आता सोप्या पद्धतीने करता येणार कोरोनाची चाचणी; जाणून घ्या स्टेरिल सेलाइन गार्गल तंत्र काय आहे ते

हे तंत्र अत्यंत सोपे असून यामध्ये नाक किंवा तोंडातील स्वॅब देण्याची गरज नसून केवळ गुळण्यांच्या माध्यमातून ही चाचणी केली जाऊ शकणार आहे. कोरोना चाचणीच्या या नव्या तंत्राला इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) मंजुरी दिली आहे. (Corona can now be tested in a simple way, know what a sterile saline gargle technique)

आता सोप्या पद्धतीने करता येणार कोरोनाची चाचणी; जाणून घ्या स्टेरिल सेलाइन गार्गल तंत्र काय आहे ते
आता सोप्या पद्धतीने करता येणार कोरोनाची चाचणी
Follow us
| Updated on: May 23, 2021 | 8:01 AM

मुंबई : कोरोना संसर्गाचे वेळीच निदान करून आपल्याला या विषाणूवर मात करता येईल. भारत सरकारने याच दृष्टीकोनातून देशभर कोरोनाच्या चाचण्यांचे प्रमाण वाढवण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार राज्याराज्यांत कोरोनाच्या चाचण्या वाढवल्या जात आहेत. वेळीच निदान केल्यामुळे भले रुग्णसंख्या मोठी वाटत असली तरी संसर्गातून उद्भवणारा मृत्यूचा धोका टाळता येत आहे. याचदरम्यान कोरोना चाचणीचे आणखी एक तंत्र समोर आले आहे. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिक संशोधन संस्था अर्थात ‘निरी’ने या नव्या तंत्राचा शोध लावला आहे. हे तंत्र अत्यंत सोपे असून यामध्ये नाक किंवा तोंडातील स्वॅब देण्याची गरज नसून केवळ गुळण्यांच्या माध्यमातून ही चाचणी केली जाऊ शकणार आहे. कोरोना चाचणीच्या या नव्या तंत्राला इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) मंजुरी दिली आहे. (Corona can now be tested in a simple way, know what a sterile saline gargle technique)

स्टेरिल सेलाईन गार्गल तंत्र नेमके काय आहे?

या तंत्रामध्ये कोरोनाची लागण झालेल्या संशयित व्यक्तीला खारट पाण्याने 15 ते 20 सेकंदापर्यंत गुळण्या करण्यास सांगितले जाते. नंतर गुळण्या केलेले मिठाचे पाणी एका कुपीत ठेवलेले असते. साठवलेल्या सलाईनपासून नमुना तपासल्यास त्या व्यक्तीस कोरोनाची लागण झाली आहे की नाही हे स्पष्ट होऊ शकते.

या चाचणीतून घेतलेला नमुना विशिष्ट तापमानात ठेवण्याची गरज

या चाचणीमध्ये फक्त एक बाटली आणि मीठाचे पाणी आवश्यक असेल. या चाचणीच्या निष्कर्षाबाबतही निरीने ठाम दावा केला आहे. आरटी-पीसीआर चाचणीइतकाच या चाचणीचा निष्कर्ष विश्वासार्ह असेल, असे निरी संस्थेच्या संशोधकांनी म्हटले आहे. स्टेरिल सलाईन गार्गल प्रयोगशाळेत घेऊन जाणेही सोपे आहे. या चाचणीतून घेतलेला नमुना विशिष्ट तापमानात ठेवण्याची गरज नसते. सध्याच्या कोरोना चाचणीच्या तुलनेत हे तंत्र अत्यंत सोपे आणि स्वस्तही आहे. याच कारणावरून भारताच्या वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी या तंत्रावर कोरोना चाचणीसाठी एक अत्यंत प्रभावी तंत्र म्हणून शिक्कामोर्तब केले आहे.

अमेरिकेसह प्रगत देशांकडून या टेस्टचा सर्वाधिक वापर

अमेरिका तसेच इतर प्रगत देशांनी कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान सेलाइन वॉटर गार्गल टेस्टचा सर्वात आधी वापर केला होता. भारतात आता कोरोनाच्या दुसर्या लाटेचा कहर सुरू आहे. या आव्हानात्मक परिस्थितीत आयसीएमआरने या तंत्राला मान्यता दिली आहे. अमेरिकेतील अन्न व औषध प्रशासनाने अर्थात तिथल्या एफडीएने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्येच खारट पाण्याने गुळण्या करून त्याआधारे कोरोनाचे निदान करण्यास आपत्कालीन मंजुरी दिली होती. आता भारतात या तंत्राची करामत पाहायला मिळणार आहे. निरी संस्थेच्या नागपूर येथील पर्यावरण वायरोलॉजी सेलने भारतात ही चाचणी प्रक्रिया विकसित केली आहे.

सध्या तसेही कोरोनाच्या चाचणीसाठी लोकांना बराच वेळ खर्च करावा लागत होता. आरटीपीसीआरचा अहवाल घेण्यासाठी कमीत कमी एक दिवस म्हणजे 24 तासांची प्रतिक्षा करावी लागायची. तसेच जर रुग्णाची तब्येत बिघडली तर आणखी अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत सलाईन वॉटर गार्गल चाचणी खूप चांगली आहे. (Corona can now be tested in a simple way, know what a sterile saline gargle technique)

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

इतर बातम्या

Mahindra वाहनधारकांसाठी खुशखबर! कोरोनाच्या परिस्थितीत ग्राहकांसाठी कंपनीचा मोठा निर्णय

Puzzle Photo: या फोटोत दडलेत अनेक प्राणी, पण उंट आहे कुठे?; हुशार असाल तर शोधून दाखवाच!

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.