AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona virus : श्वास घेण्यास त्रास होत असल्यास कोरोनाच्या रूग्णांनी घ्यावी ही खबरदारी

ऑक्सिजनयुक्त आहार शरीरातील ऑक्सिजनची पातळी नियंत्रित करण्यास उपयुक्त ठरू शकतो. आपण जास्तीत जास्त हिरव्या भाज्या आणि फळांचे सेवन केले पाहिजे. (Corona patients should take this precaution if they have difficulty breathing)

Corona virus : श्वास घेण्यास त्रास होत असल्यास कोरोनाच्या रूग्णांनी घ्यावी ही खबरदारी
श्वास घेण्यास त्रास होत असल्यास कोरोनाच्या रूग्णांनी घ्यावी ही खबरदारी
Follow us
| Updated on: Apr 25, 2021 | 3:14 PM

मुंबई : कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेने संपूर्ण देशात खळबळ उडवली आहे. रुग्णालयांमध्ये आयसीयू बेड्स आणि ऑक्सिजनची कमतरतेमुळे रुग्णांचे हाल होत आहे. अशा परिस्थितीत आरोग्य अधिकारी लोकांना घरीच रिकव्हर होण्याचा सल्ला देत आहेत. श्वासोच्छ्वासात अडचण येत असल्यास सर्व लोकांना रुग्णालयात येण्याची गरज नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. जर ऑक्सिमीटरवर ऑक्सिजनची पातळी सतत 90 च्या खाली जात असेल तरच फक्त रुग्णालयात जा. या व्यतिरिक्त ज्या लोकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे त्यांनी काही विशेष गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. (Corona patients should take this precaution if they have difficulty breathing)

ज्वलनशील पदार्थांपासून दूर रहा

webmd च्या अहवालानुसार, जेव्हा शरीरात ऑक्सिजनची कमतरता असते तेव्हा गॅस स्टोव्ह, मेणबत्ती, फायरप्लेस, वीज किंवा गॅस हिटर अशा गोष्टींपासून सुमारे 5 फूट अंतर ठेवा. अशा गोष्टींच्या जवळ जाऊन आपल्या अडचणी वाढतात. पेंट थिनर, एरोसोल स्प्रे, क्लीनिंग फ्लूडसारखे ज्वलनशील उत्पादनांचा वापर करू नका. याशिवाय पेट्रोलियम, तेल, ग्रीस बेस्ड क्रीम किंवा व्हॅसलीनसारखे कोणतेही उत्पादन छातीवर किंवा शरीराच्या कोणत्याही भागावर लावू नका.

धूम्रपान टाळा

जर आपल्याला श्वास घेण्यात काही अडचण वाटत असल्यास, धूम्रपान करु नका. याशिवाय सिगारेट आणि बिडी ओढणाऱ्यांपासूनही दूर रहा. इतकेच नव्हे तर घरात वापरल्या जाणाऱ्या केमिकलपासून बनवलेल्या उदबत्ती किंवा धूप याच्या धुराच्या संपर्कात येऊ नका.

ऑक्सिजन कॉन्सनटेटर्स वापरत असाल तर दारे, खिडक्या खुली ठेवा

जर आपण ऑक्सिजन कॉन्सनटेटर्स वापरत असाल तर आपले दरवाजे किंवा खिडक्या खुल्या ठेवा. ऑक्सिजन कॉन्सनटेटर्स ऑक्सिजन तयार करण्यासाठी आसपासच्या हवेमधून ऑक्सिजन गोळा करतात. ऑक्सिजन तयार करण्यासाठी आणि ते रुग्णाच्या शरीरात पोचविण्यासाठी कॉन्सेन्ट्रेटर हवेतून नायट्रोजन काढतात. ताजी हवा मिळाल्यास कॉन्स्टेन्टर्स त्यांचे कार्य अधिक चांगल्या प्रकारे करु शकतील. वनस्पती आपल्या मानवाच्या अगदी विरुद्ध असतात. ते कार्बनडाय ऑक्साईड घेऊन ऑक्सिजन उत्सर्जित करतात. जर आपण होम क्वारंटाईन असाल, तर आपल्या खोलीत इनडोअर वनस्पतींची व्यवस्था करा. असे केल्याने आपल्याला नेहमीच ताजी हवा मिळत राहिल.

