निरोगी आणि चमकदार त्वचा हवी? दही आणि तांदळाच्या पीठाचा फेसपॅक ट्राय करा

लोक त्वचा निरोगी ठेवण्यासाठी नेहमी विविध उपाय ट्राय करतात. निरोगी आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी, विविध सौंदर्य उत्पादनांचा वापर करतात.

निरोगी आणि चमकदार त्वचा हवी? दही आणि तांदळाच्या पीठाचा फेसपॅक ट्राय करा
फेसपॅक
Follow us
| Updated on: Apr 19, 2021 | 10:48 AM

मुंबई : लोक त्वचा निरोगी ठेवण्यासाठी नेहमी विविध उपाय ट्राय करतात. निरोगी आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी, विविध सौंदर्य उत्पादनांचा वापर करतात. परंतु, आपणास माहित आहे का की, या महागड्या उत्पादनांऐवजी काही चांगल्या सवयींचा अवलंब करून देखील आपण निरोगी त्वचा मिळवू शकता. या सवयींचा अवलंब केल्याने त्वचा सुधारण्यास सुरुवात होते. आज आम्ही तुम्हाला घरचे घरी तयार होणार एक फेसपॅक सांगणार आहोत. त्यामुळे तुमची त्वचा चांगली होण्यास मदत होईल. (curd and rice flour face pack is beneficial for beautiful skin)

सर्वांत अगोरद अर्धी वाटी तांदूळ घ्या आणि ते बारीक करून घ्या. त्यामध्ये ताजे दही घाला ही पेस्ट व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि चेहऱ्यावर 30 ते 40 मिनिटे तसेच ठेवा आणि हा पॅक सुकल्यानंतर चेहऱ्यावर हात फिरवा यामुळे तुमचे स्क्रब देखील होईल. यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा याचा फायदा आणि त्वचेला होईल आपली त्वचा चमकदार होण्यास मदत होईल. आठवड्यातून साधारण तीन ते चार वेळा ही पेस्ट चेहऱ्याला लावा.

दह्यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. जे सर्नबर्न आणि टॅनिंगची समस्या दूर करण्यासाठी उपयोगी ठरते. सन बर्न कमी करण्यासाठी त्वचेवर दही लावा आणि 15 मिनिटांनंतर त्वचा साध्या पाण्याने स्वच्छ धुवा. टॅनिंग काढून टाकण्यासाठी दह्यामध्ये 3 ते 4 चमचे बेसन पीठ आणि लिंबाचा रस घाला. आता ही पेस्ट टॅन झालेल्या भागावर लावा आणि कोरडे होऊ द्या. मिश्रण चांगले कोरडे झाल्यावर त्वचा पाण्याने धुवा. आपल्याला काही दिवसांतच याचा फरक दिसून येईल.

दह्यामध्ये नैसर्गिक अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. आपण इच्छित असल्यास, दह्याचा फेस मास्क तयार करून तो लावू शकता, यामुळे आपली मुरुमांची समस्या कमी होईल. याशिवाय मुरुमांमुळे येणारी खाज देखील दूर होईल. दहीमध्ये अँटी फंगल गुणधर्म आहेत जे डोक्यातील कोंडा आणि स्काल्पशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी मदत करतात. यामुळे खाज सुटण्याच्या समस्येपासूनही आराम मिळतो. डोक्यातील कोंडा दूर करण्यासाठी, दह्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस घाला. या मिश्रणाने आपल्या स्काल्पची मालिश करा आणि कोरडे होऊ द्या.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Food | ‘या’ पदार्थांना दूर ठेवा आणि हिवाळ्याच्या काळात सर्दी-खोकल्यापासून सुरक्षित राहा!

(curd and rice flour face pack is beneficial for beautiful skin)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.