तेलकट त्वचेला उपयुक्त, नारळ पाणी! या प्रकारे लावा चेहऱ्यावर
जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर नारळ पाणी वापरायला हवे. उन्हाळ्यात नारळ पाणी तेलकट त्वचेसाठी कसं उपयोगात येऊ शकतं हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, तेलकट त्वचेवर नारळ पाण्याच्या फायद्यांविषयी जाणून घेऊया.
मुंबई: नारळ पाणी केवळ उन्हाळ्यात आपल्याला हायड्रेटेड ठेवण्याचे काम करत नाही तर त्याचे इतरही अनेक फायदे आहेत, त्यामुळे जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर नारळ पाणी वापरायला हवे. उन्हाळ्यात नारळ पाणी तेलकट त्वचेसाठी कसं उपयोगात येऊ शकतं हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, तेलकट त्वचेवर नारळ पाण्याच्या फायद्यांविषयी जाणून घेऊया.
या प्रकारे चेहऱ्यावर लावा नारळ पाणी
फेस मास्क
फेस मास्क म्हणून नारळाच्या पाण्याचा वापर फायदेशीर ठरतो. यामुळे चेहऱ्याला हायड्रेशन मिळते, ज्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते, तुम्ही त्याचा मास्क सहज बनवू शकता, त्यासाठी तुम्ही 2 चमचे नारळ पाणी घ्या, त्यात अर्धा चमचा मध आणि हळद पावडर घाला आणि ते चांगले मिसळून आपल्या चेहऱ्यावर लावा, लावल्यानंतर दहा मिनिटांनी धुवा.
फेस वॉश
तेलकट त्वचेसाठी आपण फेस वॉश म्हणून नारळ पाणी देखील वापरू शकता. नारळ पाणी तेलकट त्वचा काढून टाकण्याचे काम करते. चेहऱ्यावर शिंपडलेल्या नारळाच्या पाण्याने चेहऱ्यावर मसाज करा. मसाज केल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा, असे नियमित केल्याने तेलकट त्वचेपासून सुटका मिळेल.
टोनर
तुम्ही नारळाचे पाणी टोनर म्हणून, क्लिंजर म्हणूनही वापरू शकता, तुम्ही तुमचा मेकअप काढू शकता, तसेच टोनर म्हणून तुम्ही तुमची त्वचा स्वच्छ करू शकता, या नॅचरल टोनरमुळे कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत आणि तुमची त्वचा चमकेल.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)