नियमित व्यायाम करा

lunginstitute.com नुसार, काही विशेष व्यायाम आमच्या प्रतिसाद क्षमता सुधारण्यात देखील उपयुक्त आहेत. जसे आपला श्वास घेण्याचे प्रमाण वाढत जाईल तसतसे आपल्या फुफ्फुसांकडे जाणाऱ्या ऑक्सिजनची पातळी देखील वाढेल. म्हणूनच, तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार असे व्यायाम नियमितपणे करा.

डिहायड्रेशन होऊ देऊ नका

अशा परिस्थितीत शरीराचे डिहायड्रेशन होऊ देऊ नका. पाण्याचे शास्त्रीय सूत्र H2O आहे. येथे ओ म्हणजे ऑक्सिजन. हे स्पष्ट आहे की शरीरातील पाण्याचे पुरेसे प्रमाण रक्तामध्ये ऑक्सिजनची कमतरता येऊ देत नाही. म्हणून आधीच तयार रहा आणि डिहायड्रेशन टाळण्यासाठी पुरेसे पाणी प्या.

मेडिटेशन करा

दररोज नियमितपणे मेडिटेशन करा. आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. दिवसातून काही मिनिटे दीर्घ श्वास घेण्याच्या या सरावातून आपल्याला नक्कीच फायदा होईल. याद्वारे, केवळ अवयवांना ऑक्सिजन व्यवस्थित मिळत नाही तर आपला ताण देखील कमी होईल.

ऑक्सिजनयुक्त आहार घ्या

ऑक्सिजनयुक्त आहार शरीरातील ऑक्सिजनची पातळी नियंत्रित करण्यास उपयुक्त ठरू शकतो. आपण जास्तीत जास्त हिरव्या भाज्या आणि फळांचे सेवन केले पाहिजे. आपण केळी, ब्रोकोली आणि ओवा यासारख्या गोष्टींचा आपल्या जेवणात समाविष्ट करू शकता. आपल्या आहारात लो सोडियम आहाराचे सेवन करा. असा आहार मूत्रपिंड आणि रक्तामध्ये ऑक्सिजन वाढवण्यासाठी कार्य करतो. तसेच वाढीव अडचण आल्यास कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या. (Corona patients should take this precaution if they have difficulty breathing)

इतर बातम्या

SBI Alert! जीवरक्षक औषधांच्या माध्यमातून ग्राहकांची फसवणूक, पेमेंट करण्यापूर्वी हे वाचाच

फक्त एका कॉलवर मागवा 5 किलोचा LPG गॅस सिलिंडर, कागदपत्रांचीही गरज नाही

पश्चिम रेल्वेने प्रवास करताय?आज 4 तास मेगाब्लॉक, कोणत्या वेळात असणार?
पश्चिम रेल्वेने प्रवास करताय?आज 4 तास मेगाब्लॉक, कोणत्या वेळात असणार?.
मुंबईकरांनो.... या रविवारी लोकलने बिनधास्त फिरा, कारण मध्य रेल्वेवर...
मुंबईकरांनो.... या रविवारी लोकलने बिनधास्त फिरा, कारण मध्य रेल्वेवर....
लाडक्या बहिणींनो... 2100 रूपये मिळणार पण...उदय सामंत बघा काय म्हणाले?
लाडक्या बहिणींनो... 2100 रूपये मिळणार पण...उदय सामंत बघा काय म्हणाले?.
गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग
गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग.
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी.
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?.
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन.
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद.
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना.
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत...
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत....