खोबरेल तेल लावा ओठ चमकवा; वाचा आणखी फायदे!
आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, केसांच्या आरोग्यासाठी नारळ तेल अर्थात खोबरेल तेल सर्वोत्तम मानले जाते.
मुंबई : आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, केसांच्या आरोग्यासाठी नारळ तेल अर्थात खोबरेल तेल सर्वोत्तम मानले जाते. मात्र, खोबरेल तेल फक्त केसांच्या आरोग्यासाठी नाहीतर ओठांसाठी देखील खूप फायदेशीर आहे. दररोज दोन वेळा खोबरेल तेल आपण ओठांवर लावले तर आपले ओठ कोमल आणि मऊ होण्यास मदत होते. खोबरेल तेलामध्ये मोठ्या प्रमाणात अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. हे तेल लावल्याने कोरडेपणा कमी होण्यास मदत होते. (Coconut oil is extremely beneficial for the lips)
तुमचे जर ओठ सतत उलत असतील तर ओठांवर खाेबरेल तेल लावा. यामुळे तुमचे ओठ मऊ होतील. रात्री झोपण्याआधी सुरकुतलेल्या ओठांवर खोबरेल तेल लावा. खोबरेल तेल त्वचेसाठी चांगले असते. हात, पाय आणि चेहऱ्यावर नियमितपणे खोबरेल तेलाने मसाज केल्यास त्वचा मुलायम आणि चांगली होते. चेहऱ्यावर मुरूम येत असले तर खोबरेल तेलाचा वापर तुम्ही करु शकता. खोबरेल तेलाच्या नियमित वापराने चेहऱ्यावरचे पुरळ कमी होण्यास मदत होते.
खोबऱ्याचं तेल केवळ केसांच्या वाढीसाठी उपयोगी ठरतं, असं नाही. आपल्या केसांवर कोमट खोबरेल तेल लावा, त्यानंतर डोक्यावर प्लॅस्टिक पिशवी घालून एका टॉवेलनं झाकून घ्या. खोबरेल तेल नैसर्गिक, किफायतशीर आणि सहज उपलब्ध होणारे आहे. केसांच्या अनेक समस्यांचे निराकरण करण्यासाठी हे प्रभावी आहे. अशा परिस्थितीत, अनावश्यक महागड्या हेअर केअर उत्पादनांऐवजी खोबरेल तेल वापरणे अतिशय लाभदायी ठरते.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Hair Treatment | केस सरळ करण्याचा विचार करताय? जाणून घ्या वेगवेगळ्या ‘हेअर ट्रीटमेंट’मधले फरक…
Skin Care | थंडीमुळे कोरड्या पडलेल्या चेहऱ्याला मॉश्चराइझ करायचंय? वापरा घरगुती ‘स्ट्रॉबेरी फेस पॅक’!#strawberry | #skincare | #skincareroutine | #skincaretips https://t.co/K0gUjPPFHn
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 12, 2021
(Coconut oil is extremely beneficial for the lips)