उन्हाळ्याच्या हंगामात घरी तयार करा काकडी आणि दह्याचा फेसपॅक, वाचा !
उन्हाळ्याच्या हंगामात आपल्या त्वचेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. वाढत्या तापमानाचा परिणाम आपल्या त्वचेवर होतो.
मुंबई : उन्हाळ्याच्या हंगामात आपल्या त्वचेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. वाढत्या तापमानाचा परिणाम आपल्या त्वचेवर होतो. यामुळे आपली त्वचा तेलकट आणि चिकट होते. त्वचेवरील मुरुमांची समस्या असलेल्या व्यक्तीनी उन्हात बाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी. आपल्या त्वचेच्या देखभालीत लहानसे बदल करा. आज आम्ही तुम्हाला खास फेसपॅक सांगणार आहोत. ज्यामुळे उन्हाळ्यात देखील तुमची त्वचा ताजी आणि तजेलदार राहील. (Cucumber and curd face pack is beneficial for the skin)
यासाठी आपल्या एक काकडी आणि एक वाटी दही लागणार आहे. सर्वात अगोदर काकडीची साल काढा आणि एकदम बारीक पेस्ट तयार करून घ्या. त्यानंतर यामध्ये दही मिक्स करा आणि पेस्ट तयार करा, ही तयार झालेली पेस्ट वीस मिनिटांसाठी फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा. त्यानंतर पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यासोबत मानेवर देखील लावा. पेस्ट कोरडीपर्यंत चेहऱ्यावर ठेवा आणि सुकल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. हा फेसपॅक आपण आठवड्यातून चार ते पाच वेळा लावला पाहिजे. हा फेसपॅक तयार करण्यासाठी देखील खूप सोपा आहे.
कलिंगड आणि काकडीचा फेसपॅक तयार करण्यासाठी आपल्याला कलिंगड आणि काकडीचा रस लागणार आहे. ते दोन्ही रस व्यवस्थितपणे एकत्र मिक्स करा आणि चेहऱ्यावर 10 ते 15 मिनिटे ठेवा आणि थंड पाण्याने धुवा. दूध आणि कलिंगडचा फेसपॅक तयार करण्यासाठी कच्च्या दुधामध्ये 2 चमचे किसलेले कलिंगड मिक्स करा. 25 ते 30 मिनिटे चेहऱ्यावर लावा आणि स्वच्छ पाण्याने धुवा. लिंबू आणि कलिंगडचा फेसपॅक करण्यासाठी लिंबाचा रस आणि कलिंगड मिक्स करून घ्या आणि आपल्या संपूर्ण चेहऱ्याला लावा.यामुळे आपला चेहरा हायड्रेट राहतो.
त्वचा निरोगी आणि चमकदार राहण्यासाठी, लिंबू आणि टोमॅटोचे स्क्रब लावा. यामुळे आपली त्वचा निरोगी आणि ताजी दिसेल. आठवड्यातून 2 ते 3 दिवस हे करायला पाहिजे. तुमची त्वचा नैसर्गिकरित्या मॉइश्चरायईज करणे आवश्यक आहे. उन्हाळ्यातील मॉइश्चरायझिंग ही त्वचेवरील चमक, आर्द्रता आणि मुरुमांपासून मुक्त करण्यास मदत करते. त्वचेमधईल ओलावा कायम राखण्यासाठी सौम्य मॉइश्चरायझर्सची निवड करा. हायल्यूरॉनिक एसिडचा समावेश असलेल्या मॉइश्चरायझर्सचा वापर करा.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Coconut Water | रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ‘नारळ पाणी’, वाचा याचे फायदे…
Ginseng Benefits : शतावरीचा औषधी वनस्पती म्हणून प्राचीन काळापासून वापर, काय आहेत फायदे वाचा!https://t.co/jXEW9APpXz | #GinsengBenefits | #immunityboostertips | #immunity | #immunityboost | #Healthcare | #Ginseng | #lifestyle |
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 31, 2021
(Cucumber and curd face pack is beneficial for the skin)