Weight loss : वजन कमी करण्यात मदत करेल जीरे आणि मेथी, असे करावे सेवन
वजन कमी करण्यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न केले जातात. पण वजन कमी होत नाही. वजन कमी करण्यासाठी आहारात बदल करणे फार महत्त्वाचे असते. पण सोबत व्यायाम ही करावा लागतो. नैसर्गिक पद्धतीने वजन कमी करणे चांगले असते. त्यामुळे काही आयुर्वेदिक उपायांनी देखील तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करु शकता.
Weight Loss : वजन कमी करण्यासाठी अनेक जण वेगवेगळे उपाय करतात. थंडीत वजन खूप वेगाने वाढत असते. त्यामुळे अशा वेळी वजन नियंत्रणात ठेवणे फार महत्त्वाचे असते. कोलेस्टेरॉलची पातळी जर वेगाने वाढत असेल तर या ऋतूत हृदयाशी संबंधित आजारांना बळी पडतात. त्यामुळे या ऋतूतही तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेणे आणि वजन नियंत्रणात ठेवणे महत्त्वाचे आहे.
लठ्ठपणावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिरे, मेथी, बडीशेप, धणे आणि दालचिनीचा वापर करता येईल. लठ्ठपणा दूर करण्यासाठी जिरे खूप प्रभावी आहे. जिऱ्यामध्ये असलेले संयुगे पाचक एन्झाईम्सचे उत्पादन वेगवान करू शकतात. अॅन्टीऑक्सिडंट गुणांनी युक्त मेथीचे सेवन केल्याने साखरही नियंत्रणात राहते. बडीशेप खाल्ल्याने तुमची पचनक्रिया सुधारते. धण्यातही अनेक पोषक तत्वे आढळतात. त्याच्या सेवनाने शरीर डिटॉक्स होते. म्हणजेच हे मसाले तुमचे वजन कमी करतातच पण इतर अनेक समस्यांवरही ते खूप फायदेशीर आहेत.
पावडर कशी बनवायची?
एका पातेल्यात ५ चमचे जिरे घ्या. त्यामध्ये मग मेथी, बडीशेप आणि धने आणि थोडी दालचिनी टाका. त्यानंतर मंद आचेवर एकत्र परतून घ्या. हलक्या भाजल्या गेल्या की गॅस बंद करा, आता ग्राइंडरमध्ये ठेवून बारीक करा. त्यांची पूड बारीक करून घ्या.
कसे करावे सेवन
एका ग्लासमध्ये कोमट पाणी घेऊन त्यात थोडेसे केशर मिसळा. या पाण्यात अर्धा चमचा ही पावडर मिसळा. आता त्यात लिंबाचा रस घाला. वजन कमी करण्यासाठी हे पेय तयार आहे. हे पाणी महिनाभर प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होईल.
या समस्यांवरही प्रभावी
कोलेस्ट्रॉलची पातळी वाढली असेल तर ही पावडर ती कमी करण्यात ही मदत करेल. यामुळे हृदयाचे आरोग्य ही चांगले राहिल. यामुळे मधुमेह ही नियंत्रणात राहिल. हिवाळ्यात रोगप्रतिकार शक्ती देखील मजबूत करण्यात मदत करेल.