मातीच्या भांड्यात स्वयंपाक करणे आरोग्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या मातीची भांडी वापरण्याची पद्धत
मातीच्या भांड्यात केलेल्या स्वयंपाकाची चव अप्रतिम लागते. आजच्या काळात अनेक जण स्टीलच्या आणि नॉनस्टिकच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करतात पण मातीच्या भांड्यात बनवलेले काही पारंपारिक पदार्थ आहेत जे त्यामध्येच केल्यानंतर चविष्ट लागतात. जर तुम्ही मातीचे भांडे पहिल्यांदाच वापरत असाल तर ते वापरण्यापूर्वी काही गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे.
पूर्वीच्या काळामध्ये मातीच्या भांड्यांमध्ये जेवण बनवले जायचे. यामध्ये बनवलेले जेवण आजही अनेक लोकांना आवडते मात्र या भांड्यांमध्ये स्वयंपाक करण्याची पद्धत माहिती नाही. आजच्या काळामध्ये स्टील, नॉनस्टिक आणि लोखंडी भांड्यांमध्ये जेवण बनवले जाते परंतु आजही असे काही पदार्थ आहेत जे मातीच्या भांड्यांमध्येच बनवले जातात. पण मातीच्या भांड्यात स्वयंपाक करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे त्यामुळे मातीच्या भांड्यात स्वयंपाक करताना ती जाणून घेणे गरजेचे आहे. अन्यथा स्वयंपाक खराब होण्याचा आणि भांडे तुटण्याची देखील शक्यता आहे.
शेफ पंकज भदौरिया अनेक वेळा किचन टिप्स सांगत असतात त्यांनी मातीच्या भांड्यात स्वयंपाक करण्याबद्दलही काही टिप्स सांगितल्या आहे. पहिल्यांदा नवीन मातीच्या भांड्यात स्वयंपाक करत असताना तीन गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले आहे. जाणून घेऊया त्या तीन गोष्टी कोणत्या आहेत.
शेफ पंकज भदौरिया यांनी सांगितले आहे की तुम्ही मातीचे भांडे आणल्यानंतर त्याच्यात कुठलाही प्रकारचा पदार्थ बनवायचा असेल तर त्या भांड्यात किमान 12 तास पाणी भरून ठेवा. ज्यामुळे ते भांडे पाणी पाणी शोषून घेईल आणि त्यात साचलेली कच्ची माती देखील निघून जाईल. त्यामुळे स्वयंपाक खराब होणार नाही आणि जेवणाची चवही बिघडणार नाही.
शेफ पंकज भदौरिया यांनी मातीचे भांडे वापरण्याबद्दल काही टिप्स सांगितल्या आहे. त्यातीलच एक म्हणजे भांड्यात रात्रभर किंवा बारा तास पाणी ठेवल्यानंतर ते पाणी काढून टाकावे आणि नंतर दोन ते तीन तास भांडे कोरडे होण्यासाठी तसेच राहू द्या. यामुळे भांडे पूर्णपणे स्वच्छ होते.
मातीचे भांडे पूर्णपणे सुकल्यानंतर त्या मातीच्या भांड्याला मोहरीच्या तेलाने आतून आणि बाहेरून चांगल्या पद्धतीने ग्रीस करा आणि नंतर गॅस चालू करून मंद आचेवर पाच ते सात मिनिटे ते भांडे तसेच राहू द्या. असे केल्याने तुमचे मातीचे भांडे स्वयंपाक करताना फुटणार नाही किंवा त्याला तडे जाणार नाही.