल वापरू शकता. नारळ तेल एक नैसर्गिक मॉइश्चरायझरसारखे कार्य करते. आपल्याला त्वचेला मऊ आणि मॉइश्चरायझेशन करायचे असल्यास दररोज मेकअप काढण्यासाठी नारळाचे तेल वापरा.

ओठ्यांसाठी फायदेशीर

नारळ तेल एक नैसर्गिक मॉइश्चरायझरसारखे कार्य करते. जे त्वचा हायड्रेट ठेवण्यास तसेच ओठ मऊ ठेवण्यास मदत करते. नारळ तेल एक ते दोन चमचे घ्या आणि हे मिश्रण दिवसातून 3 ते 4 वेळा ओठांवर लावा. याचा फायदा तुमच्या ओठांना होईल.

कसे वापरायचे

रात्री झोपायच्या आधी थोडे नारळ तेल घ्या आणि ते चेहऱ्यावर लावा. याशिवाय तुम्ही हलक्या हातांनी चेहऱ्यावर मालिश करू शकता आणि सकाळी उठून कोमट पाण्याने धुवा. नारळ तेलात आवश्यक फॅटी अॅसिड असतात जे केसांच्या वाढीस मदत करते. हे टाळू आणि केसांच्या रोमांना पोषण देण्याचे कार्य करते, जे आपले केस लांब, जाड आणि मजबूत करते.

सर्वोत्कृष्ट केस संरक्षक (प्रोटेक्टर)

केसांच्या संरक्षणासाठी नारळ तेल सर्वोत्तम आहे. उन्हात आणि उष्ण वातावरणात केसांना बर्‍याच समस्यांना सामोरे जावे लागते. केसांमध्ये असलेला नैसर्गिक ओलावा सूर्यप्रकाशामुळे देखील कमी होऊ लागतो. यामुळे केस कोरडे पडतात. परंतु नारळ तेलामुळे या समस्या टाळता येऊ शकतात. रिसर्चगेटच्या संशोधनातून असे दिसून आले आहे की, नारळ तेलाच्या मालिशमुळे ते केसांच्या तळाशी पोहचते आणि केसांचा ओलावा टिकवून ठेवणारा संरक्षण थर तयार करते. त्यात एसपीएफसह अनेक अँटीऑक्सिडेंटचे गुणधर्म आहेत, जे केसांना सूर्यामुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवते आणि केसांचे बर्‍याच रसायनांपासून संरक्षण करते.

(टीप : कोणत्याही उपचारापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

(Coconut oil is extremely beneficial for skin and hair)

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....