valentine day 2023 : लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये आहात ? कसा साजरा कराल व्हॅलेंटाईन डे ? ज्यामुळे वाढेल तुमचे प्रेम

लॉन्ग डिस्टन्स रिलेशशिपमध्ये आहात, व्हॅलेंटाईन डे आठवड्यात पार्टनरची आठवण तर येणारच... म्हणून असा साजरा करा प्रेमाचा आठवडा, ज्यामुळे वाढेल प्रेम

valentine day 2023 : लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये आहात ? कसा साजरा कराल व्हॅलेंटाईन डे ? ज्यामुळे वाढेल तुमचे प्रेम
long distance relationship on valentine day 2023
Follow us
| Updated on: Feb 06, 2023 | 5:10 PM

Valentine Day Celebration Tips : फेब्रुवारी महिना म्हणजे प्रेमाचा महिना. प्रेमाच्या या महिन्यात प्रत्येक जण आपल्या पार्टनरवर असलेलं प्रेम व्यक्त करतो. (valentine day 2023) खरं तर समोरच्या व्यक्तीवर असलेलं आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणत्याही दिवसाची गरज नसते. पण, आताच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत अनेक जण आपल्या जोडीदारासाठी काही तरी खास करण्याचा प्रयत्न करत असतात. पण, काही कपल लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये असतात. त्यामुळे प्रेमाच्या आठवड्यात लॉन्ग डिस्टन्समध्ये असणाऱ्यांना त्यांच्या पार्टनरची आठवण तर नक्कीच येत असणार. लांब राहून देखील आपण आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत व्हॅलेंटाईन डे साजरा करु शकतो. कसं ते जाणून घ्या…

पार्टनरसोबत डेट करा प्लान

लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या आठवड्यात तुम्ही पार्टनरसोबत व्हर्चुअल डेट प्लान करू शकता किंवा व्हिडीओ कॉल करू शकता. शिवाय व्हर्चुअल डेट प्लान करून कँडल लाईट डिनर देखील करू शकता. एकमेकांच्या आवडीचा पदार्थाचा ऑर्डर करु शकता. ज्यामुळे तुमचा व्हॅलेंटाईन डे खास होवू शकतो. (the dark truth about valentine’s day)

पार्टनरला भेटवस्तू देवू शकता

व्हॅलेंटाईन डे च्या आठवड्यात तुमचा पार्टनर तुमच्या जवळ नसेल तर, तुम्ही पार्टनरसाठी एक भेटवस्तू ऑनलाईन पाठवू शकता किंवा एखाद्या मित्राच्या माध्यमातून जर तुम्ही पार्टनरला भेटवस्तू दिली तर तुमच्यातील प्रेम वाढू शकतं. यामुळे तुमचा व्हॅलेंटाईन डे खास होवू शकतो. (valentine meaning)

हे सुद्धा वाचा

पार्टनरला मेसेज करा

आपण रोज आपल्या आवडत्या व्यक्तीला मेसेज करतो. पण जर का तुम्ही व्हॅलेंटाईन डे च्या आठवड्यात प्रेम व्यक्त करण्यासाठी रोज सकाळी आणि रात्री मेसेज केला तर, पार्टनरला खास फिल होईल. शिवाय व्हॅलेंटाईन डे च्या आठवड्यात तुम्ही पार्टनरला व्हाईस नोट देखील पाठवू शकता. ज्यामुळे तुमच्यातील प्रेम वाढेल. (long distance relationship)

सांगायचं झालं तर, आपण आपल्या आवडत्या व्यक्तीकडे केव्हाही प्रेम व्यक्त करु शकतो. प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणत्याही दिवसाची किंवा महिन्याची गरज नसते. पण फेब्रुवारी महिन्याची गोष्टच वेगळी असते. जर तुम्ही कोणावर प्रेम करत आसला आणि त्या व्यक्तीला तुमच्या मनातील भावना सांगण्याचा प्रयत्न करत असाल, तर फेब्रुवारी महिन्याचा प्रेमाचा आठवडा प्रचंड खास आहे. जर तुम्ही प्रेमाच्या आठवड्यात योग्य संधी साधून आवडत्या व्यक्तीला प्रपोज केलात, तर ती व्यक्ती देखील प्रचंड आनंदी होईल

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.