तुम्हाला रडू येत असेल तर यात नाही काही चुकीचे, यामुळे शरीराला प्राप्त होते संरक्षण कवच!
रडू येणे हे फक्त दुःखाच्या प्रसंगी महत्त्वाचे नसते तसेच अनेकदा आपले शरीर स्वतःचे संरक्षण करण्यासाठी, स्वतःची काळजी करण्यासाठी सुद्धा रडणे गरजेचे असते म्हणूनच अनेकदा शरीराचे संरक्षण करण्यासाठी सुद्धा डोळ्यातून आपोआप पाणी येऊ लागते व हा सुद्धा एक रडण्याचा मार्ग आहे असे देखील म्हटले जाते.
मुंबई : जेव्हा कधीही आपण रडतो (crying) तेव्हा आजूबाजूला असणाऱ्या व्यक्तींची प्रतिक्रिया आपल्याबद्दल काही वेगळीच असते. अनेक जण आपल्याला रडू नये याबद्दल सल्ला देत असतात. तसेच रडणे हे आपल्या आरोग्यासाठी सुद्धा चांगले नाही असे सुद्धा सांगतात. अनेक जण असे सुद्धा आहेत की अरे तू का रडतोय? रडू नकोस… जर एखादा लहान मुलगा रडायला लागला की आपण त्याला म्हणतो की, तू रडू नकोस… चांगली मुलं रडत नाहीस.. तू हुशार आहेस ना मग अजिबात रडायचं नाही असे बोलून आपली समजूत काढत असतात. अरे तुला रडावेसे वाटते आहे. काही नाही तुला जितके रडायचं आहे तितके रड अन् मोकळा हो हृदयापासून, रडून घे एकदाचा.. असे म्हणणारे आपण क्वचितच एखाद्या व्यक्तीला म्हणताना ऐकलं असेल. रडण्याबाबत इतकी मोकळीक आणि सहजता साधारणपणे लोकांमध्ये पाहायला मिळत नाही. यामागील एक कारण सुद्धा आहे जे अनेकांना माहिती नसते की रडू येणे हे फक्त दुःखाच्या प्रसंगी (Tragic event) महत्त्वाचे नसते तसेच अनेकदा आपले शरीर स्वतःचे संरक्षण करण्यासाठी, स्वतःची काळजी करण्यासाठी सुद्धा रडणे गरजेचे असते म्हणूनच अनेकदा शरीराचे संरक्षण (Body protection) करण्यासाठी सुद्धा डोळ्यातून आपोआप पाणी येऊ लागते व हा सुद्धा एक रडण्याचा मार्ग आहे असे देखील म्हटले जाते.
आपण रडतो तेव्हा शरीरातून ऑक्सिटोसिन नावाचे हार्मोन रिलीज
वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध हे झाले आहे की जेव्हा आपण रडतो तेव्हा आपल्या शरीरातून ऑक्सिटोसिन नावाचे हार्मोन रिलीज होतात. ऑक्सिटोसिन खरे तर एक हॅप्पी हार्मोन आहे जे दुःख, ताण – तणाव यासारख्या परिस्थितीमध्ये आपले शरीर अश्रूंच्या माध्यमाद्वारे ऑक्सिटोसिन रिलीज करून आपले संरक्षण करतो त्याचबरोबर जेव्हा आपण आनंदी असतो तेव्हा अशावेळी हे हार्मोन्स आपल्या शरीरातून बाहेर पडतात परंतु जेव्हा आपण दुखी, उदास, चिंतेत किंवा एखाद्या काळजीच्या ओझ्या खाली असतो तेव्हा हे टॉक्सिक स्ट्रेस हार्मोन्स आपल्या शरीरातून बाहेर पडू लागतात. हे हार्मोन आपल्या शरीरासाठी घातक ठरू शकतात.
अशातच आपले शरीर नैसर्गिक स्वरूपामध्ये आपले संरक्षण करण्याचा प्रयत्न करत असतो, त्या प्रयत्नांमध्ये आपोआपच रक्तातील साखर वाढणे नसामधून रक्त प्रवाह जास्त होणे आणि हॅप्पी हार्मोन्स बाहेर पडणे या सर्वांचा समावेश असतो.
आपण रडतो तेव्हा मन हलके होते
जेव्हा कधीही आपण मनमोकळे रडतो तेव्हा आपल्याला खूप बरे वाटते. एखादे ओझे आपल्या मनावरून कमी झाले आहे अशी भावना जागी होते. याचा अर्थ जेव्हा आपण रडतो तेव्हा मन हलके होते असे नाही तर या सर्व दरम्यान आपल्या शरीरात जे हॅप्पी हार्मोन्स असतात ते बाहेर पडू लागतात म्हणूनच अशा वेळी आपल्याला खूपच हलजे वाटू लागते ज्यामुळे आपल्या शरीरातील अनेक पेशी, नसा रिलॅक्स होऊन जातात. या सगळ्या प्रक्रियेदरम्यान रडल्यानंतर आपल्याला खूपच हलके वाटून आपला ताण कमी झाला आहे असे वाटू लागते.
म्हणून भावनांना वाट मोकळी करुन द्या
जे लोक व्यक्त होताना मुक्तपणे रडत असतात अश्या व्यक्ती आपल्या भावनांना अश्रूच्या माध्यमातून वाट मोकळी करत असतात. हे लोक खूपच आनंदी असतात, त्यांच्या शरीरामध्ये टॉक्सिन जमा होत नाही म्हणजे विषारी घटक जे अश्रू च्या माध्यमातून बाहेर पडतात याउलट ज्या व्यक्तींना रडू येत नाही अशा व्यक्तींच्या शरीरामध्ये टॉक्सिन घटक जमा होतात आणि परिणामी त्यांना नेहमी ताण तणाव जाणवत असतो. म्हणूनच जर कधी भविष्यात तुमच्या समोर एखादा व्यक्ती रडत असेल तर त्याला न थांबवता त्याला त्याच्या भावनांना वाट मोकळी करून द्या कारण रडल्याने शरीर स्वतःचे संरक्षण करत असतो.
इतर बातम्या :